Sunday, November 22, 2026
  • Login
Hello Solapur
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ
No Result
View All Result
No Result
View All Result
Hello Solapur
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ

आंतरराष्ट्रीय वक्त्या बी. के. शिवानीदीदी सोलापुरात; ‘सरल मन सरल जीवन’ कार्यक्रमात मार्गदर्शन करणार

Hello Solapur by Hello Solapur
14-Nov-2026 15:07 pm
in जिल्हा
0
आंतरराष्ट्रीय वक्त्या बी. के. शिवानीदीदी सोलापुरात; ‘सरल मन सरल जीवन’ कार्यक्रमात मार्गदर्शन करणार
0
SHARES
2
VIEWS

HELLO SOLAPUR NEWS | प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्‍वरीय विश्‍वविद्यालय सोलापूर यांच्या वतीने सरल मन सरल जीवन या विषयावर आंतरराष्ट्रीय प्रेरणादायी वक्त्या आणि राजयोग शिक्षिका बी के शिवानीदीदी यांचे मुख्य प्रवचन गुरूवार दि. 19 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 5.30 वाजता हरिभाई देवकरण प्रशालेच्या मैदानावर आयोजित करण्यात आल्याची माहिती बी के प्रदीपभाई शिंगवी, बी के प्रज्ञादीदी, बी के अनितादीदी, डॉ. नंदा भट्टड यांनी पत्रकार परिषदेत दिली. या कार्यक्रमासाठी नोंदणी आवश्यक असून सर्वांसाठी मोफत प्रवेश ठेवण्यात आल्याचे तसेच हा कार्यक्रम वेळेवर सुरू करण्यात येणार असल्याचेही यावेळी सांगण्यात आले.


मनाला शांती, जीवनाला समृध्द बनवण्यासाठी आध्यात्माची गरज निर्माण झालेली असताना योग्य व्यासपीठ आणि मार्ग मिळत नाही हेच ओळखून प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्‍वरीय विश्‍वविद्यालय सोलापूरच्या वतीने सरल मन सरल जीवन या या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. आजच्या धावपळीच्या जगात ताणतणाव वाढत असताना प्रत्येक मनुष्याला मनःशांती,जीवन आनंदी ठेवण्यासाठी आणि समाधानासाठी मोठे आव्हान निर्माण झाले असताना विचार सकारात्मक आणि आध्यात्मिक दृष्टीकोनाची प्रेरणा देणारा ईजी माईंड ईजी लाईफ या कार्यक्रमामध्ये आंतरराष्ट्रीय प्रेरणादायी वक्त्या, राजयोग शिक्षिका बी के शिवानीदीदी या सहभागी होवून उपस्थितांना मार्गदर्शन करणार आहेत.

मनातील नकारात्मक विचारावर मात करून शांत, संतुलित आणि आनंदी जीवन जगण्याची प्रेरणा त्यांच्या मार्गदर्शनातून मिळणार आहे. मनःशांती,तणावमुक्त जीवन, सकारात्मक विचार, भावनिक बुध्दीमत्ता, स्व व्यवस्थापन, नातेसंबधातील सुसंवाद, कर्मसिध्दांत,आत्मसन्मान, आत्मविश्‍वास आणि आत्मपरिवर्तन अशा विविध विषयावर बी के शिवानीदीदी या आध्यात्मिक प्रेरणादायी मार्गदर्शन करणार आहेत. असेही यावेळी सांगण्यात आले.

हा कार्यक्रम गुरूवार दि. 19 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 5.30 ते रात्री 8 या वेळेत हरिभाई देवकरण प्रशालेच्या मैदानावर होणार आहे. या कार्यक्रमासाठी www.mahapanchayat.in/shriji या संकेतस्थळावर पूर्वनोंदणी आवश्यक असून नोंदणी झाली नसली तरी सर्वांसाठी हा कार्यक्रम मोफत ठेवण्यात आला आहे. अधिक माहितीसाठी 8669163372 किंवा 7774998877 या नंबरवर संपर्क करावे आणि कार्यक्रमाला मोठ्यासंख्येने सहभागी व्हावे असे आवाहनही यावेळी करण्यात आले.यावेळी  बी के पूनमदीदी, बी के शिवराजभाई मजगे उपस्थित होते.

मेडिटेशनसाठी तीन दिवसीय शिबीर
दि.20,21 आणि 22 नोव्हेंबर 2026 या तीन दिवशी सकाळी 7 ते 8 आणि सायंकाळी 6.30 ते 7.30 या वेळेत शिवछत्रपती रंगभवन या ठिकाणी मेडिटेशनचा जादुई प्रभाव हे तीन दिवसीय शिबीर घेण्यात येणार आहे. यामध्ये बी के डॉ.दामिनीदीदी या मार्गदर्शन करणार आहेत. या शिबीरालाही सोलापूरकरांनी मोठ्यासंख्येने उपस्थित राहावे असेही यावेळी सांगण्यात आले.

Tags: abp majhaB K Shivani didihello solapuribn Lokmatlokmatsolapursolapur newsSpiritual Lecturetv9 Marathizee 24 taas
Previous Post

Hacked By Chinafans

Related Posts

सोलापूर ब्रेकिंग : आणीबाणी लादणारे लोकशाहीच्या गप्पा मारतात; जयकुमार गोरेंचा काँग्रेसवर हल्लाबोल

सोलापूर ब्रेकिंग : आणीबाणी लादणारे लोकशाहीच्या गप्पा मारतात; जयकुमार गोरेंचा काँग्रेसवर हल्लाबोल

October 26, 2026
निरा-भीमा नदीवरील नागरिकांना सतर्कतेच्या सूचना; भीमा नदीत 1 लाख 43 हजार क्युसेक्स विसर्ग सोडला

ब्रेकिंग : उजनी धरणातून पिण्यासाठी पाणी सोडले; नागरिकांना दिलासा

October 24, 2026
दुष्काळ व शेतकरी आत्महत्या विषयावर 100 कीर्तनातून जागृती करणार : सुधाकर इंगळे महाराज

दुष्काळ व शेतकरी आत्महत्या विषयावर 100 कीर्तनातून जागृती करणार : सुधाकर इंगळे महाराज

October 22, 2026
सागर गायकवाड यांची स्वराज्य संग्रामच्या युवक आघाडीच्या सोलापूर जिल्हाध्यक्षपदी निवड

सागर गायकवाड यांची स्वराज्य संग्रामच्या युवक आघाडीच्या सोलापूर जिल्हाध्यक्षपदी निवड

October 7, 2026
जनकल्याण मल्टीस्टेटच्या सभासदांना १३ टक्के लाभांश जाहीर; संस्थापक अध्यक्ष राजेंद्र हजारे यांची माहिती

जनकल्याण मल्टीस्टेटच्या सभासदांना १३ टक्के लाभांश जाहीर; संस्थापक अध्यक्ष राजेंद्र हजारे यांची माहिती

August 23, 2026
आमदार राजेंद्र राऊत हे भाजपचे बाजीप्रभू देशपांडे; पालकमंत्री जयकुमार गोरेंकडून कौतुक

आमदार राजेंद्र राऊत हे भाजपचे बाजीप्रभू देशपांडे; पालकमंत्री जयकुमार गोरेंकडून कौतुक

August 3, 2026

ताज्या बातम्या

आंतरराष्ट्रीय वक्त्या बी. के. शिवानीदीदी सोलापुरात; ‘सरल मन सरल जीवन’ कार्यक्रमात मार्गदर्शन करणार

आंतरराष्ट्रीय वक्त्या बी. के. शिवानीदीदी सोलापुरात; ‘सरल मन सरल जीवन’ कार्यक्रमात मार्गदर्शन करणार

November 14, 2026

Hacked By Chinafans

November 12, 2026
सोलापुरात निरूपणकार विवेक घळसासी यांचे 30 ऑक्टोंबरपासून निरूपण

सोलापुरात निरूपणकार विवेक घळसासी यांचे 30 ऑक्टोंबरपासून निरूपण

October 26, 2026

Top 5 news

  • अक्कलकोटच्या माजी आमदाराच्या नातवासह तिघांवर गुन्हा दाखल; आमदार कल्याणशेट्टींची बदनामी भोवली

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापुरातील पती-पत्नीच्या आत्महत्येचे कारण उघड; सुसाईड नोटमधून धक्कादायक माहिती समोर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापुरातील 102 नवनिर्वाचित नगरसेवकांची यादी; भाजपचा ऐतिहासिक विजयी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापुरात पती-पत्नीचे मृतदेह आढळले; आत्महत्या की घातपात तपास सुरु

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अनगर नगरपंचायतीत राष्ट्रवादीच्या उज्ज्वला थिटेंचा अर्ज बाद, पण तरीही निवडणूक लागणार?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • home
  • trial

© 2025

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In