Sunday, May 10, 2026
  • Login
Hello Solapur
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ
No Result
View All Result
No Result
View All Result
Hello Solapur
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ

मराठी पत्रकार संघाच्या वतीने मोफत हृदयरोग तपासणी शिबिर संपन्न

Hello Solapur by Hello Solapur
21-Feb-2026 12:29 pm
in शहर
0
0
SHARES
6
VIEWS

HELLO SOLAPUR | सध्याच्या धकाधकीच्या जीवनात पत्रकारांनी आरोग्याकडे लक्ष देणे गरजेचे आहे, कामाचा ताण असला तरी योग्य आहार आणि व्यायाम यामुळे आरोग्य सुरक्षित ठेवता येते असे प्रतिपादन पोलीस आयुक्त डॉ. अश्विनी पाटील यांनी केले.


महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ, सोलापूर आणि एसीएस हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने सोलापूर जिल्ह्यातील सर्व पत्रकार व त्यांच्या कुटुंबासाठी लोकशाही अण्णाभाऊ साठे चौक येथील एसीएस हॉस्पिटल येथे मोफत हृदयरोग तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी पोलीस उपायुक्त डॉ. अश्विनी पाटील, ज्येष्ठ संपादक राकेश टोळ्ये, व्यंकटेश पटवारी, प्रशांत माने, संजय पाठक, पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष मनीष केत आणि श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष विक्रम खेलबुडे यांची प्रमुख उपस्थिती होती.
कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास अभिवादन करून व मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने करण्यात आली.

पुढे बोलताना डॉ. पाटील म्हणाल्या पत्रकारांच्या धावपळीच्या जीवनशैलीत आरोग्याकडे दुर्लक्ष होते. कामाचा ताण असतानाही आरोग्य सुरक्षित ठेवायचे असेल योग्य आहार आणि व्यायामाची गरज आहे. त्याचबरोबर नियमित आरोग्य तपासणी करणे गरजेचे आहे. ACS हॉस्पिटलने सुरू केलेला हा उपक्रम कौतुकास्पद असल्याचे त्या म्हणाल्या.  यावेळी राकेश टोळ्ये, मनीष केत, डॉ. सिद्धांत गांधी यांनीही मार्गदर्शन केले.


Acs हॉस्पिटलचे नामांकित हृदयरोग तज्ज्ञ डॉ. सिद्धांत गांधी, डॉ. दीपक गायकवाड, डॉ. प्रमोद पवार, डॉ. राहुल कारीमुंगी, डॉ. स्नेहल पवार आणि डॉ. ऋचा गांधी यांनी रुग्णांची तपासणी करून मार्गदर्शन केले.


या शिबिरात प्रामुख्याने बीपी, शुगर, ईसीजी, २डी इको, स्ट्रेस टेस्ट आणि स्ट्रेस इको या तपासण्या मोफत करण्यात आल्या. या शिबिरास पत्रकार आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.


कार्यक्रमाचे प्रास्ताविक पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष अभिषेक आदेप्पा यांनी, कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौरभ वाघमारे यांनी तर आभार प्रदर्शन डॉ. प्रमोद पवार यांनी मानले.

Tags: Dr Pramod PawarDr Siddhanth GandhiHealth campHeart Attackhello solapurMaharashtra Rajya Marathi Patrakar Sangh solapurManish Ket
Previous Post

आई प्रतिष्ठानचे कार्य लोककल्याणाचे; मंत्री चंद्रकांत पाटलांचे मोफत कौशल्य विकास केंद्राच्या उदघाटनावेळी गौरवोद्गार

Next Post

सोलापूर महापालिकेतील स्विकृत नगरसेवकांच्या निवडी; ‘हे’ आहेत स्विकृत शिलेदार

Related Posts

सोलापूरच्या इतिहासात पहिल्यांदाच पाणी पुरवठ्यासाठी 1378 कोटींची योजना मंजूर; नक्की काय या योजनेत?

April 20, 2026

सोलापुरातील उद्योजकांसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे आणखी एक गिफ्ट; आमदार देवेंद्र कोठेंचा पाठपुरावा यशस्वी

March 30, 2026

आमदार देवेंद्र कोठेंनी ‘या’ महत्वाच्या विषयावर विधानसभेचे लक्ष वेधले; सर्व स्तरातून होतेय कौतुक

February 26, 2026

सोलापूर महापालिकेकडून संत गाडगेबाबा महाराजांच्या जयंतीनिमित्त अभिवादन

February 24, 2026

सोलापूरच्या स्वीकृत सदस्य निवडीत पालकमंत्र्यांचा मास्टर स्ट्रोक; एकीकडे निष्ठावंतांना संधी दुसरीकडे भविष्याचा विचार

February 23, 2026

मुख्यमंत्री फडणवीसांनी सोलापूरकरांना दिलेला शब्द पाळला; आयटी पार्कसाठी 50 एकर जमीन देण्याचे आदेश

February 23, 2026
Next Post

सोलापूर महापालिकेतील स्विकृत नगरसेवकांच्या निवडी; 'हे' आहेत स्विकृत शिलेदार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

ट्रक ड्रायव्हरच्या मुलाला महागडी शस्त्रक्रिया सांगितल्याने कुटुंब आर्थिक संकटात; मात्र मुख्यमंत्र्यांनी केली मोठी मदत

April 22, 2026

सोलापूरच्या इतिहासात पहिल्यांदाच पाणी पुरवठ्यासाठी 1378 कोटींची योजना मंजूर; नक्की काय या योजनेत?

April 20, 2026

सहकार भारतीच्या माध्यमातून महिलांना सक्षम करण्याचा प्रयत्न : जिल्हा कार्यवाह ऋषीकेश कुलकर्णी

April 18, 2026

Top 5 news

  • अक्कलकोटच्या माजी आमदाराच्या नातवासह तिघांवर गुन्हा दाखल; आमदार कल्याणशेट्टींची बदनामी भोवली

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापुरातील पती-पत्नीच्या आत्महत्येचे कारण उघड; सुसाईड नोटमधून धक्कादायक माहिती समोर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापुरातील 102 नवनिर्वाचित नगरसेवकांची यादी; भाजपचा ऐतिहासिक विजयी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापुरात पती-पत्नीचे मृतदेह आढळले; आत्महत्या की घातपात तपास सुरु

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अनगर नगरपंचायतीत राष्ट्रवादीच्या उज्ज्वला थिटेंचा अर्ज बाद, पण तरीही निवडणूक लागणार?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • home
  • trial

© 2025

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In