Monday, March 2, 2026
  • Login
Hello Solapur
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ
No Result
View All Result
No Result
View All Result
Hello Solapur
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ

राष्ट्रवादीचे राजन पाटील भाजपच्या वाटेवर; जिल्हाध्यक्ष उमेश पाटीलांचे ओपन चॅलेंज

Hello Solapur by Hello Solapur
18-Oct-2025 12:18 pm
in राजकारण
0
0
SHARES
235
VIEWS

HELLO SOLAPUR | सोलापूर जिल्ह्यातील मोहोळच्या दोन पाटलांमधील धुसफूस पुन्हा एकदा उफाळून आली आहे. नुकतेच अजित पवार गटाचे माजी आमदार आणि राज्यमंत्री दर्जा असलेले सहकार परिषदेचे अध्यक्ष राजन पाटील यांनी दोन दिवसापूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. त्यानंतर मात्र आता त्यांच्याच पक्षाचे जिल्हाध्यक्ष उमेश पाटलांनी राजन पाटलांना खुले आव्हान दिले आहे.

राष्ट्रवादी अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष उमेश पाटील यांनी पक्षाचे माजी आमदार आणि सहकार परिषदेचे विद्यमान अध्यक्ष राजन पाटील यांना थेट खुलं आव्हान देत राजकीय वातावरण ढवळून काढले आहे.

“जिल्हा परिषदेला मी माझा नरखेड गट सोडून लढतो, तुम्ही अनगर सोडून माझ्या विरोधात लढा. जर माझा पराभव झाला, तर मी माझं राजकारण सोडून देईन,” असे दमदार वक्तव्य करत उमेश पाटलांनी राजकीय वर्तुळात खळबळ उडवली.

यावेळी राजन पाटलांच्या गावात गेल्यावर माझ्यावर हल्ला केल्याचा आरोप जिल्हाध्यक्ष उमेश पाटलांनी केला आहे. “मी राजन पाटलांच्या गावात गेलो असताना माझ्यावर हल्ल्याचा प्रयत्न करण्यात आला. परंतु मी शांतता राखली व हिंसक मार्ग न स्वीकारता लोकशाही मार्गाने लढा देण्याचा निर्णय घेतला.

यावेळी त्यांनी खोचक टीका करत “अपने गली मे कुत्ता भी शेर होता है.” आमच्यात हिम्मत आहे म्हणून आम्ही लढतो. “माझा बाप ना आमदार, ना खासदार, ना मंत्री. माझ्याकडे पैसा किंवा कारखाना नाही, पण आमच्यात हिम्मत आहे.

पुढे म्हणाले “जर राजन पाटील हे ‘पर्मनंट आमदार’ म्हणवत असतील, तर त्यांच्यात हिम्मत असेल तर माझ्याविरोधात लढून दाखवा.

मोहोळ तालुका दहशतमुक्त व स्वतंत्र करण्यासाठी आमचा संघर्ष सुरू आहे. “आम्ही शहीद होण्याची भीती बाळगत नाही. हा लढा लोकशाही मार्गानेच लढला जाईल, असा पुनःरूच्चार केला.

माझ्यावर हल्ल्याचा प्रयत्न केला पण लक्षात ठेवा तुम्हाला पण नरखेड, मोहोळ मध्ये यायचे आहे. कोण कोणाला कमी नसते. तुम्ही फक्त बारावाड्यांचं पाणी पिला आहात, उमेश पाटील बाराशे गावांचे पाणी पिऊन आलाय हे लक्षात ठेवा.

त्यामुळे 4 वर्षाच्या कालावधीत तुमचं 50 वर्षाचं साम्राज्य उध्वस्त करू शकला हे लक्षात ठेवा असंही उमेश पाटील म्हणाले.

नुकतेच राजन पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती मा त्यामुळे ते भाजपत जाणार असल्याचे जवळपास निश्चित झाले आहे.

त्या पार्श्वभूमीवर उमेश पाटलांचे हे विधान अधिकच चर्चेचा विषय ठरले आहे. या घडामोडींमुळे मोहोळ आणि सोलापूर जिल्ह्यात राष्ट्रवादी (अजित पवार गट) मध्ये अंतर्गत संघर्ष तीव्र होण्याची शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त केली जात आहे.





Tags: BjpBjp Solapurhello solapurmoholmohol newsNcp Solapurpoliticsrajan patilsolapursolapur newssolapur political newssolapur politicsumesh patilZilla Parishad solapur
Previous Post

सोलापुरात भाजपचा दिवाळीपूर्वीच मोठा धमाका; 2 माजी उमहापौर, 5 नगरसेवकांचा भाजपत प्रवेश

Next Post

राष्ट्रवादीचा बालेकिल्ला, सोलापूर जिल्हा; मात्र भाजपने एका फटक्यात मारला डल्ला!

Related Posts

सोलापूर महापालिकेतील स्विकृत नगरसेवकांच्या निवडी; ‘हे’ आहेत स्विकृत शिलेदार

February 21, 2026

सोलापूर महापालिकेच्या स्वीकृत नगरसेवकपदासाठी भाजप, एमआयएमकडून ‘या’ इच्छुकांनी भरला अर्ज

February 18, 2026

महाराष्ट्रात राज्यसभा निवडणुकीची घोषणा; 7 जागांसाठी होणार निवडणूक

February 18, 2026

सोलापूर जिल्हापरिषद -पंचायत समितीतील वियजी उमेदवारांची यादी

February 10, 2026

BREAKING | उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर सुनेत्रा पवारांची पहिली प्रतिक्रिया!

January 31, 2026

सोलापूर महापालिकेतील घवघवीत यश; मुख्यमंत्र्यांकडून पालकमंत्र्यांचा सत्कार

January 17, 2026
Next Post

राष्ट्रवादीचा बालेकिल्ला, सोलापूर जिल्हा; मात्र भाजपने एका फटक्यात मारला डल्ला!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सोलापुरातील पती-पत्नीच्या आत्महत्येचे कारण उघड; सुसाईड नोटमधून धक्कादायक माहिती समोर

February 28, 2026

सोलापुरात पती-पत्नीचे मृतदेह आढळले; आत्महत्या की घातपात तपास सुरु

February 27, 2026

राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) च्या राष्ट्रीय अध्यक्षपदी सुनेत्रा पवार यांची एकमताने निवड

February 26, 2026

Top 5 news

  • अक्कलकोटच्या माजी आमदाराच्या नातवासह तिघांवर गुन्हा दाखल; आमदार कल्याणशेट्टींची बदनामी भोवली

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापुरातील 102 नवनिर्वाचित नगरसेवकांची यादी; भाजपचा ऐतिहासिक विजयी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापुरात पती-पत्नीचे मृतदेह आढळले; आत्महत्या की घातपात तपास सुरु

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अनगर नगरपंचायतीत राष्ट्रवादीच्या उज्ज्वला थिटेंचा अर्ज बाद, पण तरीही निवडणूक लागणार?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापुरात 3 तरुणांचा अपघाती मृत्यू; 3 पैकी 1 गोसेवक असल्याने अपघात की घातपात?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • home

© 2025

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!

WhatsApp Share