HELLO SOLAPUR | आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या पार्श्वभूमीवर भाजपने सोलापूर शहरात मोठा राजकीय बॉम्ब उडवला आहे. कारण राष्ट्रवादी अजित पवार गट, शरद पवार आणि शिवसेना शिंदे गटातील मातब्बर नेत्यांचा भाजपत पक्षप्रवेश झाला आहे.
यामध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटाचे माजी उपमहापौर पद्माकर काळे, शिवसेना शिंदे गटाचे माजी उपमहापौर दिलीप कोल्हे यांचा भाजपत प्रवेश झाला आहे. (Solapur 2 Ex dy mayor, 5 corporator join BJP party)
या पक्षप्रवेशा मध्ये पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या नेतृत्वाखाली आमदार सचिन कल्याणशेट्टी, आमदार देवेंद्र कोठे यांची महत्वाची भूमिका राहिली आहे.
त्याचबरोबर माजी नगरसेवक सुरेश पाटील, गुरुशांत धुत्तरगावकर, सुभाष डांगे, मंदाकिनी तोडकरी, कल्पना क्षीरसागर या माजी नगरसेवकांनी देखील भाजपत प्रवेश केला. याचबरोबर बिज्जू प्रधाने, बिपीन पाटील, मारुती तोडकरी, नागनाथ क्षीरसागर, सुनील भोसले, मदत क्षीरसागर, रवी काळे, मेघराज कल्याणकर, बाळासाहेब तांबे, सुरेश तोडकरी आदी नेत्यांनी भाजपत प्रवेश केलाय.
भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत मुंबईत हा पक्ष प्रवेश सोहळा पार पाडला.
विशेष म्हणजे यावेळी काँग्रेसचे माजी आमदार दिलीप माने, अजित पवार गटाचे मोहोळचे माजी आमदार यशवंत माने देखील यावेळी उपस्थित असल्याची माहिती आहे. त्यामुळे आगामी काळात माजी आमदार देखील भाजपात प्रवेश करण्याची शक्यता आहे.











