Wednesday, October 21, 2026
  • Login
Hello Solapur
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ
No Result
View All Result
No Result
View All Result
Hello Solapur
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ

सोलापूरच्या ‘या’ विकासात्मक प्रश्नांवर आमदार देवेंद्र कोठेंनी विधानसभा गाजवली

Hello Solapur by Hello Solapur
14-Dec-2025 19:49 pm
in शहर
0
0
SHARES
179
VIEWS

HELLO SOLAPUR | नागपूर येथे सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनात शनिवारी अंतिम आठवडा प्रस्तावावर बोलताना सोलापूर शहर विकासाच्या प्रश्नांवर आमदार देवेंद्र कोठे यांनी शनिवारी जोरदार ‘बॅटिंग’ केली. आयटी पार्क, उड्डाणपूल, बी टू जमिनी, डीपी रोड, गोतस्करी, शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय आदी विषयांवर अभ्यासपूर्ण मांडणी करत शासनाचे लक्ष वेधले.

आमदार देवेंद्र कोठे म्हणाले, सोलापूरच्या विमानसेवेचा रखडलेला प्रश्न मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामुळे सोडविला गेला. विमानसेवेमुळे सोलापूर जगाच्या नकाशावर आल्यामुळे सोलापूरचा विकास होण्यास प्रारंभ झाला आहे. सोलापूरला आयटी पार्क मंजूर झाल्यामुळे सोलापूरच्या विकासाची पोकळी भरून निघणार आहे.

सोलापुरातील अनेक चाळींवर चुकीच्या पद्धतीने बी टू लावण्यात आलेला आहे. ब्रिटिश काळापासून अस्तित्वात असलेल्या 100 ते 150 वर्षांपूर्वी तयार झालेल्या 14 मोठ्या चाळींचा पुनर्विकास होणे गरजेचे आहे.

या चाळींमधून 10 हजार नागरिक राहतात. हजारो कामगारांच्या घरांचा प्रश्न असल्यामुळे आणि याकरिता सरकारकडे कोणत्याही निधीची मागणी नसल्यामुळे या चाळींच्या पुनर्विकासासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लक्ष घालून ही समस्या सोडवावी, अशी मागणीही आमदार देवेंद्र कोठे यांनी अधिवेशनात केली.

केंद्र सरकारच्या काही जागा ताब्यात न आल्यामुळे गेल्या 10 वर्षांपूर्वी सोलापूर शहरासाठी मंजूर झालेल्या 2 उड्डाणपूलांच्या कामाला अद्याप सुरुवात झालेली नाही. केंद्र सरकारच्या जागेचे भूसंपादन होण्यासाठी महाराष्ट्र सरकारने पुढाकार घ्यावा आणि लवकरात लवकर उड्डाणपूलांचे काम सुरू करावे, अशी मागणीही आमदार कोठे यांनी केली.

1966 साली सोलापूरला मंजूर झालेले शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय अद्याप सोलापूरला मिळालेले नाही. तत्कालीन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सोलापूरला शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय मंजूर केले आहे. सध्या सुरू असलेल्या शासकीय तंत्रनिकेतनच्या 34 एकर जागेचा आणि उपलब्ध इमारतींचा उपयोग करून 2026 – 2027 या शैक्षणिक वर्षात शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय सोलापूरात सुरु व्हावे.

क वर्ग आणि ड वर्ग महानगरपालिकाच्या हद्दी मध्ये डीपी रोड, रिंग रोड करण्यासाठी निधी उपलब्ध नसल्याल्याच्या नियमाचा फटका सोलापूरला बसत आहे. त्यामुळे महाराष्ट्र शासनाने डीपी रोड करण्यासाठी विशेष योजना आखावी आणि या माध्यमातून 12 मीटरपेक्षा जास्त मोठ्या रस्त्यांचा विकास करावा, अशी मागणीही आमदार देवेंद्र कोठे यांनी केली. शासनातर्फे सोलापूरला मंजूर झालेल्या 100 इलेक्ट्रिकल बस प्राधान्यक्रमाने सोलापूरला मिळाव्यात, असेही आमदार देवेंद्र कोठे याप्रसंगी म्हणाले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणजे ‘इन्फ्रामॅन’ :
आमदार देवेंद्र कोठे यांनी आपल्या भाषणात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा उल्लेख ‘इन्फ्रामॅन’ असा केला. शिक्षण, उद्योग, रोजगार आदी सर्वच क्षेत्रात राज्य सरकार चांगले काम करत आहे. अक्कलकोट रस्ता औद्योगिक वसाहतीत पूर्वीच्या आमदारांनी कोणत्याही सुविधा उपलब्ध करून दिल्या नाहीत. परंतु मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या औद्योगिक वसाहतीसाठी 56 कोटींच्या रस्त्यांना मंजुरी दिली आहे. सरकार राज्यभर करत असलेल्या कामाबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि संपूर्ण मंत्रिमंडळाचे आमदार देवेंद्र कोठे यांनी अभिनंदन करत आभार मानले.

गो तस्करांची गाडी स्क्रॅप करण्याची मागणी :

सोलापूर शहरात मोठ्या प्रमाणावर गोतस्करी होत आहे. ज्या गाडीतून गोतस्करी केल्याबद्दल संबंधित गाडीला दंड लावण्यात आला आहे, अशा गाडीतून पुन्हा एकदा गोतस्करी झाल्यास ती गाडी शासनाने स्क्रॅप करावी, अशी मागणीही आमदार देवेंद्र कोठे यांनी केली.

कर्तव्यदक्षतेबद्दल मानले पालकमंत्र्यांचे आभार :

सीना नदीला गेल्या 70 वर्षांमध्ये यंदा प्रथमच मोठा पूर आला. त्यावेळी पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी पुढाकार घेऊन शेतकरी आणि नागरिकांना शासनाच्या माध्यमातून मोठी मदत केली आहे. त्याबद्दल सोलापूरकरांतर्फे पालकमंत्री जयकुमार गोरे यांचे आमदार देवेंद्र कोठे यांनी आभार मानले.

रात्री १०.३० पर्यंत सभागृहात ठाण मांडून वेधले लक्ष :

हिवाळी अधिवेशनात सोलापूर शहराच्या विकासाचे प्रश्न मांडण्यासाठी आमदार देवेंद्र कोठे हे शनिवारी रात्री १०.३० पर्यंत ठाण मांडून बसले होते. रात्री उशिरा आमदार देवेंद्र कोठे यांनी विविध मुद्दे मांडत सोलापूरकरांच्या मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधले.

Tags: BjpBjp Solapurcm devendra fadanvisDevendra Kothehello solapurMarathi newsmla devendra kotheobc leader meet cm devendra fadanvissolapurSolapur bjpSolapur CitySolapur City Centralsolapur mahapalikasolapur news
Previous Post

Explorer Casino Zer : aperçu détaillé pour les passionnés de casino

Next Post

Casino Godz : Un univers de divertissement à explorer

Related Posts

सोलापुरात पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या प्रत्येक मतदाराला भाजपाकडून 3 वेळा संपर्क

सोलापुरात पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या प्रत्येक मतदाराला भाजपाकडून 3 वेळा संपर्क

October 20, 2026
पत्रकारितेच्या विद्यार्थ्यांनी घेतली माध्यम संस्थांची क्षेत्रभेट; प्रत्यक्ष अनुभवले वृत्तसंकलनाचे काम

पत्रकारितेच्या विद्यार्थ्यांनी घेतली माध्यम संस्थांची क्षेत्रभेट; प्रत्यक्ष अनुभवले वृत्तसंकलनाचे काम

October 11, 2026
डी-मार्टचे डायरेक्टर एन .भास्करन यांच्या हस्ते एन. एम. वाडिया चॅरिटेबल हॉस्पिटल मधील सर्जिकल युनिटचे लोकार्पण

डी-मार्टचे डायरेक्टर एन .भास्करन यांच्या हस्ते एन. एम. वाडिया चॅरिटेबल हॉस्पिटल मधील सर्जिकल युनिटचे लोकार्पण

August 2, 2026
पंढरपूरच्या कॉरिडॉरबाबत मुख्यमंत्र्यांचे आश्वासन; विठ्ठल-रुक्मिणीच्या साक्षीने दिला शब्द

पंढरपूरच्या कॉरिडॉरबाबत मुख्यमंत्र्यांचे आश्वासन; विठ्ठल-रुक्मिणीच्या साक्षीने दिला शब्द

July 26, 2026
सोलापूर आसावा प्रशालेच्या माजी विद्यार्थ्यांचा 16 वर्षांनंतर पुन्हा भरला शाळेचा वर्ग

सोलापूर आसावा प्रशालेच्या माजी विद्यार्थ्यांचा 16 वर्षांनंतर पुन्हा भरला शाळेचा वर्ग

July 5, 2026
सोलापुरातील आदिला नाल्यावरील रेड अन् ब्लू लाईनचा प्रश्न मार्गी लागणार; पालकमंत्र्यांचा शब्द

सोलापुरातील आदिला नाल्यावरील रेड अन् ब्लू लाईनचा प्रश्न मार्गी लागणार; पालकमंत्र्यांचा शब्द

June 3, 2026
Next Post

Casino Godz : Un univers de divertissement à explorer

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

50cb978b748ab09b5fb8e767003dc13152007103969f4e7b958730547aecbf52

October 21, 2026

Casino Siteleri Rehberi 2026 — 1704

October 21, 2026

Kocaeli Escort Hizmetleri — 6959

October 20, 2026

Top 5 news

  • अक्कलकोटच्या माजी आमदाराच्या नातवासह तिघांवर गुन्हा दाखल; आमदार कल्याणशेट्टींची बदनामी भोवली

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापुरातील पती-पत्नीच्या आत्महत्येचे कारण उघड; सुसाईड नोटमधून धक्कादायक माहिती समोर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापुरातील 102 नवनिर्वाचित नगरसेवकांची यादी; भाजपचा ऐतिहासिक विजयी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापुरात पती-पत्नीचे मृतदेह आढळले; आत्महत्या की घातपात तपास सुरु

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अनगर नगरपंचायतीत राष्ट्रवादीच्या उज्ज्वला थिटेंचा अर्ज बाद, पण तरीही निवडणूक लागणार?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Hacked by Panataran
  • home
  • trial

© 2025

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In