Sunday, October 25, 2026
  • Login
Hello Solapur
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ
No Result
View All Result
No Result
View All Result
Hello Solapur
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ

पत्रकारांसाठी सायबर विषयक कार्यशाळा; शहर पोलीस आणि क्राईम पत्रकार संघाचा उपक्रम

Hello Solapur by Hello Solapur
25-Oct-2026 12:56 pm
in क्राईम
0
पत्रकारांसाठी सायबर विषयक कार्यशाळा; शहर पोलीस आणि क्राईम पत्रकार संघाचा उपक्रम
0
SHARES
0
VIEWS

HELLO SOLAPUR NEWS | नागरिकांमध्ये सायबर गुन्ह्यांविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी सोलापूर शहर पोलिस दल सातत्याने प्रयत्नशील आहेत. ऑनलाइन फसवणूक, बनावट लिंक, ओटीपीची मागणी, सोशल मीडिया फसवणूक अशा सायबर गुन्ह्यांपासून सावध राहा. आपली वैयक्तिक व आर्थिक माहिती अनोळखी व्यक्तींना देऊ नका. तंत्रज्ञानाचा वापर करताना सजगता आणि सुरक्षितता बाळगणे हीच सायबर गुन्ह्यांपासून बचावाची गुरुकिल्ली असल्याचे सायबर तज्ञांनी सांगितले. यावेळी सोलापूर शहरातील ८० पत्रकार बांधव सहभागी झाले होते.

सोलापूर शहर पोलिस आयुक्तालय व क्राइम पत्रकार संघाच्यावतीने शनिवारी पोलिस आयुक्तालयात पत्रकारांसाठी सायबर गुन्ह्यासंदर्भातील कार्यशाळा पार पडली. यावेळी पोलिस उपायुक्त (गुन्हे) अश्विनी पाटील, पोलिस उपायुक्त (परिमंडल) प्रितम यावलकर, सहाय्यक पोलिस आयुक्त (गुन्हे) दिलीप पवार, गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अरविंद माने व क्राइम पत्रकार संघाचे अध्यक्ष विशाल भांगे यांच्यासह आदी पेालिस अधिकारी, कर्मचारी व पत्रकार बांधव उपस्थित होते. या कार्यशाळेचे प्रास्ताविक व स्वागत सायबर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक भालचंद्र ढवळे यानी केले. कार्यशाळेत सहभागी पत्रकारांना सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला.

‘अनोळखी क्रमांकावरून येणारे मेसेज, संशयास्पद लिंक्स किंवा व्हॉट्सॲपवर येणाऱ्या अनधिकृत गोष्टींवर क्लिक करू नका. एका क्लिकमुळे तुमच्या संपूर्ण मोबाईलचा ताबा सायबर गुन्हेगारांकडे जाऊ शकतो. बँक खात्यांची माहिती, छायाचित्रे आधारकार्डसारखी ओळखपत्रे सायबर गुन्हेगारांच्या हाती लागल्यास त्याचा गैरवापर करून बनावट खाती सुरू केली जातात आर्थिक फसवणूक केली जाते.’ त्यांनी पुढे डिजिटल अरेस्ट, बनावट पोलिस अधिकारी बनून धमकावणे, शेअर मार्केटमधील गुंतवणुकीच्या नावाखाली होणारी कोट्यवधी रुपयांची फसवणूक, गॅस बिल भरण्याचे खोटे मेसेज आणि इन्स्टंट लोन ॲप्सच्या माध्यमातून होणारे ब्लॅकमेलिंग याविषयी घडलेल्या प्रत्यक्ष घटनांची उदाहरणे देऊन सायबर तज्ञ अविनाश पाटील व महिला पोलीस अंमलदार प्रांजली काळे यांनी माहिती दिली. या कार्यक्रमास क्राइम पत्रकार संघाचे पदाधिकारी, सदस्य, सोलापूर विद्यापीठ मास कम्युनिकेशन विभागातील विद्यार्थी मोठया संख्येने उपस्थित होते. आभार इम्रान सगरी यांनी मानले.

———–
फसवणूक झाल्यास ‘१९३० किंवा १९४५ वर संपर्क साधा कोणत्याही प्रकारची सायबर किंवा आर्थिक फसवणूक झाल्यास नागरिकांनी अजिबात वेळ न दवडता तत्काळ शासनाच्या १९३०, १९४५ या सायबर हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधावा किंवा थेट सायबर पोलिस ठाण्याशी संपर्क करावा, जेणेकरून खात्यातून गेलेली रक्कम तत्काळ गोठवून (फ्रीझ करून) वाचवता येऊ शकेल, असेही पोलिस उपायुक्त (गुन्हे) अश्विनी पाटील यांनी स्पष्ट केले.

Tags: Crime NewsCrime Reporter AssociationCyber CrimeCyber crime solapurhello solapurHello Solapur NewssolapurSolapur crimesolapur policeSolapur Police Commissioner Office
Previous Post

ब्रेकिंग : उजनी धरणातून पिण्यासाठी पाणी सोडले; नागरिकांना दिलासा

Related Posts

ब्रेकिंग | महाराष्ट्रातील बडा उद्योजक राणा सूर्यवंशी यांच्यावर जी.व.घे.णा. ह.ल्ला.

राणा सूर्यवंशी हल्ला प्रकरणात तपासाला वेग; आरोपी ज्ञानदेव शिंदेच्या अटकेने नवे प्रश्न!

October 22, 2026
ब्रेकिंग | महाराष्ट्रातील बडा उद्योजक राणा सूर्यवंशी यांच्यावर जी.व.घे.णा. ह.ल्ला.

ब्रेकिंग | महाराष्ट्रातील बडा उद्योजक राणा सूर्यवंशी यांच्यावर जी.व.घे.णा. ह.ल्ला.

October 22, 2026
ब्रेकिंग : रामदास झोळ, मनोहर मामा टोळीवर मोक्का

ब्रेकिंग : रामदास झोळ, मनोहर मामा टोळीवर मोक्का

October 8, 2026
राष्ट्रवादीचे नेते प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला वैद्यकीय जामीन मंजूर

राष्ट्रवादीचे नेते प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला वैद्यकीय जामीन मंजूर

August 22, 2026
सोलापुरात घरकुल परिसरातून फिल्मी स्टाईल एटीएम मशीनच चोरीला

सोलापुरात घरकुल परिसरातून फिल्मी स्टाईल एटीएम मशीनच चोरीला

May 16, 2026
NEET परीक्षा रद्द झाल्याने 3 विद्यार्थ्यांनी उचलले टोकाचे पाऊल; पेपरफुटीचे साईड इफेक्ट

NEET परीक्षा रद्द झाल्याने 3 विद्यार्थ्यांनी उचलले टोकाचे पाऊल; पेपरफुटीचे साईड इफेक्ट

May 16, 2026

ताज्या बातम्या

पत्रकारांसाठी सायबर विषयक कार्यशाळा; शहर पोलीस आणि क्राईम पत्रकार संघाचा उपक्रम

पत्रकारांसाठी सायबर विषयक कार्यशाळा; शहर पोलीस आणि क्राईम पत्रकार संघाचा उपक्रम

October 25, 2026
निरा-भीमा नदीवरील नागरिकांना सतर्कतेच्या सूचना; भीमा नदीत 1 लाख 43 हजार क्युसेक्स विसर्ग सोडला

ब्रेकिंग : उजनी धरणातून पिण्यासाठी पाणी सोडले; नागरिकांना दिलासा

October 24, 2026

Die umfassende Anleitung zur gesetzlichen Regelung und Steuerpflicht für Wettanbieter: Alles Wissenswerte über die Wettsteuer in Deutschland

October 23, 2026

Top 5 news

  • अक्कलकोटच्या माजी आमदाराच्या नातवासह तिघांवर गुन्हा दाखल; आमदार कल्याणशेट्टींची बदनामी भोवली

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापुरातील पती-पत्नीच्या आत्महत्येचे कारण उघड; सुसाईड नोटमधून धक्कादायक माहिती समोर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापुरातील 102 नवनिर्वाचित नगरसेवकांची यादी; भाजपचा ऐतिहासिक विजयी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापुरात पती-पत्नीचे मृतदेह आढळले; आत्महत्या की घातपात तपास सुरु

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अनगर नगरपंचायतीत राष्ट्रवादीच्या उज्ज्वला थिटेंचा अर्ज बाद, पण तरीही निवडणूक लागणार?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Hacked by Panataran
  • home
  • trial

© 2025

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In