HELLO SOLAPUR | स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर झाल्यानंतर आता भाजपने एक पाऊल पुढे टाकले आहे. भाजपा कडून राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांचे प्रमुख तसेच जिल्हा निवडणूक प्रभारी यांची यादी जाहीर केली आहे.
यामध्ये भाजपचे माळशिरसचे माजी आमदार राम सातपुते आणि भाजप अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याणशेट्टी यांना निवडणूक प्रमुख म्हणून जबाबदारी दिली आहे.
माजी आमदार राम सातपुते यांच्याकडे सोलापूर पूर्व विभागाची जबाबदारी तर आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्याकडे सोलापूर पश्चिम जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख म्हणून जबाबदारी देण्यात आली आहे.
त्याचबरोबर सोलापूरचे पालकमंत्री असलेल्या जयकुमार गोरे यांच्याकडे जिल्हा निवडणूक प्रभारी म्हणून जबाबदारी देण्यात आली आहे.
भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी स्थानिक स्वराज संस्था जिल्हा निवडणुक प्रमुख व जिल्हा निवडणुक प्रभारी यांच्या नियुक्तिची घोषणा केली आहे.
राज्यातील निवडणुकीची जबाबदारी असलेली यादी खालील प्रमाणे :













