Thursday, October 22, 2026
  • Login
Hello Solapur
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ
No Result
View All Result
No Result
View All Result
Hello Solapur
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ

पाण्याचा दिवस म्हणजे सोलापूर शहराला शाप; हा शाप पुसून टाकण्याचा आमदार देवेंद्र कोठेंचा शब्द

Hello Solapur by Hello Solapur
07-Jan-2026 17:52 pm
in राजकारण
0
0
SHARES
164
VIEWS

HELLO SOLAPUR |सोलापूर शहराला पाण्याचा दिवस म्हणजे एक प्रकारचा शाप आहे. ही स्थिती बदलण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 892 कोटींची योजना मंजूर केली आहे. ही योजना पूर्ण करून शहराला दररोज पाणी दिल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही, असे अभिवचन शहर मध्यचे आमदार देवेंद्रदादा कोठे यांनी दिले.

सोलापूर महापालिका निवडणुकीसाठी प्रभाग क्रमांक 13 मध्ये भाजप उमेदवारांच्या संपर्क कार्यालयाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.

यावेळी व्यासपीठावर भाजप शहराध्यक्ष रोहिणीताई तडवळकर, यंत्रमाग उद्योजक भूपती कमटम,  पेंटप्पा गड्डम, अंबादास बोल्ली, माजी उपमहापौर प्रविण डोंगरे,राजमहेंद्र कमटम,अशोक काळजे, व्यंकटेश बिटला, भाजपचे उमेदवार सुनिता कामाठी, अंबिका चौगुले, विजय चिप्पा, सत्यनारायण गुर्रम, निवडणूक प्रमुख विजयाताई वड्डेपल्ली यांची प्रमुख उपस्थिती होती. 

याप्रसंगी आमदार देवेंद्रदादा कोठे पुढे म्हणाले की, प्रभाग क्रमांक 13 हा भाजपचा बालेकिल्ला तसेच शहर मध्यचा केंद्रबिंदू आहे. यंदाच्या महापालिका निवडणुकीसाठी या प्रभागात इच्छुकांची संख्या मोठी होती. त्यामुळे माझ्यासह शहराध्यक्ष तसेच प्रदेशापुढे मोठा पेच पडला होता. 40 इच्छुकांपैकी  केवळ चार जणांना पक्षाने संधी दिली. मात्र याचा अर्थ 36 परके आहेत, असा होत नाही.

पक्ष संधी दिली नाही तरी या प्रभागातील जुने तसेच सर्व सहकारी तळमळीने काम करीत आहेत. त्यांना मी एकच सांगू इच्छितो भाजप ही कार्यकर्त्यांची, त्यागाची व न्यायाची पार्टी आहे. उमेदवारी दिली नसतानाही कार्यकर्ते घरात बसले नाहीत, पक्षाचा आदेश शिरसावंद्य मानून ते या निवडणुकीत परिश्रम घेत आहेत, याचा मला अभिमान आहे.

काळाचा महिमा एवढा अगाध आहे की, सन 2017 मध्ये ज्यांना पक्षाने उमेदवारी नाकारली अशा रोहिणी तडवळकर आज शहराध्यक्षपदी काम करीत कार्यकर्त्यांना उमेदवारी देत आहेत. हे लक्षात घेता कार्यकर्त्यांनी जबाबदारीने काम करावे. त्यांच्या कार्याची दखल निश्चितपणे होऊन त्यांना न्याय देऊ, असे आश्वासन आमदार देवेंद्र कोठे यांनी दिले.

सोलापूर शहरात पाणी हा कळीचा मुद्दा आहे. तीन ते पाच दिवसाआड सोलापूरला पाणीपुरवठा केला जातो. पाण्याचा दिवस हा शाप आहे. हे चित्र बदलण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी 892 कोटींची योजना मंजूर केली आहे. ही योजना कार्यान्वित झाल्यावर शहराला दररोज व समान पाणीपुरवठा करणार आहोत.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या कार्यपद्धतीवर तसेच भाजपवर विश्वास ठेवून मी काम करीत आहे. येथील शिकलेली तरुण पिढी रोजगारअभावी बाहेरगावी जात आहे. मुख्यमंत्र्यांनी सोलापूरसाठी आयटी पार्क मंजूर केले आहे. आयटी पार्कसाठी विमानसेवा आवश्यक होती. त्याचीही पूर्तता झाली आहे.

गोवा, मुंबईनंतर आता बंगलोर, तिरुपतीला विमानसेवा सुरू होणार आहे. खासदार प्रणिती शिंदे या वारंवार विमानसेवा बाबत आव्हान देत होत्या. पण कामाची गॅरंटी म्हणजे देवेंद्र फडणवीस आहेत, हे सिद्ध झाले.

आयटी पार्क झाल्यावर सोलापुरातील तरुणाईला सोलापुरातच रोजगार मिळून आई-वडिलांसमवेत राहण्याचे पुण्य मिळणार आहे. या विविध गोष्टी होण्यासाठी महापालिकेत भाजपची सत्ता येणे आवश्यक आहे.

त्यामुळे सर्व कार्यकर्त्यांनी या निवडणुकीसाठी झटून भाजपच्या चारही उमेदवारांना विजयी करावे असे आवाहन शेवटी आमदार देवेंद्र कोठे यांनी केले.

कार्यक्रमास अनिल कामाठी,मनोहर विडप,दिलीप शिंदे, अंबादास बोल्ली, पांडुरंग मुदगल, लक्ष्मण विटकर,सुरेश तमशेट्टी, मधुकर वडनाल,भीमाशंकर बोळकोटे, दत्तात्रय कल्पवृक्ष,मच्छिंद्र जाधव,मारुती विटकर,जगू काळे,विकास पवार,महादेव घोडक,वंदना भिसे, मल्लिकार्जुन सरगम,सदानंद गुंडेटी,यादगिरी बोम्मा,गंगाधर गुल्लापल्ली, व्यंकटेश क्यातम,शंकर चौगुले,अमर चिप्पा, अनिल चिप्पा,प्रशांत पासकंटी,गोपीकृष्ण वड्डेपल्ली,महेश अलकुंटे आदी उपस्थित होते.

Tags: Bjp SolapurDevendra Kothemla devendra kothepoliticsRohini TadwalkarsolapurSolapur bjpSolapur Mahapalika Election 2026solapur newssolapur political newssolapur politics
Previous Post

Godz Casino Plattform – App-Erlebnis im Überblick

Next Post

Bison Casino – Kompletna Recenzja

Related Posts

महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय शिक्षक संघटनेचा महायुतीच्या उमेदवारांना पाठिंबा;

महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय शिक्षक संघटनेचा महायुतीच्या उमेदवारांना पाठिंबा;

October 20, 2026
खा. डॉ. ज्योती वाघमारे यांची केंद्र सरकारच्या महत्वाच्या समितीवर निवड

खा. डॉ. ज्योती वाघमारे यांची केंद्र सरकारच्या महत्वाच्या समितीवर निवड

August 22, 2026
ब्रेकिंग : पालकमंत्री जयकुमार गोरे यांचे सुषमा अंधारे आणि विरोधकांना सडेतोड उत्तर

ब्रेकिंग : पालकमंत्री जयकुमार गोरे यांचे सुषमा अंधारे आणि विरोधकांना सडेतोड उत्तर

August 14, 2026
पंढरपूरच्या कॉरिडॉरबाबत मुख्यमंत्र्यांचे आश्वासन; विठ्ठल-रुक्मिणीच्या साक्षीने दिला शब्द

पंढरपूरच्या कॉरिडॉरबाबत मुख्यमंत्र्यांचे आश्वासन; विठ्ठल-रुक्मिणीच्या साक्षीने दिला शब्द

July 26, 2026

सोलापूर विधान परिषदेसाठी भाजपकडून व्हीप बाजवला!

June 16, 2026
सोलापूर विधान परिषद निवडणुकीत राष्ट्रवादी SP गटाच्या आमदाराचा भाजपला पाठिंबा

सोलापूर विधान परिषद निवडणुकीत राष्ट्रवादी SP गटाच्या आमदाराचा भाजपला पाठिंबा

June 7, 2026
Next Post

Bison Casino - Kompletna Recenzja

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

50cb978b748ab09b5fb8e767003dc13152007103969f4e7b958730547aecbf52

October 21, 2026

Casino Siteleri Rehberi 2026 — 1704

October 21, 2026

Kocaeli Escort Hizmetleri — 6959

October 20, 2026

Top 5 news

  • अक्कलकोटच्या माजी आमदाराच्या नातवासह तिघांवर गुन्हा दाखल; आमदार कल्याणशेट्टींची बदनामी भोवली

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापुरातील पती-पत्नीच्या आत्महत्येचे कारण उघड; सुसाईड नोटमधून धक्कादायक माहिती समोर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापुरातील 102 नवनिर्वाचित नगरसेवकांची यादी; भाजपचा ऐतिहासिक विजयी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापुरात पती-पत्नीचे मृतदेह आढळले; आत्महत्या की घातपात तपास सुरु

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अनगर नगरपंचायतीत राष्ट्रवादीच्या उज्ज्वला थिटेंचा अर्ज बाद, पण तरीही निवडणूक लागणार?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Hacked by Panataran
  • home
  • trial

© 2025

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In