Wednesday, August 12, 2026
  • Login
Hello Solapur
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ
No Result
View All Result
No Result
View All Result
Hello Solapur
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ

मोहोळच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे सोमेश क्षीरसागरांना आश्वासन

Hello Solapur by Hello Solapur
17-Dec-2025 14:37 pm
in जिल्हा
0
0
SHARES
53
VIEWS

HELLO SOLAPUR | मोहोळच्या सर्वांगीण विकासासाठी निधीची कोणतीही कमतरता भासू दिली जाणार नाही, असा ठाम शब्द राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे. भाजपा युवानेते सोमेश क्षीरसागर यांनी नागपूर येथे सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनादरम्यान मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेतली.

या भेटीत मोहोळ शहर, तालुका व विधानसभा मतदारसंघाशी संबंधित विविध विकासाच्या विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.

मोहोळचे माजी आमदार राजन पाटील यांच्या भारतीय जनता पक्षात प्रवेशामुळे गेल्या सुमारे ३० वर्षांपासून सुरू असलेला पाटील–क्षीरसागर राजकीय संघर्ष संपुष्टात आला आहे.

त्यामुळे मोहोळ शहरात आनंद व उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून आगामी नगरपरिषद व इतर निवडणुकांमध्ये भाजपला निश्चितच यश मिळेल, असा विश्वास यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे व्यक्त करण्यात आला.

भाजपा युवानेते सोमेश क्षीरसागर यांनी सांगितले की, मोहोळ नगरपरिषद निवडणूक ही माजी आमदार राजन पाटील यांच्या नेतृत्वाखाली, तर भाजपा ज्येष्ठ नेते नागनाथभाऊ क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व ज्येष्ठ नेतेमंडळी एकत्र येऊन लढवत आहेत. या एकजुटीचा सकारात्मक परिणाम निवडणुकीत दिसून येईल.

यावेळी सोमेश क्षीरसागर यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे आग्रही मागणी करत सांगितले की, माजी आमदार यशवंत माने यांच्या कार्यकाळात मोहोळ शहर व तालुक्याला जेवढा विकासनिधी मिळाला होता, त्यापेक्षा अधिक निधी भविष्यात मोहोळसाठी उपलब्ध करून द्यावा.

या मागणीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सकारात्मक प्रतिसाद देत, “मोहोळच्या विकासासाठी निधीची कोणतीही कमतरता भासू देणार नाही,” असे स्पष्ट आश्वासन दिले.

तसेच, मोहोळ विधानसभा मतदारसंघातील पायाभूत सुविधा, नागरी विकास, नगरपरिषद निवडणूक तसेच आगामी काळातील विकास आराखडा यावरही यावेळी सविस्तर चर्चा करण्यात आली.

राजन पाटील- नागनाथ क्षीरसागर संघर्ष संपल्यामुळे मोहोळ शहरातील नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण असून, याचा फायदा येणाऱ्या सर्व निवडणुकांमध्ये भाजपला होईल, असा विश्वासही यावेळी व्यक्त करण्यात आला.

Tags: Bjp Solapurcm devendra fadanvisDevendra Fadanvishello solapurmoholmohol newssolapursolapur bjp ruralSomesh Kshirsagarदेवेंद्र फडणवीसमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसमोहोळ नगरपरिषदसोमेश क्षीरसागरहॅलो सोलापूर
Previous Post

खासदार धैर्यशील मोहिते पाटलांनी घेतली गृहमंत्री अमित शाहांची भेट; ‘या’ विषयावर झाली चर्चा

Next Post

मनपा निवडणुकीसाठी पुरुषोत्तम बरडेंचा ‘उत्तरा’धिकारी ठरला; मात्र पक्ष अद्यापही गुलदस्त्यात

Related Posts

आमदार राजेंद्र राऊत हे भाजपचे बाजीप्रभू देशपांडे; पालकमंत्री जयकुमार गोरेंकडून कौतुक

आमदार राजेंद्र राऊत हे भाजपचे बाजीप्रभू देशपांडे; पालकमंत्री जयकुमार गोरेंकडून कौतुक

August 3, 2026
डीसीसी बँकेवरून आमदार राजेंद्र राऊतांची आमदार दिलीप सोपलांवर टीका तर राजन पाटलांची मात्र जाहीर माफी

डीसीसी बँकेवरून आमदार राजेंद्र राऊतांची आमदार दिलीप सोपलांवर टीका तर राजन पाटलांची मात्र जाहीर माफी

August 3, 2026
वाडिया हॉस्पिटलमध्ये अत्याधुनिक सुविधा कार्यान्वित; 74 बेड्ससह आधुनिक यंत्रणा सज्ज

वाडिया हॉस्पिटलमध्ये अत्याधुनिक सुविधा कार्यान्वित; 74 बेड्ससह आधुनिक यंत्रणा सज्ज

August 1, 2026
निरा-भीमा नदीवरील नागरिकांना सतर्कतेच्या सूचना; भीमा नदीत 1 लाख 43 हजार क्युसेक्स विसर्ग सोडला

निरा-भीमा नदीवरील नागरिकांना सतर्कतेच्या सूचना; भीमा नदीत 1 लाख 43 हजार क्युसेक्स विसर्ग सोडला

July 31, 2026
चंद्रभागा नदीच्या पाणीपातळीत वाढ; वारकरी व नागरिकांना नदीपात्रात न जाण्याचे आवाहन

चंद्रभागा नदीच्या पाणीपातळीत वाढ; वारकरी व नागरिकांना नदीपात्रात न जाण्याचे आवाहन

July 26, 2026
सोलापूर : हातात तलवार अन् चांदीची वाटी घेतलेल्या बाळबट्टलला पाहण्यासाठी वळसंगमध्ये हजारोंची गर्दी

सोलापूर : हातात तलवार अन् चांदीची वाटी घेतलेल्या बाळबट्टलला पाहण्यासाठी वळसंगमध्ये हजारोंची गर्दी

May 17, 2026
Next Post

मनपा निवडणुकीसाठी पुरुषोत्तम बरडेंचा 'उत्तरा'धिकारी ठरला; मात्र पक्ष अद्यापही गुलदस्त्यात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आमदार राजेंद्र राऊत हे भाजपचे बाजीप्रभू देशपांडे; पालकमंत्री जयकुमार गोरेंकडून कौतुक

आमदार राजेंद्र राऊत हे भाजपचे बाजीप्रभू देशपांडे; पालकमंत्री जयकुमार गोरेंकडून कौतुक

August 3, 2026
डीसीसी बँकेवरून आमदार राजेंद्र राऊतांची आमदार दिलीप सोपलांवर टीका तर राजन पाटलांची मात्र जाहीर माफी

डीसीसी बँकेवरून आमदार राजेंद्र राऊतांची आमदार दिलीप सोपलांवर टीका तर राजन पाटलांची मात्र जाहीर माफी

August 3, 2026
डी-मार्टचे डायरेक्टर एन .भास्करन यांच्या हस्ते एन. एम. वाडिया चॅरिटेबल हॉस्पिटल मधील सर्जिकल युनिटचे लोकार्पण

डी-मार्टचे डायरेक्टर एन .भास्करन यांच्या हस्ते एन. एम. वाडिया चॅरिटेबल हॉस्पिटल मधील सर्जिकल युनिटचे लोकार्पण

August 2, 2026

Top 5 news

  • अक्कलकोटच्या माजी आमदाराच्या नातवासह तिघांवर गुन्हा दाखल; आमदार कल्याणशेट्टींची बदनामी भोवली

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापुरातील पती-पत्नीच्या आत्महत्येचे कारण उघड; सुसाईड नोटमधून धक्कादायक माहिती समोर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापुरातील 102 नवनिर्वाचित नगरसेवकांची यादी; भाजपचा ऐतिहासिक विजयी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापुरात पती-पत्नीचे मृतदेह आढळले; आत्महत्या की घातपात तपास सुरु

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अनगर नगरपंचायतीत राष्ट्रवादीच्या उज्ज्वला थिटेंचा अर्ज बाद, पण तरीही निवडणूक लागणार?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • home
  • trial

© 2025

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In