Saturday, February 28, 2026
  • Login
Hello Solapur
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ
No Result
View All Result
No Result
View All Result
Hello Solapur
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ

राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) च्या राष्ट्रीय अध्यक्षपदी सुनेत्रा पवार यांची एकमताने निवड

Hello Solapur by Hello Solapur
26-Feb-2026 17:31 pm
in महाराष्ट्र
0
0
SHARES
43
VIEWS

HELLO SOLAPUR | राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची एकमताने निवड करण्यात आली आहे. मुंबईतील वरळी डोम येथे सुरू असलेल्या पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या महत्त्वपूर्ण बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.


सुनेत्रा पवार यांच्या राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांनी अधिकृत ठराव मांडला. त्यानंतर उपस्थित सर्व पदाधिकाऱ्यांनी हात उंच करून या ठरावाला अनुमोदन दिले आणि सुनेत्रा पवार यांची एकमताने निवड करण्यात आली.


विशेष म्हणजे, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनाला अद्याप एक महिना पूर्ण झालेला नाही. या दुःखद घटनेनंतर सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची जबाबदारी स्वीकारली होती. त्यानंतर आज पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक घेत, त्यांच्याकडे पक्षाच्या सर्वोच्च नेतृत्वाची जबाबदारीही सोपवण्यात आली आहे.


या बैठकीसाठी देशभरातून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रमुख पदाधिकारी, आमदार, खासदार तसेच संघटनात्मक पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. पक्ष संघटनेला नव्या नेतृत्वाखाली अधिक बळकट करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.


सुनेत्रा पवार यांच्या निवडीमुळे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला नवीन दिशा आणि स्थैर्य मिळेल, असा विश्वास पक्षाच्या नेत्यांनी व्यक्त केला आहे. आगामी काळात संघटन मजबूत करणे, राज्य आणि राष्ट्रीय पातळीवर पक्षाची भूमिका अधिक प्रभावी करणे, तसेच आगामी निवडणुकांची रणनीती आखणे, या प्रमुख जबाबदाऱ्या त्यांच्या नेतृत्वाखाली पार पाडल्या जाणार आहेत.

Tags: #Ncp Sunetra PawarDcm Sunetra Pawarhello solapurMaharashtra NewsMaharashtra PoliticsNcp Ajit pawar gatNcp MaharashtraNCP National PresidentNcp Sharad pawar gatSunetra Pawar
Previous Post

आमदार देवेंद्र कोठेंनी ‘या’ महत्वाच्या विषयावर विधानसभेचे लक्ष वेधले; सर्व स्तरातून होतेय कौतुक

Next Post

सोलापुरात पती-पत्नीचे मृतदेह आढळले; आत्महत्या की घातपात तपास सुरु

Related Posts

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांचे निधन; 7 वेळा खासदार ते नेत्रदिपक कामगिरी

December 12, 2025

सोलापूरच्या झोपडपट्टीतून थेट शिवसेनेच्या स्टार प्रचारक!, संघर्ष कन्येची स्फूर्तीदायक यशोगाथा

November 20, 2025

भाजप प्रवेशानंतर कोठे समर्थकांनी घेतला मुख्यमंत्री फडणवीसांचा आशीर्वाद; महेश कोठेंच्या आठवणींना दिला उजाळा

November 12, 2025

राज्यातील नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुका जाहीर; असा आहे कार्यक्रम

November 4, 2025

राज्यातील झेड.पी, महापालिका, नगरपालिकेच्या निवडणुका आज जाहीर होणार

November 4, 2025

वंचित बहुजन आघाडी कोणासोबत युती करणार; सुजात आंबेडकरांनी स्पष्ट केली भूमिका

October 23, 2025
Next Post

सोलापुरात पती-पत्नीचे मृतदेह आढळले; आत्महत्या की घातपात तपास सुरु

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सोलापुरातील पती-पत्नीच्या आत्महत्येचे कारण उघड; सुसाईड नोटमधून धक्कादायक माहिती समोर

February 28, 2026

सोलापुरात पती-पत्नीचे मृतदेह आढळले; आत्महत्या की घातपात तपास सुरु

February 27, 2026

राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) च्या राष्ट्रीय अध्यक्षपदी सुनेत्रा पवार यांची एकमताने निवड

February 26, 2026

Top 5 news

  • अक्कलकोटच्या माजी आमदाराच्या नातवासह तिघांवर गुन्हा दाखल; आमदार कल्याणशेट्टींची बदनामी भोवली

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापुरातील 102 नवनिर्वाचित नगरसेवकांची यादी; भाजपचा ऐतिहासिक विजयी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अनगर नगरपंचायतीत राष्ट्रवादीच्या उज्ज्वला थिटेंचा अर्ज बाद, पण तरीही निवडणूक लागणार?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापुरात 3 तरुणांचा अपघाती मृत्यू; 3 पैकी 1 गोसेवक असल्याने अपघात की घातपात?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापुरात पती-पत्नीचे मृतदेह आढळले; आत्महत्या की घातपात तपास सुरु

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • home

© 2025

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!

WhatsApp Share