Thursday, October 22, 2026
  • Login
Hello Solapur
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ
No Result
View All Result
No Result
View All Result
Hello Solapur
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ

सोलापुरात दिनेश घोडकेंचा भाजपाला पाठिंबा; जय माता दी प्रतिष्ठानमुळे 4 प्रभागांमध्ये भाजपचे वाढले बळ

Hello Solapur by Hello Solapur
06-Jan-2026 20:09 pm
in शहर
0
0
SHARES
47
VIEWS

HELLO SOLAPUR | जय मातादी प्रतिष्ठानच्या माध्यमातून युवकांचे मोठे संघटन उभे करणारे दिनेश घोडके यांनी आमदार देवेंद्र कोठे यांच्या यशस्वी शिष्टाईमुळे निवडणुकीतून माघार घेत भाजपाच्या उमेदवारांचा प्रचार सुरू केल्याने भारतीय जनता पार्टीच्या 4 प्रभागातील उमेदवारांना मोठे बळ मिळाले आहे.

प्रभाग क्रमांक १३ सह प्रभाग क्रमांक ९, १२ आणि १८ अशा चारही प्रभागांमध्ये भाजपाने प्रचारात आघाडी घेतली आहे. दिनेश घोडके यांनी सामाजिक कार्याच्या माध्यमातून जय मातादी प्रतिष्ठान तर्फे विविध सामाजिक धार्मिक उपक्रम राबवून कार्यकर्त्यांचे मोठे जाळे विणले आहे.

दिनेश घोडके यांना प्रभाग क्रमांक १३ मधून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची अधिकृत उमेदवारी देण्यात आली होती. यानंतर आमदार देवेंद्र कोठे यांनी जय मातादी प्रतिष्ठानचे प्रमुख दिनेश घोडके यांना विश्वासात घेऊन आगामी काळात सकारात्मक विचार करण्याची हमी दिली. आणि उमेदवारी माघारी घेण्याची विनंती केली.

आमदार देवेंद्र कोठे यांनी दिलेला शब्द प्रमाण मानून दिनेश घोडके यांनी या निवडणुकीतून माघार घेत भारतीय जनता पार्टीच्या प्रभाग क्रमांक १३ मधील सर्व उमेदवारांना पाठिंबा जाहीर केला तसेच त्यांच्या समवेत प्रचारात सक्रिय झाले आहेत.

प्रभाग क्रमांक १३ सह परिसरातील प्रभाग क्रमांक ९, १२ आणि १८ अशा चारही प्रभागांमध्ये दिनेश घोडके यांचा कार्यकर्ता वर्ग मोठ्या प्रमाणावर आहे. त्यांच्या सर्व कार्यकर्त्यांना दिनेश घोडके यांनी भाजपच्या उमेदवारांना विजयी करण्यासाठी कामाला लागण्याचे आदेश दिल्यामुळे जय मातादी प्रतिष्ठानचे कार्यकर्ते तसेच दिनेश घोडके मित्रपरिवार भाजप उमेदवारांच्या प्रचारात सक्रिय झाले आहेत.

श्री. घोडके यांच्या या भूमिकेमुळे भाजपने निवडणुकीच्या स्पर्धेत विरोधकांना मागे खेचत एक पाऊल पुढे टाकले आहे.

आमदार देवेंद्र कोठे यांनी शहर मध्य विधानसभा मतदारसंघातील प्रत्येक प्रभागात बारकाईने लक्ष घालत भारतीय जनता पार्टीचे सर्व उमेदवार निवडून आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू केले आहेत.

या निवडणुकीच्या माध्यमातून आमदार देवेंद्र कोठे यांनी शहर मध्य विधानसभा मतदारसंघ शतप्रतिशत भाजपमय करण्याचा चंग बांधलेला आहे.

आमदार देवेंद्र कोठे यांच्या या प्रयत्नांना यश येताना दिसत असून उमेदवारी न मिळाल्यामुळे प्रारंभी काहीसे नाराज झालेले भाजपाचे कार्यकर्ते आता मात्र प्रचारात जोरदार सक्रिय झालेले दिसून येत आहेत.

Tags: Bjp Solapurhello solapurMahapalika ElectionMahapalika Newsmla devendra kothepoliticsSolapur bjpsolapur mahapalikasolapur newssolapur politicsसोलापूर न्यूजहॅल्लो सोलापूर
Previous Post

भाजपाच्या जाहीरनाम्याचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांच्या  हस्ते प्रकाशन; ‘या’ गोष्टींना दिले प्राधान्य

Next Post

Godz Casino – Ein moderner Online Glücksspielanbieter im Fokus

Related Posts

सोलापुरात पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या प्रत्येक मतदाराला भाजपाकडून 3 वेळा संपर्क

सोलापुरात पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या प्रत्येक मतदाराला भाजपाकडून 3 वेळा संपर्क

October 20, 2026
पत्रकारितेच्या विद्यार्थ्यांनी घेतली माध्यम संस्थांची क्षेत्रभेट; प्रत्यक्ष अनुभवले वृत्तसंकलनाचे काम

पत्रकारितेच्या विद्यार्थ्यांनी घेतली माध्यम संस्थांची क्षेत्रभेट; प्रत्यक्ष अनुभवले वृत्तसंकलनाचे काम

October 11, 2026
डी-मार्टचे डायरेक्टर एन .भास्करन यांच्या हस्ते एन. एम. वाडिया चॅरिटेबल हॉस्पिटल मधील सर्जिकल युनिटचे लोकार्पण

डी-मार्टचे डायरेक्टर एन .भास्करन यांच्या हस्ते एन. एम. वाडिया चॅरिटेबल हॉस्पिटल मधील सर्जिकल युनिटचे लोकार्पण

August 2, 2026
पंढरपूरच्या कॉरिडॉरबाबत मुख्यमंत्र्यांचे आश्वासन; विठ्ठल-रुक्मिणीच्या साक्षीने दिला शब्द

पंढरपूरच्या कॉरिडॉरबाबत मुख्यमंत्र्यांचे आश्वासन; विठ्ठल-रुक्मिणीच्या साक्षीने दिला शब्द

July 26, 2026
सोलापूर आसावा प्रशालेच्या माजी विद्यार्थ्यांचा 16 वर्षांनंतर पुन्हा भरला शाळेचा वर्ग

सोलापूर आसावा प्रशालेच्या माजी विद्यार्थ्यांचा 16 वर्षांनंतर पुन्हा भरला शाळेचा वर्ग

July 5, 2026
सोलापुरातील आदिला नाल्यावरील रेड अन् ब्लू लाईनचा प्रश्न मार्गी लागणार; पालकमंत्र्यांचा शब्द

सोलापुरातील आदिला नाल्यावरील रेड अन् ब्लू लाईनचा प्रश्न मार्गी लागणार; पालकमंत्र्यांचा शब्द

June 3, 2026
Next Post

Godz Casino – Ein moderner Online Glücksspielanbieter im Fokus

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

50cb978b748ab09b5fb8e767003dc13152007103969f4e7b958730547aecbf52

October 21, 2026

Casino Siteleri Rehberi 2026 — 1704

October 21, 2026

Kocaeli Escort Hizmetleri — 6959

October 20, 2026

Top 5 news

  • अक्कलकोटच्या माजी आमदाराच्या नातवासह तिघांवर गुन्हा दाखल; आमदार कल्याणशेट्टींची बदनामी भोवली

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापुरातील पती-पत्नीच्या आत्महत्येचे कारण उघड; सुसाईड नोटमधून धक्कादायक माहिती समोर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापुरातील 102 नवनिर्वाचित नगरसेवकांची यादी; भाजपचा ऐतिहासिक विजयी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापुरात पती-पत्नीचे मृतदेह आढळले; आत्महत्या की घातपात तपास सुरु

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अनगर नगरपंचायतीत राष्ट्रवादीच्या उज्ज्वला थिटेंचा अर्ज बाद, पण तरीही निवडणूक लागणार?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Hacked by Panataran
  • home
  • trial

© 2025

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In