HELLO SOLAPUR | भाजपात प्रवेश करताच राजन पाटलांनी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला आणखी एक धक्का दिला आहे. राजन पाटील यांनी सहकार परिषदेच्या अध्यक्षपदाचा राजीनामा मुख्यमंत्री फडणवीसांकडे सुपूर्द केला आहे.
सोलापूरच्या राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरलेली आणखी एक मोठी हालचाल घडली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) सोडून नुकतेच भाजपात प्रवेश केलेले राजन पाटील यांनी आज आपल्या राज्यमंत्री पदाचा दर्जा असलेल्या सहकार परिषदेच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. त्यांनी आपला राजीनामा थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सुपूर्द केला आहे.
राजन पाटील यांनी आपल्या पत्रात नमूद केले आहे की,
“मला हे सहकार परिषदेचे अध्यक्षपद राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) कडून मिळाले होते. मी आता पक्ष बदलल्यामुळे नैतिकतेच्या दृष्टीने या पदावर राहणे योग्य नाही. त्यामुळे मी माझा राजीनामा देत असून, तो स्वीकृत करण्यात यावा अशी मुख्यमंत्री फडणवीसांकडे विनंती करतो.”
भाजपात प्रवेश केल्यानंतर लगेचच राजीनामा देऊन राजन पाटलांनी राजकीय शिष्टाचार पाळल्याचे बोलले जात आहे. यामुळे आगामी काळात त्यांना भाजपकडून कोणती जबाबदारी दिली जाणार, याकडे सोलापूरसह राज्याचे राजकारणाचे लक्ष लागले आहे.
दरम्यान, सहकार परिषदेच्या अध्यक्षपदासाठी नवीन नियुक्तीबाबत पुढील काही दिवसांत निर्णय होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.












