Friday, April 17, 2026
  • Login
Hello Solapur
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ
No Result
View All Result
No Result
View All Result
Hello Solapur
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ

महाराष्ट्रात राज्यसभा निवडणुकीची घोषणा; 7 जागांसाठी होणार निवडणूक

Hello Solapur by Hello Solapur
18-Feb-2026 10:36 am
in राजकारण
0
0
SHARES
268
VIEWS

HELLO SOLAPUR | महाराष्ट्रातील राज्यसभा निवडणुकीची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. या निवडणुकीत महाराष्ट्रातील एकूण 7 राज्यसभा जागांसाठी मतदान होणार आहे. निवडणूक प्रक्रियेनुसार 5 मार्च रोजी उमेदवारी अर्ज दाखल केले जाणार असून 16 मार्च रोजी मतदान होईल. मतमोजणी त्याच दिवशी पार पडणार आहे.
या निवडणुकीत विविध पक्षांचे अनेक ज्येष्ठ खासदार निवृत्त होत असल्याने राजकीय हालचालींना वेग आला आहे.


भाजपचे तीन खासदार निवृत्त :
भारतीय जनता पार्टीकडून राज्यसभेवर असलेले खा. डॉ. भागवत कराड, खा. धैर्यशील पाटील आणि भाजप कोट्यातून निवडून आलेले खा. रामदास आठवले यांचा कार्यकाळ संपत आहे. भाजप या तिन्ही जागांवर कोणाला उमेदवारी देणार, तसेच पुन्हा त्याच खासदारांना संधी मिळणार का, याबाबत पक्षांतर्गत चर्चा सुरू आहेत.


राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष :
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून खा. शरद पवार आणि खा. फौजिया खान हे दोन खासदार निवृत्त होत आहेत. विशेषतः शरद पवार पुन्हा राज्यसभा निवडणूक लढवणार का, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. त्यांच्या निर्णयावर पक्षाचे पुढील राजकीय धोरण आणि जागावाटप अवलंबून राहणार असल्याचे बोलले जात आहे.


शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष :
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाकडून खा. प्रियांका चतुर्वेदी यांचा कार्यकाळ संपत आहे. पक्षाकडून त्यांना पुन्हा उमेदवारी दिली जाते का, की नव्या चेहऱ्याला संधी मिळते, याबाबत अद्याप स्पष्टता नाही.


काँग्रेसकडून एक जागा :
काँग्रेस पक्षाकडून खा. रजनी पाटील या निवृत्त होत आहेत. काँग्रेससाठी ही जागा महत्त्वाची मानली जात असून पक्ष नेतृत्व कोणाला संधी देणार याकडे लक्ष आहे.


7 जागांसाठी राजकीय गणित :
महाराष्ट्र विधानसभेतील सध्याच्या संख्याबळानुसार महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यात जागावाटपावर चर्चा सुरू आहे. या निवडणुकीत कोणत्या पक्षाला किती जागा मिळतात आणि कोणते नवे चेहरे राज्यसभेत जातात, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.


पुढील घडामोडींवर लक्ष :
उमेदवारी अर्ज दाखल झाल्यानंतर संभाव्य उमेदवारांची नावे स्पष्ट होतील. त्यामुळे पुढील काही दिवस महाराष्ट्राच्या राजकारणासाठी निर्णायक ठरण्याची शक्यता आहे.

Tags: BjpCongresshello solapurMaharashtra bjpMaharashtra CongressMaharashtra PoliticsMarathi PoliticsNcp Sharad pawar gatRajyasabha Electionsharad pawarsolapur news
Previous Post

सोलापुरात 3 तरुणांचा अपघाती मृत्यू; 3 पैकी 1 गोसेवक असल्याने अपघात की घातपात?

Next Post

सोलापूर महापालिकेच्या स्वीकृत नगरसेवकपदासाठी भाजप, एमआयएमकडून ‘या’ इच्छुकांनी भरला अर्ज

Related Posts

शिवसेना झेडपी सदस्यांनीच केली म्हेत्रे गटाची राजकीय कोंडी; ‘मैत्रीसाठी माघार’चे कारण देत तलवार म्यान

April 16, 2026

मुलांच्या सर्वांगण विकासासाठी समर्पित नाट्य शाळेच्या वतीने ‘गंमत बालनाट्य शिबीराचे’ आयोजन

April 11, 2026

सोलापुरातील ‘या’ पदाधिकाऱ्यासाठी थेट मुख्यमंत्र्यांकडून शिफारस; भाजप वर्तुळात मोठी चर्चा

April 7, 2026

सोलापूर झेडपीचे अध्यक्षपद बार्शीकडे? यांचे नाव जवळपास निश्चित

March 15, 2026

सोलापूर झेडपीच्या गटनेते, प्रतोद अन् प्रवक्तेपदी मराठा समाजाला संधी; अध्यक्षपद मात्र गुलदस्त्यात!

March 10, 2026

शिवसेनेकडून राज्यसभेवर गेलेल्या ज्योती वाघमारे नक्की कोण आहेत?

March 5, 2026
Next Post

सोलापूर महापालिकेच्या स्वीकृत नगरसेवकपदासाठी भाजप, एमआयएमकडून 'या' इच्छुकांनी भरला अर्ज

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

शिवसेना झेडपी सदस्यांनीच केली म्हेत्रे गटाची राजकीय कोंडी; ‘मैत्रीसाठी माघार’चे कारण देत तलवार म्यान

April 16, 2026

सोलापूर शिवसेनेची शाखाप्रमुख ते जिल्हाप्रमुख सर्वच कार्यकारिणी बरखास्त

April 15, 2026

ब्रेकिंग : पंढरपूरमधील ॲसिड हल्ला प्रकरणात धक्कादायक वळण; तरुणीने स्वतःच ॲसिड ओतले….

April 13, 2026

Top 5 news

  • अक्कलकोटच्या माजी आमदाराच्या नातवासह तिघांवर गुन्हा दाखल; आमदार कल्याणशेट्टींची बदनामी भोवली

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापुरातील पती-पत्नीच्या आत्महत्येचे कारण उघड; सुसाईड नोटमधून धक्कादायक माहिती समोर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापुरातील 102 नवनिर्वाचित नगरसेवकांची यादी; भाजपचा ऐतिहासिक विजयी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापुरात पती-पत्नीचे मृतदेह आढळले; आत्महत्या की घातपात तपास सुरु

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अनगर नगरपंचायतीत राष्ट्रवादीच्या उज्ज्वला थिटेंचा अर्ज बाद, पण तरीही निवडणूक लागणार?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • home
  • trial

© 2025

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In