HELLO SOLAPUR | सोलापूर शहर आणि जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षात मोठ्याप्रमाणात पडझड झाली आहे. अनेक निष्ठावंत नेत्यांनी शरद पवारांची साथ सोडली मात्र सुरवातीपासून पक्षाशी एकनिष्ठ असलेल्या कार्यकर्त्याला शरद पवारांनी पुन्हा एकदा शहराध्यक्षपदाची संधी दिली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या शहाराध्यक्षपदी महेश गादेकर यांची निवड करण्यात आलीय. माजी शहराध्यक्ष सुधीर खरटमल यांनी राजीनामा देऊन अजित पवार गटात प्रवेश केल्यामुळे हे पद रिक्त झाले होते. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तोंडावर असताना, राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेपासून शरद पवारांशी एकनिष्ठ असलेल्या महेश गादेकर यांच्यावर पक्षाने पुन्हा एकदा मोठी जबाबदारी दिली आहे. (Mahesh Gadekar Appoint as solapur president of Ncp Sharad pawar gat)
महेश गादेकर यांचा थोडक्यात परिचय :
– महाविद्यालयीन जीवनापासून समाजकारण आणि राजकारण.
राजकीय प्रवास :
– 1992: पक्षीय राजकारणास सुरुवात.
– सोलापूर शहर युवक काँग्रेस: उपाध्यक्ष (1992), अध्यक्ष (1996).
– 1997: महापालिका निवडणुकीत सर्वात जास्त तरुण कार्यकर्त्यांना तिकिटे देऊन निवडून आणले.
– 1999 (राष्ट्रवादी स्थापना): शहर राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष.
– 2010: सोलापूर शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष.
– 2012: महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादीचे सर्वाधिक 17 नगरसेवक निवडून आणले.
– 2014: सोलापूर शहर उत्तर मतदारसंघातून विधानसभेची निवडणूक लढवली.
आता पुन्हा एकदा सोलापूर शहर जिल्हाध्यक्ष म्हणून जबाबदारी.
सामाजिक कार्य :
– फिरता दवाखाना: सलग पाच वर्षे ही संकल्पना राबवत पाच लाख लोकांवर मोफत उपचार केले.
– खासदार शरदचंद्र पवार साहेब यांच्या संसदीय कारकिर्दीला 50 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल सोलापुरात भव्य कार्यक्रम घेतला.
क्रीडा क्षेत्रातील योगदान :
– महेश गादेकर हे राजकारणासोबत क्रीडा क्षेत्रातही सक्रिय आहेत.
पुरस्कार: महाराष्ट्रातील प्रतिष्ठित शिवछत्रपती क्रीडा पुरस्काराने सन्मानित.
वर्तमान पदे :
– महाराष्ट्र राज्य खो-खो असोसिएशनचे उपाध्यक्ष.
– सोलापूर शहर जिल्ह्याचे खो-खो असोसिएशनचे अध्यक्ष.
– सोलापूर शहर जिल्हा फेडरेशनचे अध्यक्ष.
– सोलापूर शहर व जिल्हा फुटबॉल असोसिएशनचे अध्यक्ष.
आयोजन:
– 2015 साली सोलापूर शहरात खो-खो ची राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धा प्रथमच आयोजित केली.











