Thursday, May 21, 2026
  • Login
Hello Solapur
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ
No Result
View All Result
No Result
View All Result
Hello Solapur
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ

सोलापूर महापालिकेच्या स्वीकृत नगरसेवकपदासाठी भाजप, एमआयएमकडून ‘या’ इच्छुकांनी भरला अर्ज

Hello Solapur by Hello Solapur
18-Feb-2026 15:56 pm
in राजकारण
0
0
SHARES
506
VIEWS

HELLO SOLAPUR : सोलापूर महानगरपालिकेतील दहा स्वीकृत सदस्यांच्या निवडीकडे सध्या शहराचे लक्ष लागले आहे. २० फेब्रुवारी रोजी होणाऱ्या सर्वसाधारण सभेत स्वीकृत सदस्यांसह १६ स्थायी समिती आणि १२ परिवहन समिती सदस्यांची निवड होणार आहे.

स्वीकृत सदस्यपदाच्या 10 पैकी 9 जागा भाजपच्या वाट्याला तर 1 जागा एमआयएमच्या वाट्याला येणार असल्याने भाजपमध्ये इच्छुकांची मोठी गर्दी झाली असून अंतर्गत चुरस वाढली आहे.

स्वीकृत सदस्यपदासाठी आज सकाळी ११ ते दुपारी १.३० या वेळेत महापालिका आयुक्त डॉ. सचिन ओंबासे यांच्या कार्यालयात उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले.

नगरसचिव प्रवीण दंतकाळे यांनी अर्ज स्वीकारले. या प्रक्रियेदरम्यान आयुक्त कार्यालय परिसरात इच्छुक आणि त्यांच्या समर्थकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली.
भाजपकडून माजी नगरसेवक, शहर पदाधिकारी आणि पक्षातील वरिष्ठ कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.

यामध्ये प्रभाकर जामगुंडे, शहराध्यक्ष रोहिणी तडवळकर, जगदीश पाटील, शशी थोरात, अक्षय आंजिखाने, दायमा श्रीनिवास, सुधा अळीमोरे, श्रीकांत घाडगे, जवाहर जाजू, अनुप खंडेलवाल, केतन शहा, वृषाली चालुक्य, पांडुरंग दीडी, दीक्षित, ॲड. साधना संगवे, सूरज चव्हाण, झंवर कृष्णा, महेश तापडिया, दरक लक्ष्मीकांत, मल्लिनाथ राचेटी, सोमनाथ केंगनाळकर, रुद्रेश बोरामणी आदींचा समावेश आहे.

दरम्यान, एमआयएमकडून गाजी जहागिरदार, नईम सालार आणि फिरदौस पटेल यांनी स्वीकृत सदस्यपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. एमआयएमला एक जागा मिळण्याची शक्यता लक्षात घेता या तिघांमध्येही स्पर्धा निर्माण झाली आहे.

स्वीकृत सदस्यपदासाठी मोठ्या प्रमाणात इच्छुक रिंगणात उतरल्याने भाजपमध्ये अंतर्गत राजकीय हालचालींना वेग आला आहे. अंतिम निवडीत पक्षश्रेष्ठींचा निर्णय महत्त्वाचा ठरणार असून इच्छुकांनी आमदार, पालकमंत्री, प्रदेशाध्यक्ष ते मुख्यमंत्री स्तरापर्यंत पाठपुरावा सुरू केल्याचे चित्र दिसून येत आहे.

२० फेब्रुवारी रोजी होणाऱ्या सर्वसाधारण सभेत होणाऱ्या निवडीकडे सर्वांचे लक्ष लागले असून, स्वीकृत सदस्यांच्या माध्यमातून सोलापूर महापालिकेतील आगामी राजकारणाची दिशा स्पष्ट होणार असल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.

Tags: Bjp SolapurCropt Corporator solapurhello solapurMarathi newspoliticsSolapur bjpsolapur politics
Previous Post

महाराष्ट्रात राज्यसभा निवडणुकीची घोषणा; 7 जागांसाठी होणार निवडणूक

Next Post

आई प्रतिष्ठानचे कार्य लोककल्याणाचे; मंत्री चंद्रकांत पाटलांचे मोफत कौशल्य विकास केंद्राच्या उदघाटनावेळी गौरवोद्गार

Related Posts

खासदार प्रणिती शिंदेंनी पालकमंत्री जयकुमार गोरेंना पाठवली अब्रुनुकसानकीची नोटीस

खासदार प्रणिती शिंदेंनी पालकमंत्री जयकुमार गोरेंना पाठवली अब्रुनुकसानकीची नोटीस

May 15, 2026

‘या’ कारणामुळे महिला आरक्षण विधेयकातील पहिले डिलिमिटेशन विधेयक नामंजूर!

April 17, 2026

शिवसेना झेडपी सदस्यांनीच केली म्हेत्रे गटाची राजकीय कोंडी; ‘मैत्रीसाठी माघार’चे कारण देत तलवार म्यान

April 16, 2026

मुलांच्या सर्वांगण विकासासाठी समर्पित नाट्य शाळेच्या वतीने ‘गंमत बालनाट्य शिबीराचे’ आयोजन

April 11, 2026

सोलापुरातील ‘या’ पदाधिकाऱ्यासाठी थेट मुख्यमंत्र्यांकडून शिफारस; भाजप वर्तुळात मोठी चर्चा

April 7, 2026

सोलापूर झेडपीचे अध्यक्षपद बार्शीकडे? यांचे नाव जवळपास निश्चित

March 15, 2026
Next Post

आई प्रतिष्ठानचे कार्य लोककल्याणाचे; मंत्री चंद्रकांत पाटलांचे मोफत कौशल्य विकास केंद्राच्या उदघाटनावेळी गौरवोद्गार

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

‘राष्ट्रवादी दादा गटाचे 22 आमदार पवार गटाच्या संपर्कात’ हे वृत्त खोडसाळपणाचे : दादा गट

‘राष्ट्रवादी दादा गटाचे 22 आमदार पवार गटाच्या संपर्कात’ हे वृत्त खोडसाळपणाचे : दादा गट

May 20, 2026
सोलापूरसह २० मे रोजी औषध दुकाने बंद राहणार; देशव्यापी औषध विक्रेता बंदची हाक

सोलापूरसह २० मे रोजी औषध दुकाने बंद राहणार; देशव्यापी औषध विक्रेता बंदची हाक

May 19, 2026
ब्रेकिंग : राष्ट्रवादीच्या उमेश पाटलांनी रोहित पवारांना धु धु धुतला; पक्ष विलीनीकरण ते भाजप प्रवेशापर्यंत सगळंच काढलं

ब्रेकिंग : राष्ट्रवादीच्या उमेश पाटलांनी रोहित पवारांना धु धु धुतला; पक्ष विलीनीकरण ते भाजप प्रवेशापर्यंत सगळंच काढलं

May 18, 2026

Top 5 news

  • अक्कलकोटच्या माजी आमदाराच्या नातवासह तिघांवर गुन्हा दाखल; आमदार कल्याणशेट्टींची बदनामी भोवली

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापुरातील पती-पत्नीच्या आत्महत्येचे कारण उघड; सुसाईड नोटमधून धक्कादायक माहिती समोर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापुरातील 102 नवनिर्वाचित नगरसेवकांची यादी; भाजपचा ऐतिहासिक विजयी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापुरात पती-पत्नीचे मृतदेह आढळले; आत्महत्या की घातपात तपास सुरु

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अनगर नगरपंचायतीत राष्ट्रवादीच्या उज्ज्वला थिटेंचा अर्ज बाद, पण तरीही निवडणूक लागणार?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • home
  • trial

© 2025

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In