Saturday, April 18, 2026
  • Login
Hello Solapur
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ
No Result
View All Result
No Result
View All Result
Hello Solapur
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ

सोलापुरातील माजी आमदाराचा मुलीच्या ‘शाही विवाहाच्या थाटा’ला फाटा; खर्च टाळून विनाअनुदानित शिक्षकांच्या मुलांच्या शिक्षणासाठी मदतीचा हात !

Hello Solapur by Hello Solapur
23-Jan-2026 15:10 pm
in जिल्हा
0
0
SHARES
1k
VIEWS

HELLO SOLAPUR | राजकीय नेत्याच्या मुलांचे लग्न म्हटलं की डोळे दिपवणारा झगमगाट, शाही थाटमाट आणि अवाढव्य खर्च हे समीकरणच बनलं आहे. मात्र, या सर्वांना फाटा देत, माजी शिक्षक आमदार दत्तात्रय सावंत यांनी आपल्या कन्येचा विवाह अत्यंत साधेपणाने पार पाडून समाजासमोर एक नवा आदर्श उभा केला आहे.

केवळ साधेपणाच नाही, तर लग्नात वाचवलेला लाखो रुपयांचा निधी विनाअनुदानित शिक्षकांच्या मुलांच्या कल्याणासाठी देऊन त्यांनी माणुसकीचे दर्शन घडवले आहे.

दत्तात्रय सावंत यांची कन्या सुषमा आणि क्लासवन अधिकारी शुभम शिंदे यांनी कोणत्याही बडेजावाशिवाय ‘विवाह नोंदणी’ पद्धतीने आपले सहजीवन सुरू करण्याचा निर्णय घेतला. आजच्या काळात जिथे श्रीमंतीचे प्रदर्शन करण्यासाठी लग्नावर कोट्यवधी रुपये खर्च केले जातात, तिथे या उच्चशिक्षित दांपत्याने घेतलेला हा निर्णय त्यांच्या प्रगल्भ विचारांची साक्ष देतो.

गेल्या अनेक वर्षांपासून हजारो शिक्षक बांधव ‘विनाअनुदानित’ तत्त्वावर तुटपुंज्या पगारावर किंवा मानधनाशिवाय ज्ञानदानाचे पवित्र कार्य करत आहेत. अनेक शिक्षक तर आयुष्यभर सेवा करून विनाअनुदानित अवस्थेतच निवृत्त झाले. या शिक्षकांची आर्थिक ओढाताण आणि त्यांच्या मुलांच्या भवितव्याचा प्रश्न नेहमीच गंभीर राहिला आहे.


हीच वेदना ओळखून, सुषमा सावंत आणि शुभम शिंदे यांनी लग्नाचा खर्च टाळून वाचलेली रक्कम अशा गरजू शिक्षकांच्या मुलांच्या शिक्षणासाठी किंवा त्यांच्या विवाहासाठी मदत म्हणून देण्याचा संकल्प केला आहे. आपल्या आयुष्यातील आनंदाचा क्षण या कष्टकरी शिक्षकांच्या चेहऱ्यावर हसू फुलवण्यासाठी समर्पित करून या दांपत्याने एक प्रकारे ‘ऋण’ व्यक्त केले आहे.

सावंत सरांनी आयुष्यभर शिक्षकांचे प्रश्न मांडले, पण आपल्या मुलीच्या लग्नानिमित्त त्यांनी प्रत्यक्ष कृतीतून दिलेली ही मदत अनेकांसाठी प्रेरणादायी ठरली आहे. “माझ्या वडिलांनी आयुष्यभर ज्या शिक्षकांसाठी संघर्ष केला, त्यांच्या कुटुंबाच्या सुख-दुखात सहभागी होणे हे माझे कर्तव्य आहे,” अशी भावना नवरी मुलगी सुषमा सावंत हिने व्यक्त केली.


“हा केवळ विवाह नाही, तर एका सामाजिक कृतज्ञतेचा सोहळा आहे. शिक्षकांच्या मुलांच्या डोळ्यांतील स्वप्नांना बळ मिळावे, हाच यामागचा शुद्ध हेतू आहे.”


या अभिनव उपक्रमाचे सर्वच स्तरातून स्वागत होत असून, ‘सावंत-शिंदे’ परिवारावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

Tags: Ex Mla Dattatray Savanthello solapurRegister Marriagesolapur newssolapur updateTeacher Mla
Previous Post

सोलापूर जिल्हा परिषद निवडणुकीत ‘हे’ दिग्गज नेते, त्यांचे कुटुंबीय निवडणुकीच्या मैदानात!

Next Post

पंढरपूर–मंगळवेढा रस्त्यावर भीषण अपघात; 4 भाविकांचा मृत्यू, ६ गंभीर जखमी

Related Posts

सोलापूरमध्ये वीज पडून एका तरुणाचा जागीच मृत्यू

April 18, 2026

सोलापूर शिवसेनेची शाखाप्रमुख ते जिल्हाप्रमुख सर्वच कार्यकारिणी बरखास्त

April 15, 2026

2 वर्षांपूर्वी नवरा गेला, आता जगण्याचा आधार असलेली 2 मुलेही शेततळ्यात बुडाली; कुटुंबावर शोककळा

April 13, 2026

ब्रेकिंग : जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांची नागपूरला बदली; ‘हे’ आहेत सोलापूरचे नवे जिल्हाधिकारी

April 7, 2026

मोहोळमधील छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा उभारल्याप्रकरणी गुन्हा दाखल

February 24, 2026

अक्कलकोटच्या माजी आमदाराच्या नातवासह तिघांवर गुन्हा दाखल; आमदार कल्याणशेट्टींची बदनामी भोवली

February 5, 2026
Next Post

पंढरपूर–मंगळवेढा रस्त्यावर भीषण अपघात; 4 भाविकांचा मृत्यू, ६ गंभीर जखमी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सोलापूरमध्ये वीज पडून एका तरुणाचा जागीच मृत्यू

April 18, 2026

‘या’ कारणामुळे महिला आरक्षण विधेयकातील पहिले डिलिमिटेशन विधेयक नामंजूर!

April 17, 2026

शिवसेना झेडपी सदस्यांनीच केली म्हेत्रे गटाची राजकीय कोंडी; ‘मैत्रीसाठी माघार’चे कारण देत तलवार म्यान

April 16, 2026

Top 5 news

  • अक्कलकोटच्या माजी आमदाराच्या नातवासह तिघांवर गुन्हा दाखल; आमदार कल्याणशेट्टींची बदनामी भोवली

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापुरातील पती-पत्नीच्या आत्महत्येचे कारण उघड; सुसाईड नोटमधून धक्कादायक माहिती समोर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापुरातील 102 नवनिर्वाचित नगरसेवकांची यादी; भाजपचा ऐतिहासिक विजयी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापुरात पती-पत्नीचे मृतदेह आढळले; आत्महत्या की घातपात तपास सुरु

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अनगर नगरपंचायतीत राष्ट्रवादीच्या उज्ज्वला थिटेंचा अर्ज बाद, पण तरीही निवडणूक लागणार?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • home
  • trial

© 2025

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In