Friday, April 17, 2026
  • Login
Hello Solapur
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ
No Result
View All Result
No Result
View All Result
Hello Solapur
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ

पंढरपूर–मंगळवेढा रस्त्यावर भीषण अपघात; 4 भाविकांचा मृत्यू, ६ गंभीर जखमी

Hello Solapur by Hello Solapur
26-Jan-2026 21:35 pm
in क्राईम
0
0
SHARES
644
VIEWS

HELLO SOLAPUR |देवदर्शनासाठी आलेल्या भाविकांच्या वाहनाला अपघात झाल्याने 4 भाविकांचा अपघाती मृत्यू झाला आहे. पंढरपूर–मंगळवेढा रस्त्यावर आज सकाळी शरद नगरजवळ भीषण अपघात झाला.

कंटेनर आणि क्रुझर वाहनाची समोरासमोर जोरदार धडक होऊन 4 भाविकांचा मृत्यू झाला असून 6 जण गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली.

तुळजापूर आणि अक्कलकोट येथे देवदर्शन करून परत येणाऱ्या भाविकांच्या वाहनाला हा अपघात झाला आहे. हे सर्व भाविक ठाण्यातील एका खाजगी कंपनीतील कर्मचारी असून सुट्टी निमित्त कुटुंबीयांसह फिरण्यासाठी आले होते. अपघातातील सर्व भाविक डोंबिवली परिसरातील रहिवासी असल्याची माहिती समोर आली आहे.

अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये एका १४ वर्षांच्या अल्पवयीन मुलाचा समावेश असल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे. गंभीर जखमी झालेल्या सहा जणांना तातडीने पंढरपूर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

विशेष म्हणजे हे भाविक आज रात्री साडेनऊ वाजता पंढरपूरहून मुंबईकडे रेल्वेने रवाना होणार होते. मात्र त्यापूर्वीच हा दुर्दैवी अपघात घडला.

अपघातानंतर काही काळ पंढरपूर–मंगळवेढा मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून अपघाताचे नेमके कारण शोधण्यासाठी पुढील तपास सुरू आहे.

दरम्यान, या भीषण अपघातामुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली असून मृतांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

Tags: AccidentBreaking newshello solapurMarathi newsPandharpur Newssolapur newssolapur update
Previous Post

सोलापुरातील माजी आमदाराचा मुलीच्या ‘शाही विवाहाच्या थाटा’ला फाटा; खर्च टाळून विनाअनुदानित शिक्षकांच्या मुलांच्या शिक्षणासाठी मदतीचा हात !

Next Post

BREAKING | उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर सुनेत्रा पवारांची पहिली प्रतिक्रिया!

Related Posts

ब्रेकिंग : पंढरपूरमधील ॲसिड हल्ला प्रकरणात धक्कादायक वळण; तरुणीने स्वतःच ॲसिड ओतले….

April 13, 2026

सोलापूर जिल्ह्यात अज्ञातांनी तरुणीवर ॲसिड फेकले

April 12, 2026

दगड खाणीत बुडालेल्या यशचा मृतदेह चौथ्या दिवशी पाण्यावर; यशच्या मृत्यूला प्रशासन जबाबदार?

March 15, 2026

घरगुती गॅसच्या अवैध विक्रीप्रकरणी सोलापूर जिल्ह्यात पहिला गुन्हा दाखल; सिलेंडर देणाऱ्या एजन्सीचाही शोध सुरु

March 12, 2026

कर्नाटकमध्ये सोशल मीडियावर बंदी; मुख्यमंत्र्यांनी घेतला मोठा निर्णय

March 6, 2026

BREAKING सोलापूर बांधकाम कामगार शिष्यवृत्ती घोटाळ्यातील 20 जणांवर गुन्हा दाखल

March 5, 2026
Next Post

BREAKING | उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर सुनेत्रा पवारांची पहिली प्रतिक्रिया!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

शिवसेना झेडपी सदस्यांनीच केली म्हेत्रे गटाची राजकीय कोंडी; ‘मैत्रीसाठी माघार’चे कारण देत तलवार म्यान

April 16, 2026

सोलापूर शिवसेनेची शाखाप्रमुख ते जिल्हाप्रमुख सर्वच कार्यकारिणी बरखास्त

April 15, 2026

ब्रेकिंग : पंढरपूरमधील ॲसिड हल्ला प्रकरणात धक्कादायक वळण; तरुणीने स्वतःच ॲसिड ओतले….

April 13, 2026

Top 5 news

  • अक्कलकोटच्या माजी आमदाराच्या नातवासह तिघांवर गुन्हा दाखल; आमदार कल्याणशेट्टींची बदनामी भोवली

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापुरातील पती-पत्नीच्या आत्महत्येचे कारण उघड; सुसाईड नोटमधून धक्कादायक माहिती समोर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापुरातील 102 नवनिर्वाचित नगरसेवकांची यादी; भाजपचा ऐतिहासिक विजयी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापुरात पती-पत्नीचे मृतदेह आढळले; आत्महत्या की घातपात तपास सुरु

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अनगर नगरपंचायतीत राष्ट्रवादीच्या उज्ज्वला थिटेंचा अर्ज बाद, पण तरीही निवडणूक लागणार?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • home
  • trial

© 2025

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In