Sunday, March 1, 2026
  • Login
Hello Solapur
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ
No Result
View All Result
No Result
View All Result
Hello Solapur
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ

अक्कलकोटचे माजी आमदार सिद्रामप्पा पाटील यांचे निधन; सोलापुरातील नेत्यांकडून शोक संदेश

Hello Solapur by Hello Solapur
14-Nov-2025 09:21 am
in जिल्हा
0
0
SHARES
187
VIEWS

HELLO SOLAPUR | अक्कलकोट तालुक्याचे माजी आमदार तथा भाजपचे ज्येष्ठ नेते, सहकारातील खंबीर नेतृत्व सिद्रामप्पा पाटील यांचे दुःखद निधन झाले. गुरुवारी रात्री अल्पशा आजाराने  सोलापुरातील खाजगी रुग्णालयात त्यांची प्राणज्योत मालवली.

सिद्रामप्पा पाटील यांनी वयाच्या ८८ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनानं अक्कलकोट तालुक्यासह राजकीय, सामाजिक अन सहकार क्षेत्रावर शोककळा पसरली आहे. अक्कलकोट तालुक्यातील कुमठे इथं शुक्रवारी दुपारी 3 वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

सिद्रामप्पा पाटील यांच्या निधनाचं वृत्त समजताच राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्यासह अनेक नेत्यांनी आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांनी तीव्र शोक व्यक्त करत श्रद्धांजली अर्पण केली.

सिद्रामप्पा पाटील यांनी प्रतिकूल परिस्थितीत मोठा संघर्ष उभा करून अक्कलकोट तालुक्यात भाजपाची बांधणी केली होती. अक्कलकोट तालुका भाजपमय करण्यासाठी शर्थिचे प्रयत्न केले.

सहकार क्षेत्रातील त्यांचं कार्य हे सामान्यजन आणि शेतकऱ्यांना दिलासा देणारे होते. शेतकरी केंद्रस्थानी ठेऊन आयुष्यभर त्यांच्यासाठी झटणारं एक खंबीर नेतृत्व आज काळाच्या पडद्याआड गेलं अशी भावना व्यक्त करण्यात आली.

गावच्या सरपंचपदापासून पंचायत समिती सभापती, जिल्हा परिषद उपाध्यक्ष, सोलापूर जिल्हा बँकेचे सलग 35 वर्षे संचालक, एकवेळ उपाध्यक्ष तसंच श्री स्वामी समर्थ सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष, मार्केट कमिटी सभापती तालुक्याचे आमदार असा सिद्रामप्पा पाटील यांचा कर्तृत्ववान राजकीय प्रवास राहिला आहे.

अक्कलकोट तालुक्याच्या सर्वांगीण विकासात त्यांचा सिंहाचा वाटा राहिला. या दरम्यान अनेक दिग्गज नेत्यांशी सिद्रामप्पा पाटील यांची जवळीक राहिली आहे. भाजप नेते स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांचे ते कट्टर समर्थक मानले जात होते.

वयाच्या ८७  व्या वर्षापर्यंत सिद्रामप्पा पाटील यांचं राजकीय आणि सामाजिक कार्य अखंड पणे सुरु होत. गेल्या काही दिवसापासून त्यांना आजाराने ग्रासलं होतं दरम्यान सोलापुरातील अश्विनी रुग्णालयात उपचार सुरु असताना रात्री 8 वाजून 17 मिनिटांनी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

त्यांच्या निधनानंतर माजी केंद्रीय गृहमंत्री सुशील कुमार शिंदे, अक्कलकोटचे भाजप आमदार सचिन कल्याणशेट्टी, माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांनीही दुःख व्यक्त केलेय.

सचिन कल्याणशेट्टी, आमदार अक्कलकोट.

अक्कलकोट विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार सिद्रामप्पा पाटील यांच्या निधनाची बातमी अतिशय दुःखद आणि वेदनादायी आहे. त्यांच्या निधनाने अक्कलकोट तालुक्याने सहकार क्षेत्रातील अनुभवी नेता गमावला आहे. ईश्वर त्यांच्या आत्म्यास चिरशांती देवो, तसेच पाटील कुटुंबियांना या दुःखातून सावरण्याची शक्ती देवो, हीच श्री स्वामींचरणी प्रार्थना.
ॐ शांती 🙏

सुशीलकुमार शिंदे, माजी मुख्यमंत्री

स्वर्गीय सिद्रामप्पा (आप्पा ) पाटील यांच्या निधनाची बातमी ऐकून दुःख झाले. पूर्वी ते आमच्या सोबत काँग्रेस पक्षामध्ये सक्रिय होते. मध्यंतरीच्या काळात भारतीय जनता पार्टीमध्ये गेले. तरीही ते आमच्याशी त्यांचे सलोख्याचे संबंध होते. ते स्पष्ट वक्ते होते. मनात काही ठेवत नव्हते. जे असेल ते बोलून दाखवायचे. असा त्यांचा स्वभाव होता. लोकसभेच्या निवडणुकीत प्रणितीताई शिंदे यांचा इतक्या वयातही त्यांनी प्रचार केला. व प्रचारसभेला उपस्थित राहायचे त्यांनी राजकीय क्षेत्राबरोबर सहकार क्षेत्रात ही चांगली कामगिरी केली. असा हा लोकनेता पुन्हा मिळणे कठीण आहे. त्यांच्या निधनामुळे राजकीय, सामाजिक क्षेत्रात पोकळी निर्माण झालेली आहे. ती भरून काढणे कठीण आहे. ईश्वर त्यांच्या आत्म्याला शांती देवो माझ्या व माझ्या कुटुंबीयांच्या वतीने त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो.

Tags: AkkalkotAkkalkot NewsAkkalkot PoliticsSiddramappa Patil Akkalkotsolapursolapur news
Previous Post

ऐन निवडणुकीच्या काळात शरद पवार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्योजक गौतम अदानी भेटले

Next Post

बिहारचा पराभव लाडकी बहीण योजनेमुळे झाला : शरद पवार

Related Posts

मोहोळमधील छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा उभारल्याप्रकरणी गुन्हा दाखल

February 24, 2026

अक्कलकोटच्या माजी आमदाराच्या नातवासह तिघांवर गुन्हा दाखल; आमदार कल्याणशेट्टींची बदनामी भोवली

February 5, 2026

सोलापुरातील माजी आमदाराचा मुलीच्या ‘शाही विवाहाच्या थाटा’ला फाटा; खर्च टाळून विनाअनुदानित शिक्षकांच्या मुलांच्या शिक्षणासाठी मदतीचा हात !

January 23, 2026

सोलापूर जिल्हा परिषद निवडणुकीत ‘हे’ दिग्गज नेते, त्यांचे कुटुंबीय निवडणुकीच्या मैदानात!

January 21, 2026

माळशिरसमध्ये राम सातपुतेंकडून खासदार मोहिते पाटील अन् आमदार जानकारांना मोठा धक्का

December 31, 2025

मोहोळच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे सोमेश क्षीरसागरांना आश्वासन

December 17, 2025
Next Post

बिहारचा पराभव लाडकी बहीण योजनेमुळे झाला : शरद पवार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सोलापुरातील पती-पत्नीच्या आत्महत्येचे कारण उघड; सुसाईड नोटमधून धक्कादायक माहिती समोर

February 28, 2026

सोलापुरात पती-पत्नीचे मृतदेह आढळले; आत्महत्या की घातपात तपास सुरु

February 27, 2026

राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) च्या राष्ट्रीय अध्यक्षपदी सुनेत्रा पवार यांची एकमताने निवड

February 26, 2026

Top 5 news

  • अक्कलकोटच्या माजी आमदाराच्या नातवासह तिघांवर गुन्हा दाखल; आमदार कल्याणशेट्टींची बदनामी भोवली

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापुरातील 102 नवनिर्वाचित नगरसेवकांची यादी; भाजपचा ऐतिहासिक विजयी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापुरात पती-पत्नीचे मृतदेह आढळले; आत्महत्या की घातपात तपास सुरु

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अनगर नगरपंचायतीत राष्ट्रवादीच्या उज्ज्वला थिटेंचा अर्ज बाद, पण तरीही निवडणूक लागणार?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापुरात 3 तरुणांचा अपघाती मृत्यू; 3 पैकी 1 गोसेवक असल्याने अपघात की घातपात?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • home

© 2025

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!

WhatsApp Share