Sunday, March 1, 2026
  • Login
Hello Solapur
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ
No Result
View All Result
No Result
View All Result
Hello Solapur
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ

आमदार देवेंद्र कोठेंची काँग्रेसच्या प्रणिती शिंदेंवर टीका; आमदार कोठे-कल्याणशेट्टी जोडीने प्रभाग 11 गाजवला

Hello Solapur by Hello Solapur
10-Jan-2026 10:57 am
in शहर
0
0
SHARES
203
VIEWS

HELLO SOLAPUR | सोलापूर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपकडून प्रचाराचा जोर वाढला असून, प्रभाग क्रमांक ११ मधील राजीव नगर येथे झालेल्या सभेत आमदार सचिन कल्याणशेट्टी आणि आमदार देवेंद्र कोठे यांच्या उपस्थितीत नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहायला मिळाला.



लिंगायत समाजाचे प्राबल्य असलेल्या या भागात झालेल्या सभेत कोठे–कल्याणशेट्टी जोडीच्या विकासाभिमुख भूमिकेने नागरिकांची मने जिंकली.

रस्ते, ड्रेनेज, पाणीपुरवठा यांसारख्या मूलभूत सुविधांसाठी प्रभाग क्रमांक ११ मध्ये १२ कोटी रुपयांची विकासकामे मंजूर करण्यात आली असून, त्यापैकी ९ कोटी रुपयांची कामे सध्या सुरू आहेत.

भविष्यातही प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी भरघोस निधी उपलब्ध करून दिला जाईल, असे ठोस अभिवचन आमदार सचिन कल्याणशेट्टी आणि आमदार देवेंद्र कोठे यांनी यावेळी दिले.

यावेळी या कॉर्नर सभेला व्यासपीठावर आमदार सचिन कल्याणशेट्टी, आमदार देवेंद्र कोठे, गुरुशांत धुत्तरगावकर, उमेदवार युवराज सरवदे, शारदाबाई रामपुरे, मीनाक्षी कडगंची, अजय पोन्नम, राजकुमार हंचाटे, प्रकाश म्हंता, गणेश चवरे यांची प्रमुख उपस्थिती होती.

कन्नड भाषेत संवाद साधत जिंकली मनं :

आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी यावेळी कन्नड भाषेतून नागरिकांशी थेट संवाद साधला. आमदार देवेंद्र कोठे यांच्या नेतृत्वाखाली प्रभाग क्रमांक ११ सह शहर मध्य मतदारसंघात मोठ्या प्रमाणावर विकासकामे झाली असल्याचे त्यांनी सांगितले.

सोलापूर शहरात विमानसेवा, आयटी पार्क, समांतर जलवाहिनी, समतोल पाणीपुरवठ्यासाठी ८९२ कोटी रुपयांची योजना अशी अनेक महत्त्वाची विकासकामे मार्गी लागल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

भविष्यातही विकासाची गती कायम राहणार असून, प्रभाग क्रमांक ११ सह सोलापूर शहरातील भाजपच्या सर्व उमेदवारांना निवडून देण्याचे आवाहन आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी नागरिकांना केले.

१४७ कोटींचा निधी, कामे प्रगतीपथावर – आमदार देवेंद्र कोठे :
आमदार देवेंद्र कोठे यांनी आपल्या भाषणात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली शहर मध्य विधानसभा मतदारसंघासाठी १४७ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाल्याचे सांगितले. यातील कोट्यवधी रुपयांची कामे सध्या प्रगतीपथावर आहेत.

काँग्रेसच्या तत्कालीन आमदार प्रणिती शिंदे यांना त्यांच्या १५ वर्षांच्या कार्यकाळातही एवढा निधी मिळाला नव्हता, असा आरोप करत, “खासदार प्रणिती शिंदे यांनी प्रभाग क्रमांक ११ मध्ये किमान ९० लाख रुपयांचा निधी तरी दिला आहे का?” असा सवाल आमदार कोठे यांनी उपस्थित केला.

भाजपच्या चारही उमेदवारांना निवडून देण्याचे आवाहन “आपण संघटित राहिलो तर अंगणातील तुळस आणि देवळावरील कळस सुरक्षित राहील. एमआयएमसारख्या पक्षाला डोक्यावर बसवून घेणे परवडणारे नाही.”

पुढे प्रभाग क्रमांक ११ मधील भाजपच्या चारही उमेदवारांना प्रचंड मताधिक्याने निवडून देण्याचे आवाहन आमदार देवेंद्र कोठे यांनी केले.


मकर संक्रांतीपूर्वी लाडक्या बहिणींना मिळणार ३ हजार रुपये :

लाडकी बहीण योजना बंद होणार असल्याचा खोटा प्रचार काँग्रेस व विरोधकांकडून करण्यात येत असल्याचा आरोप आमदार देवेंद्र कोठे यांनी केला. ही योजना सुरू असून भविष्यातही सुरूच राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

यंदाच्या मकर संक्रांतीपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारकडून लाडक्या बहिणींना ३ हजार रुपये मिळणार असल्याची घोषणा त्यांनी केली. तसेच सोलापूर महानगरपालिकेवर सत्ता आल्यानंतर लाडक्या बहिणींना मिळणारी रक्कम १,५०० रुपयांवरून २,१०० रुपये करण्याची मागणी करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

Tags: Bjp SolapurDevendra Kothehello solapurMahapalika Electionmla devendra kotheMla Sachin KalyanshettyPraniti ShindeSolapur bjpSolapur Mahapalika Election 2026solapur politicsSolapur Prabhag 11
Previous Post

सोलापुरात उद्या देवेंद्र फडणवीसांची तोफ धडाडणार; आयटी पार्कनंतर सोलापूर आता काय मिळणार?

Next Post

आमदार देवेंद्र कोठेंच्या धर्मपत्नी मोनिका कोठे प्रचाराच्या मैदानात; प्रभाग २१, १५ मध्ये महिला कार्यकर्त्यांचा सहभाग

Related Posts

आमदार देवेंद्र कोठेंनी ‘या’ महत्वाच्या विषयावर विधानसभेचे लक्ष वेधले; सर्व स्तरातून होतेय कौतुक

February 26, 2026

सोलापूर महापालिकेकडून संत गाडगेबाबा महाराजांच्या जयंतीनिमित्त अभिवादन

February 24, 2026

सोलापूरच्या स्वीकृत सदस्य निवडीत पालकमंत्र्यांचा मास्टर स्ट्रोक; एकीकडे निष्ठावंतांना संधी दुसरीकडे भविष्याचा विचार

February 23, 2026

मुख्यमंत्री फडणवीसांनी सोलापूरकरांना दिलेला शब्द पाळला; आयटी पार्कसाठी 50 एकर जमीन देण्याचे आदेश

February 23, 2026

मराठी पत्रकार संघाच्या वतीने मोफत हृदयरोग तपासणी शिबिर संपन्न

February 21, 2026

आई प्रतिष्ठानचे कार्य लोककल्याणाचे; मंत्री चंद्रकांत पाटलांचे मोफत कौशल्य विकास केंद्राच्या उदघाटनावेळी गौरवोद्गार

February 18, 2026
Next Post

आमदार देवेंद्र कोठेंच्या धर्मपत्नी मोनिका कोठे प्रचाराच्या मैदानात; प्रभाग २१, १५ मध्ये महिला कार्यकर्त्यांचा सहभाग

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सोलापुरातील पती-पत्नीच्या आत्महत्येचे कारण उघड; सुसाईड नोटमधून धक्कादायक माहिती समोर

February 28, 2026

सोलापुरात पती-पत्नीचे मृतदेह आढळले; आत्महत्या की घातपात तपास सुरु

February 27, 2026

राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) च्या राष्ट्रीय अध्यक्षपदी सुनेत्रा पवार यांची एकमताने निवड

February 26, 2026

Top 5 news

  • अक्कलकोटच्या माजी आमदाराच्या नातवासह तिघांवर गुन्हा दाखल; आमदार कल्याणशेट्टींची बदनामी भोवली

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापुरातील 102 नवनिर्वाचित नगरसेवकांची यादी; भाजपचा ऐतिहासिक विजयी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापुरात पती-पत्नीचे मृतदेह आढळले; आत्महत्या की घातपात तपास सुरु

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अनगर नगरपंचायतीत राष्ट्रवादीच्या उज्ज्वला थिटेंचा अर्ज बाद, पण तरीही निवडणूक लागणार?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापुरात 3 तरुणांचा अपघाती मृत्यू; 3 पैकी 1 गोसेवक असल्याने अपघात की घातपात?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • home

© 2025

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!

WhatsApp Share