Thursday, May 21, 2026
  • Login
Hello Solapur
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ
No Result
View All Result
No Result
View All Result
Hello Solapur
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ

आमदार देवेंद्र कोठेंनी ‘या’ महत्वाच्या विषयावर विधानसभेचे लक्ष वेधले; सर्व स्तरातून होतेय कौतुक

Hello Solapur by Hello Solapur
26-Feb-2026 06:08 am
in शहर
0
0
SHARES
10
VIEWS

HELLO SOLAPUR | सोलापूर शहर मध्यचे आमदार देवेंद्र कोठे यांनी जिल्ह्यातील नागरी आरोग्याच्या दृष्टीने अतिशय महत्वाच्या विषयावर सभागृहाचे लक्ष वेधले आहे. त्यांच्या या विषयामुळे सर्व स्तरातून कौतुक केले जात आहे.

सोलापूरची जीवनदायीनी असलेल्या उजनी धरणातील पाण्यात कुरकुंभसह विविध एमआयडीसी तसेच पुणे, पिंपरी चिंचवड शहरातील दूषित पाणी मिसळले जात आहे. परिणामी सोलापुरात मोठ्या प्रमाणावर कॅन्सरचे रुग्ण वाढत आहेत, असा अत्यंत गंभीर निष्कर्ष मांडत यावर महाराष्ट्र शासनाने दीर्घकालीन उपाययोजना करावी, अशी मागणी आमदार देवेंद्र कोठे यांनी बुधवारी केली.

मुंबई येथे सुरू असलेल्या महाराष्ट्र शासनाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात आमदार देवेंद्र कोठे यांनी ही मागणी केली.

आमदार देवेंद्र कोठे म्हणाले, काही तज्ज्ञांच्या मते पुण्यातील कुरकुंभ एमआयडीसी, पिंपरी चिंचवड तसेच पुणे शहरातून दूषित पाणी उजनीत मिसळले जात आहे. हा प्रकार गेल्या ३० ते ४० वर्षांपासून सुरू असून यावर वेळीच उपाययोजना न केल्यामुळे या पाण्यामुळे सोलापूर शहर जिल्ह्यात कर्करोगाचे रुग्ण मोठ्या प्रमाणावर आढळत आहेत.

सोलापुरात कर्करोगावर उपचार करणारी ५ ते ६ मोठी रुग्णालय सुरू आहेत. रिलायन्स समूहासारख्या मोठ्या समूहानेदेखील सोलापुरात रुग्णालय सुरू केले आहे. यावर गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे. सोलापूरला पाणीपुरवठा करणाऱ्या उजनी धरणातील प्रदूषणावर दीर्घकालीन उपाययोजना होणे गरजेचे आहे. या समस्येवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे निश्चितपणे मार्ग काढतील, असा विश्वासही आमदार देवेंद्र कोठे यांनी याप्रसंगी व्यक्त केला.

कॅन्सरच्या आजारातून सोलापूरकरांची सुटका करण्यासाठी कटिबद्ध :

उजनी धरणातील दूषित पाणीपुरवठ्यामुळे सोलापुरात वाढत असलेल्या जीवघेण्या कॅन्सरच्या आजारापासून सोलापूरकरांची सुटका करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. सोलापूरकरांना केवळ मुबलक पाणीपुरवठा न करता पाणीपुरवठा स्वच्छदेखील असला पाहिजे यासाठी आम्ही आग्रही आहोत. विकसित महाराष्ट्रासोबतच विकसित सोलापूरचे ध्येय गाठण्यासाठी शहराला मुबलक आणि शुद्ध पाणीपुरवठा करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आग्रही मागणी करण्यात येणार आहे.

– देवेंद्र कोठे, आमदार, शहर मध्य

Tags: Breaking newsCancer Issuehello solapurMaharashtra VidhansabhaMarathi newsmla devendra kothesolapursolapur newsUjani DamUjani Dam Water
Previous Post

सोलापूर महापालिकेकडून संत गाडगेबाबा महाराजांच्या जयंतीनिमित्त अभिवादन

Next Post

राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) च्या राष्ट्रीय अध्यक्षपदी सुनेत्रा पवार यांची एकमताने निवड

Related Posts

सोलापूरच्या इतिहासात पहिल्यांदाच पाणी पुरवठ्यासाठी 1378 कोटींची योजना मंजूर; नक्की काय या योजनेत?

April 20, 2026

सोलापुरातील उद्योजकांसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे आणखी एक गिफ्ट; आमदार देवेंद्र कोठेंचा पाठपुरावा यशस्वी

March 30, 2026

सोलापूर महापालिकेकडून संत गाडगेबाबा महाराजांच्या जयंतीनिमित्त अभिवादन

February 24, 2026

सोलापूरच्या स्वीकृत सदस्य निवडीत पालकमंत्र्यांचा मास्टर स्ट्रोक; एकीकडे निष्ठावंतांना संधी दुसरीकडे भविष्याचा विचार

February 23, 2026

मुख्यमंत्री फडणवीसांनी सोलापूरकरांना दिलेला शब्द पाळला; आयटी पार्कसाठी 50 एकर जमीन देण्याचे आदेश

February 23, 2026

मराठी पत्रकार संघाच्या वतीने मोफत हृदयरोग तपासणी शिबिर संपन्न

February 21, 2026
Next Post

राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) च्या राष्ट्रीय अध्यक्षपदी सुनेत्रा पवार यांची एकमताने निवड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

‘राष्ट्रवादी दादा गटाचे 22 आमदार पवार गटाच्या संपर्कात’ हे वृत्त खोडसाळपणाचे : दादा गट

‘राष्ट्रवादी दादा गटाचे 22 आमदार पवार गटाच्या संपर्कात’ हे वृत्त खोडसाळपणाचे : दादा गट

May 20, 2026
सोलापूरसह २० मे रोजी औषध दुकाने बंद राहणार; देशव्यापी औषध विक्रेता बंदची हाक

सोलापूरसह २० मे रोजी औषध दुकाने बंद राहणार; देशव्यापी औषध विक्रेता बंदची हाक

May 19, 2026
ब्रेकिंग : राष्ट्रवादीच्या उमेश पाटलांनी रोहित पवारांना धु धु धुतला; पक्ष विलीनीकरण ते भाजप प्रवेशापर्यंत सगळंच काढलं

ब्रेकिंग : राष्ट्रवादीच्या उमेश पाटलांनी रोहित पवारांना धु धु धुतला; पक्ष विलीनीकरण ते भाजप प्रवेशापर्यंत सगळंच काढलं

May 18, 2026

Top 5 news

  • अक्कलकोटच्या माजी आमदाराच्या नातवासह तिघांवर गुन्हा दाखल; आमदार कल्याणशेट्टींची बदनामी भोवली

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापुरातील पती-पत्नीच्या आत्महत्येचे कारण उघड; सुसाईड नोटमधून धक्कादायक माहिती समोर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापुरातील 102 नवनिर्वाचित नगरसेवकांची यादी; भाजपचा ऐतिहासिक विजयी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापुरात पती-पत्नीचे मृतदेह आढळले; आत्महत्या की घातपात तपास सुरु

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अनगर नगरपंचायतीत राष्ट्रवादीच्या उज्ज्वला थिटेंचा अर्ज बाद, पण तरीही निवडणूक लागणार?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • home
  • trial

© 2025

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In