HELLO SOLAPUR NEWS |महाराष्ट्र साहित्त्य परिषद, शाखा दक्षिण सोलापूर आणि आर्यन क्रिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने 30, 31 ऑक्टोंबर आणि 1 नोव्हेंबर या तीन दिवशी लोकमान्य टिळक सभागृह अॅम्फी थिएटर मध्ये सकाळी 6 वाजून 25 मिनिटांनी ज्येष्ठ निरूपणकार विवेक घळसासी यांच्या निरूपणाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती मसाप दक्षिण शाखेच्या अध्यक्षा रेणुका महागांवकर आणि कार्याध्यक्ष प्रशांत बडवे यांनी दिली.
सुखी जीवनाच्या यात्रेसाठी हा प्रमुख आशय यंदाच्या विवेकाच्या अमृतवाणीचा आहे. त्यामध्ये शुक्रवार दि. 30 ऑक्टोंबर रोजी साधक, शनिवार दि. 31 ऑक्टोंबर रोजी साधना आणि रविवार दि. 1 नोव्हेंबर रोजी सिध्दी या तीन दिवशी तीन विषयावर विवेकाची अमृतवाणी होणार आहे. गेल्या 16 वर्षापासून दिपावलीपूर्व वैचारिक दिपोत्सव अखंडपणे साजरा केला जातो. विविध विषयावर ज्येष्ठ निरूपणकार विवेक घळसासी यांच्या रसाळवाणीतून निरूपण केले जाते.
दिवाळी पूर्वीची पहाट चांगल्रा विचाराने सुरू व्हावी दिवाळीची सुरूवात मंगलमय वातावरणात बौध्दिक मेजवानीने विवेकाच्या अमृतवाणीमधून केली जाते यासाठी पु. ना. गाडगीळ यांचे विशेष सहकार्य लाभले आहे. त्याचबरोबर या कार्यक्रमासाठी सुधा इडलीगृह, अॅटलान्स लाईफस्टाईल प्रा. लि., चंद्राम चव्हाण गुरूजी मागास शिक्षण संस्थेचे अध्यक्ष सचिन चव्हाण यांचे मोलाचे सहकार्य लाभले आहे.
यापुर्वी प्रभु श्रीराम, महाबली हनुमान, श्रीकृष्ण, चाणक्य, रामायण, महाभारत यावर प्रवचन करण्यात आले असून या कार्यक्रमाला रसिक श्रोत्यांनी भरभरून प्रतिसाद देत सभागृहात मोठ्यासंख्रेने गर्दी केली होती. विवेक घळसासी रांच्रा रसाळवाणीतून आलेल्रा प्रत्रेक विषराचे निरूपण ऐकून रसिक श्रोते मंत्रमुग्ध होतात. दिवाळीतील गोड फराळाचा आनंद घेण्यापूर्वी बौध्दिक विचारांची मेजवाणी विवेकाची अमृतवाणी यातून मिळते.
सकाळी 6 वाजून 25 मिनिटांनी विवेक घळसासी यांचे निरूपण वेळेवर सुरू होऊन वेळेवर सकाळी 7.30 वाजता संपणार आहे. तरी या मंगलमय बौध्दिक आणि वैचारीक मेजवानी असलेल्या विवेकाची अमृतवाणी कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित राहावे,असे आवाहन मसाप दक्षिण शाखेच्या अध्यक्षा रेणुका महागांवकर आणि कार्याध्यक्ष प्रशांत बडवे यांच्याकडून करण्रात आले.








