Sunday, March 1, 2026
  • Login
Hello Solapur
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ
No Result
View All Result
No Result
View All Result
Hello Solapur
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ

3 वर्षीय चिमुकल्याची आईच्या कथित प्रियकराकडून हत्या; हत्येचे कारण ऐकून व्हाल थक्क

Hello Solapur by Hello Solapur
23-Dec-2025 20:19 pm
in क्राईम
0
0
SHARES
64
VIEWS

HELLO SOLAPUR | सोलापुरातील एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कोंडानगर परिसरात एका तीन वर्षांच्या चिमुकल्याची अतिशय अमानुष आणि धक्कादायक हत्या झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. प्रेयसीच्या तीन वर्षीय मुलाची कथित प्रियकराने गळा दाबून हत्या केल्याचे पोस्टमार्टम अहवालातून स्पष्ट झाले आहे.


मृत चिमुकल्याचे नाव फरहान असून, आरोपीचे नाव मौलाली उर्फ अकबर अब्दुल रज्जाक मुल्ला असे आहे. या प्रकरणी फरहानची आई शैनाज जफर शेख यांनी सोलापूरच्या एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.


नेमकं काय घडलं?
मिळालेल्या माहितीनुसार, 11 डिसेंबर रोजी आरोपी मौलाली उर्फ अकबर हा दारू पिऊन घरी आला होता. त्यावेळी तो झोपलेला असताना त्याच्या शेजारी 3 वर्षांचा फरहान झोपला होता. झोपेत फरहानची विष्ठा आरोपीच्या कपड्याला लागल्याने आरोपीला राग अनावर झाला. याच रागातून आरोपीने चिमुकल्या फरहानला बेदम मारहाण करत गळा दाबून ठार केल्याचा आरोप आहे.


मृत्यू लपवण्याचा प्रयत्न :
घटनेनंतर शैनाज घरी आल्यानंतर आरोपी मौलालीने फरहान खाली पडल्यामुळे बेशुद्ध झाल्याचे खोटे कारण सांगितले. त्यानंतर फरहानला एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरांनी तात्काळ शासकीय रुग्णालयात घेऊन जाण्याचा सल्ला दिला.


याच दरम्यान आरोपी मौलाली आणि शैनाज दोघेही कर्नाटकातील विजयपूर येथे एसटी स्टँडवर गेले. तेथे आरोपी मौलाली पळून गेला. त्यानंतर शैनाज हिने पहिल्या पतीच्या मदतीने फरहानला विजयपूर येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी फरहानला मृत घोषित केले.


पोस्टमार्टम अहवालातून धक्कादायक खुलासा :
विजयपूर येथील शासकीय रुग्णालयात करण्यात आलेल्या पोस्टमार्टम अहवालात फरहानचा मृत्यू गळा दाबून झाल्याचे स्पष्ट झाले. यानंतर या प्रकरणाला गंभीर वळण लागले.


प्रथम विजयपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र गुन्हा सोलापुरात घडल्याने पुढील तपासासाठी प्रकरण सोलापूर एमआयडीसी पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आले.


आरोपी अटकेत
एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रमोद वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी आरोपी मौलाली उर्फ अकबर अब्दुल रज्जाक मुल्ला याला अटक केली आहे. पुढील तपास सुरू असून आरोपीविरोधात गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.


कुटुंबाची पार्श्वभूमी :
शैनाज आणि आरोपी मौलाली हे मूळचे कर्नाटकातील विजयपूर येथील रहिवासी असून गेल्या काही महिन्यांपासून सोलापुरात वास्तव्यास होते. शैनाज ही धुणेभांडी करून उदरनिर्वाह करत होती, तर आरोपी मौलाली हा बिगारी कामगार म्हणून काम करत होता. शैनाजला एकूण चार मुले असून फरहान हा सर्वात लहान मुलगा होता.
ही घटना संपूर्ण सोलापूर शहराला हादरवून टाकणारी असून, एका निष्पाप चिमुकल्याचा झालेला अंत समाजमन सुन्न करणारा आहे.

Tags: Breaking newshello solapurMarathi newsMIDC Police stationsolapurSolapur city crime branchSolapur crimesolapur news
Previous Post

नगरपंचायत निवडणुकीत भाजपचे राज्यातील पहिले कमळ फुलले; अनगर नगरपंचायत अखेर बिनविरोध

Next Post

सोलापुरात राष्ट्रवादी अजित पवार गटाला मोठा धक्का; दोन हुकमी एक्के भाजपात गेले

Related Posts

सोलापुरातील पती-पत्नीच्या आत्महत्येचे कारण उघड; सुसाईड नोटमधून धक्कादायक माहिती समोर

February 28, 2026

सोलापुरात पती-पत्नीचे मृतदेह आढळले; आत्महत्या की घातपात तपास सुरु

February 27, 2026

सोलापुरात 3 तरुणांचा अपघाती मृत्यू; 3 पैकी 1 गोसेवक असल्याने अपघात की घातपात?

February 16, 2026

सोलापुरात 62 लाखांची ऑनलाईन फसवणूक करणारा टोळी प्रमुखाला सोलापूर पोलिसांनी ठोकल्या बेड्या

February 14, 2026

ब्रेकिंग : अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून जबरदस्ती धर्मांतर व लग्न; वकिलासह पाच जणांविरोधात गुन्हा, तिघांना अटक

February 5, 2026

पंढरपूर–मंगळवेढा रस्त्यावर भीषण अपघात; 4 भाविकांचा मृत्यू, ६ गंभीर जखमी

January 26, 2026
Next Post

सोलापुरात राष्ट्रवादी अजित पवार गटाला मोठा धक्का; दोन हुकमी एक्के भाजपात गेले

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सोलापुरातील पती-पत्नीच्या आत्महत्येचे कारण उघड; सुसाईड नोटमधून धक्कादायक माहिती समोर

February 28, 2026

सोलापुरात पती-पत्नीचे मृतदेह आढळले; आत्महत्या की घातपात तपास सुरु

February 27, 2026

राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) च्या राष्ट्रीय अध्यक्षपदी सुनेत्रा पवार यांची एकमताने निवड

February 26, 2026

Top 5 news

  • अक्कलकोटच्या माजी आमदाराच्या नातवासह तिघांवर गुन्हा दाखल; आमदार कल्याणशेट्टींची बदनामी भोवली

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापुरातील 102 नवनिर्वाचित नगरसेवकांची यादी; भाजपचा ऐतिहासिक विजयी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापुरात पती-पत्नीचे मृतदेह आढळले; आत्महत्या की घातपात तपास सुरु

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अनगर नगरपंचायतीत राष्ट्रवादीच्या उज्ज्वला थिटेंचा अर्ज बाद, पण तरीही निवडणूक लागणार?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापुरात 3 तरुणांचा अपघाती मृत्यू; 3 पैकी 1 गोसेवक असल्याने अपघात की घातपात?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • home

© 2025

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!

WhatsApp Share