HELLO SOLAPUR NEWS | महाराष्ट्रातील बडे उद्योजक, समाजसेवक राणा सूर्यवंशी यांच्यावर जीवघेणा हल्ला करण्यात आल्याची प्राथमिक माहिती आहे. बारामती येथे हा हल्ला झाल्याची माहिती आहे. राणा सूर्यवंशी हे राणा शिपिंग कंपनीचे प्रमुख असून समाजसेवक आहेत.
राणा सूर्यवंश
Rana Suryawanshi यांच्यावर बारामती एअरपोर्ट जवळ हा हल्ला झाला आहे. बुके देण्याच्या बहाण्याने कटपळ येथे काही लोक आले. त्यानंतर सुरवातीला बुके देताना त्यांच्या हातावर कोयत्याने सपासप वार केले. एवढ्यावरच न थांबता रिव्हॅल्वरमधून गोळी झाडण्यात आली. मात्र राणा सूर्यवंशी यांनी ती गोळी हुकवल्याची प्राथमिक माहिती आहे.
हा सर्व प्रकार सायंकाळी साडेसातच्या सुमारास घडला आहे. या हळल्यानंतर त्यांना बारामती येथील सिटी केअर हॉस्पिटल मध्ये दाखल करण्यात आले आहे. बारामतीच्या हॉस्पिटलमध्ये उपचार घेतल्यानंतर राणा यांना पुणे येथे नेण्यात आल्याची माहिती आहे. पुण्यातील रुबी हॉल क्लिनिक येथे त्यांच्यावर पुढील उपचार करण्यात येणार असल्याची माहिती आहे.
दरम्यान हल्ला कोणी केला आणि हल्ल्या मागचे कारण नक्की काय याचा शोध पोलिसांकडून केला जात आहे. पोलिसांची टीम घटनास्थळी दाखल झाली असून पुढील शोध सुरूय.








