Sunday, March 1, 2026
  • Login
Hello Solapur
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ
No Result
View All Result
No Result
View All Result
Hello Solapur
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ

मुख्यमंत्री देवाभाऊंची आमदार देवेंद्र कोठेंवर विशेष मर्जी; सोलापुरातील 68 लिंगांसाठी 2 कोटींचा निधी मंजूर

Hello Solapur by Hello Solapur
28-Oct-2025 20:58 pm
in शहर
0
0
SHARES
291
VIEWS

HELLO SOLAPUR | मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सोलापूर शहर मध्ये आमदार देवेंद्र कोठे यांच्यावर विशेष म्हणजे असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. ग्रामदैवत शिवयोगी श्री सिद्धरामेश्वरांनी स्थापन केलेल्या 68 लिंगांच्या जिर्णोद्धारासाठी आमदार देवेंद्र कोठे यांच्या पाठपुराव्याला यश आले आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या महत्त्वपूर्ण कामासाठी 2 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. वास्तविक पाहता 2024-25 मध्ये तब्बल 12 कोटींचा निधी दिल्यानंतर आता 2025-26 च्या चालू बजेटमध्ये 14 कोटींचा निधी आमदार देवेंद्र कोठे यांना दिल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आमदार देवेंद्र कोठेंवर विशेष मर्जी असल्याचे सिद्ध झाले.

त्याचबरोबर पालकमंत्री जयकुमार गोरे यांचीदेखील भक्कम साथ लाभत असल्याचे पुन्हा एकदा पाहायला मिळाले आहे.

विधानसभेच्या अधिवेशनादरम्यान सोलापूर विकासाचे मुद्दे मांडत असताना आमदार देवेंद्र कोठे यांनी ग्रामदैवत सिद्धरामेश्वरांनी स्थापन केलेल्या 68 लिंगांचा परिसर विकसित करून पर्यटन विकासाला चालना देता येईल असा मुद्दा मांडला होता.

त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेल्या पश्चिम महाराष्ट्रातल्या आमदारांच्या बैठकीतही सुद्धा त्यांनी हा मुद्दा प्रभावीपणे मांडला. पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी सुध्दा कोठेंच्या मुद्द्यांवर सकारात्मकता दाखवत निधीसाठी पाठपुरावा केला.

68 लिंगांचा परिसर विकसित करण्यासाठी 6 कोटी 80 लाख रुपयांच्या निधीची मागणी आमदार कोठे यांनी केली होती. त्यांच्या अथक प्रयत्नांना यश आले असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पहिल्या टप्प्यात त्यांना दोन कोटींचा निधी देण्याचा अध्यादेश जारी केला आहे.

याशिवाय शहर मध्य विधानसभा मतदारसंघातील विकास कामांसाठी 2025-26 च्या अर्थसंकल्पातून विशेष निधी मंजूर झाला आहे. या आर्थिक वर्षात आमदार देवेंद्र कोठे यांना 14 कोटी रुपये निधी वितरणाचा महाराष्ट्र शासनाचा अध्यादेश निघाला असून 12 कोटींच्या या निधीतून मतदारसंघातील 45 प्रमुख रस्ते व अंतर्गत रस्त्यांची कामे प्रस्तावित आहेत.

68 लिंगांचा विकास करत बाराव्या शतकातील योगी कुलचक्रवती सिद्धरामेश्वर यांच्या कार्याला उजाळा देण्याचा प्रयत्न आमदार कोठे यांच्याकडून होत असल्याने शहर जिल्ह्यातील सिद्धरामेश्वर भक्तांकडून कौतुक होत आहे.

मुख्यमंत्री फडणवीसांनी माझे पालकत्व स्वीकारले म्हणून… – आमदार देवेंद्र कोठे
चोहोबाजूंनी तलावाने वेढलेले सिद्धरामेश्वर मंदिर परिसर वैशिष्ट्यपूर्ण असून केवळ मंदिर परिसराचा विकास न करता सिद्धरामेश्वरांचे कार्य आणि त्यांनी निर्माण केलेल्या 68 लिंगांच्या परिसराचाही विकास करावा हा संकल्प मनात होता. याकरिता पहिल्या टप्प्यात 2 कोटी रुपये मंजूर करतानाच मुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी मला चालू वर्षांच्या बजेटमध्येसुद्धा 14 कोटींचा निधी उपलब्ध करून दिला. त्यांनी माझे पालकत्व स्वीकारल्यामुळे सिध्दरामेश्वरांच्या कृपेने शहर विकासाचे आणखी इतरही अनेक मुद्दे मार्गी लावू शकेन याची खात्री वाटते.
– देवेंद्र कोठे, भाजप आमदार, शहर मध्य विधानसभा

Tags: Bjp Solapurcm devendra fadanvishello solapurmla devendra kothesolapurSolapur bjpSolapur City Centralsolapur mahapalikasolapur newsहॅलो सोलापूर
Previous Post

माजी आमदारांचा भाजप प्रवेश ‘या’ तारखेला होणार; मात्र एका नेत्याचा प्रवेश रखडला

Next Post

सोलापुरात भाजपकडून  राष्ट्रवादीनंतर आता शिवसेना शिंदे गटालाही दे धक्का; शिवसेनेचा बडा नेता भाजपच्या गळाला

Related Posts

आमदार देवेंद्र कोठेंनी ‘या’ महत्वाच्या विषयावर विधानसभेचे लक्ष वेधले; सर्व स्तरातून होतेय कौतुक

February 26, 2026

सोलापूर महापालिकेकडून संत गाडगेबाबा महाराजांच्या जयंतीनिमित्त अभिवादन

February 24, 2026

सोलापूरच्या स्वीकृत सदस्य निवडीत पालकमंत्र्यांचा मास्टर स्ट्रोक; एकीकडे निष्ठावंतांना संधी दुसरीकडे भविष्याचा विचार

February 23, 2026

मुख्यमंत्री फडणवीसांनी सोलापूरकरांना दिलेला शब्द पाळला; आयटी पार्कसाठी 50 एकर जमीन देण्याचे आदेश

February 23, 2026

मराठी पत्रकार संघाच्या वतीने मोफत हृदयरोग तपासणी शिबिर संपन्न

February 21, 2026

आई प्रतिष्ठानचे कार्य लोककल्याणाचे; मंत्री चंद्रकांत पाटलांचे मोफत कौशल्य विकास केंद्राच्या उदघाटनावेळी गौरवोद्गार

February 18, 2026
Next Post

सोलापुरात भाजपकडून  राष्ट्रवादीनंतर आता शिवसेना शिंदे गटालाही दे धक्का; शिवसेनेचा बडा नेता भाजपच्या गळाला

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सोलापुरातील पती-पत्नीच्या आत्महत्येचे कारण उघड; सुसाईड नोटमधून धक्कादायक माहिती समोर

February 28, 2026

सोलापुरात पती-पत्नीचे मृतदेह आढळले; आत्महत्या की घातपात तपास सुरु

February 27, 2026

राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) च्या राष्ट्रीय अध्यक्षपदी सुनेत्रा पवार यांची एकमताने निवड

February 26, 2026

Top 5 news

  • अक्कलकोटच्या माजी आमदाराच्या नातवासह तिघांवर गुन्हा दाखल; आमदार कल्याणशेट्टींची बदनामी भोवली

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापुरातील 102 नवनिर्वाचित नगरसेवकांची यादी; भाजपचा ऐतिहासिक विजयी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापुरात पती-पत्नीचे मृतदेह आढळले; आत्महत्या की घातपात तपास सुरु

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अनगर नगरपंचायतीत राष्ट्रवादीच्या उज्ज्वला थिटेंचा अर्ज बाद, पण तरीही निवडणूक लागणार?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापुरात 3 तरुणांचा अपघाती मृत्यू; 3 पैकी 1 गोसेवक असल्याने अपघात की घातपात?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • home

© 2025

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!

WhatsApp Share