Thursday, October 22, 2026
  • Login
Hello Solapur
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ
No Result
View All Result
No Result
View All Result
Hello Solapur
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ

ब्रेकिंग : जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांची नागपूरला बदली; ‘हे’ आहेत सोलापूरचे नवे जिल्हाधिकारी

Hello Solapur by Hello Solapur
07-Apr-2026 13:16 pm
in जिल्हा
0
0
SHARES
27
VIEWS

HELLO SOLAPUR | राज्य प्रशासनात मोठा बदल करत सोलापूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांची नागपूर येथे बदली करण्यात आली आहे. नागपूर जिल्हाधिकारी पद रिक्त असल्याने त्या ठिकाणी कुमार आशीर्वाद यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

दरम्यान, सोलापूरच्या जिल्हाधिकारी पदाची जबाबदारी आता एस. कार्तिकेयन यांच्याकडे सोपविण्यात आली आहे.


एस. कार्तिकेयन हे यापूर्वी कोल्हापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) म्हणून कार्यरत होते. प्रशासनातील त्यांचा अनुभव आणि कार्यशैली लक्षात घेता, सोलापूर जिल्ह्याची जबाबदारी त्यांच्याकडे देण्यात आली असल्याचे बोलले जात आहे.


दरम्यान, कुमार आशीर्वाद यांनी सोलापूर जिल्ह्यात कार्यरत असताना अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले. विशेषतः आषाढी वारीचे त्यांनी केलेले नियोजन राज्यभरात चर्चेचा विषय ठरले होते. लाखो वारकऱ्यांच्या उपस्थितीत वारी निर्विघ्न पार पाडण्यासाठी त्यांनी प्रशासनाची प्रभावी मांडणी केली होती.

त्यामुळे त्यांच्या कामकाजाचे विविध स्तरातून कौतुकही करण्यात आले होते.
आता त्यांच्या नागपूर येथील नियुक्तीकडे मोठ्या जबाबदारीच्या दृष्टीने पाहिले जात आहे. नागपूरसारख्या महत्त्वाच्या जिल्ह्यात त्यांचा अनुभव उपयोगी ठरणार असल्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.


दरम्यान, नव्याने नियुक्त झालेले जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांच्याकडून सोलापूर जिल्ह्यात विकासकामांना गती मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. प्रशासनात सातत्य ठेवत नवे उपक्रम राबविण्याचे आव्हान त्यांच्या समोर असणार आहे.


या बदलामुळे सोलापूर जिल्ह्यातील प्रशासकीय पातळीवर नव्या घडामोडींना सुरुवात झाली असून, आगामी काळात त्याचे परिणाम दिसून येणार आहेत.

Tags: Collector Kumar AshirwadCollector officeCollector S KartikeyanRevenue Department solapurSolapur collectorsolapur news
Previous Post

Godz Casino – Gratis-Bonus ohne Einzahlung im Detail

Next Post

Melbet Casino: Kompletní rozbor herního prostředí

Related Posts

सागर गायकवाड यांची स्वराज्य संग्रामच्या युवक आघाडीच्या सोलापूर जिल्हाध्यक्षपदी निवड

सागर गायकवाड यांची स्वराज्य संग्रामच्या युवक आघाडीच्या सोलापूर जिल्हाध्यक्षपदी निवड

October 7, 2026
जनकल्याण मल्टीस्टेटच्या सभासदांना १३ टक्के लाभांश जाहीर; संस्थापक अध्यक्ष राजेंद्र हजारे यांची माहिती

जनकल्याण मल्टीस्टेटच्या सभासदांना १३ टक्के लाभांश जाहीर; संस्थापक अध्यक्ष राजेंद्र हजारे यांची माहिती

August 23, 2026
आमदार राजेंद्र राऊत हे भाजपचे बाजीप्रभू देशपांडे; पालकमंत्री जयकुमार गोरेंकडून कौतुक

आमदार राजेंद्र राऊत हे भाजपचे बाजीप्रभू देशपांडे; पालकमंत्री जयकुमार गोरेंकडून कौतुक

August 3, 2026
डीसीसी बँकेवरून आमदार राजेंद्र राऊतांची आमदार दिलीप सोपलांवर टीका तर राजन पाटलांची मात्र जाहीर माफी

डीसीसी बँकेवरून आमदार राजेंद्र राऊतांची आमदार दिलीप सोपलांवर टीका तर राजन पाटलांची मात्र जाहीर माफी

August 3, 2026
वाडिया हॉस्पिटलमध्ये अत्याधुनिक सुविधा कार्यान्वित; 74 बेड्ससह आधुनिक यंत्रणा सज्ज

वाडिया हॉस्पिटलमध्ये अत्याधुनिक सुविधा कार्यान्वित; 74 बेड्ससह आधुनिक यंत्रणा सज्ज

August 1, 2026
निरा-भीमा नदीवरील नागरिकांना सतर्कतेच्या सूचना; भीमा नदीत 1 लाख 43 हजार क्युसेक्स विसर्ग सोडला

निरा-भीमा नदीवरील नागरिकांना सतर्कतेच्या सूचना; भीमा नदीत 1 लाख 43 हजार क्युसेक्स विसर्ग सोडला

July 31, 2026
Next Post

Melbet Casino: Kompletní rozbor herního prostředí

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

50cb978b748ab09b5fb8e767003dc13152007103969f4e7b958730547aecbf52

October 21, 2026

Casino Siteleri Rehberi 2026 — 1704

October 21, 2026

Kocaeli Escort Hizmetleri — 6959

October 20, 2026

Top 5 news

  • अक्कलकोटच्या माजी आमदाराच्या नातवासह तिघांवर गुन्हा दाखल; आमदार कल्याणशेट्टींची बदनामी भोवली

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापुरातील पती-पत्नीच्या आत्महत्येचे कारण उघड; सुसाईड नोटमधून धक्कादायक माहिती समोर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापुरातील 102 नवनिर्वाचित नगरसेवकांची यादी; भाजपचा ऐतिहासिक विजयी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापुरात पती-पत्नीचे मृतदेह आढळले; आत्महत्या की घातपात तपास सुरु

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अनगर नगरपंचायतीत राष्ट्रवादीच्या उज्ज्वला थिटेंचा अर्ज बाद, पण तरीही निवडणूक लागणार?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Hacked by Panataran
  • home
  • trial

© 2025

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In