Friday, April 17, 2026
  • Login
Hello Solapur
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ
No Result
View All Result
No Result
View All Result
Hello Solapur
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ

आई प्रतिष्ठानने कामगार आणि शेतकऱ्यांच्या 500 मुलींची दिवाळी केली गोड

Hello Solapur by Hello Solapur
16-Oct-2025 17:07 pm
in शहर
0
0
SHARES
23
VIEWS

HELLO SOLAPUR | समाजातील वंचित आणि गरजू विद्यार्थिनी, महिलांसाठी काम करण्याचा वारसा कायम ठेवत आई प्रतिष्ठानने यंदाच्यावर्षीही गरजूंची दिवाळी गोड केली. दयानंद महाविद्यालयात शिकणाऱ्या कामगार आणि शेतकऱ्यांच्या 500 विद्यार्थिनींना आई प्रतिष्ठानकडून दिवाळीनिमित्त ड्रेस मटेरियल देण्यात आले.

दयानंद महाविद्यालयाच्या वेलणकर सभागृहात गुरुवारी हा कार्यक्रम झाला. प्रारंभी व्याहर्ती होम करण्यात आला. याप्रसंगी व्यासपीठावर पोलीस उपायुक्त (परिमंडळ) विजय कबाडे, वैशाली कबाडे, नित्यानंद दरबी, रेखा दरबी, आई प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष मोहन डांगरे, दयानंद शिक्षण संस्थेचे प्रशासक डॉ. विजयकुमार उबाळे, दयानंद कला व शास्त्र महाविद्यालयाचे प्र. प्राचार्य डॉ. बी. एच. दामजी, डी.ए.व्ही. वेलणकर वाणिज्य महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य एस. व्ही. शिंदे, डी. जी. बी. दयानंद विधी महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्या एस. जे. गायकवाड, डी. पी. बी. दयानंद कॉलेज ऑफ एज्युकेशनचे प्राचार्य डॉ. एस. बी. क्षीरसागर उपस्थित होते.

यावेळी प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते विद्यार्थीनींना ड्रेस मटेरियल देण्यात आले. वैशाली कबाडे म्हणाल्या, मोबाईलमुळे फसवणुकीचे प्रकार वाढत आहेत. त्यामुळे विद्यार्थिनींनी अशा घटनांपासून दूर रहावे. विद्यार्थिनींनी शारीरिक, मानसिक आरोग्य जपावे. सकाळी चालणे, ध्यान, योग यांची आपल्याला आवश्यकता आहे.

आई प्रतिष्ठानने संकटाच्या काळात महिलांना आधार दिला आहे. पोलीस उपायुक्त विजय कबाडे म्हणाले, दातृत्व असणारी माणसे समाजात कमी होत आहेत. दातृत्व असणाऱ्या व्यक्तींमुळे समाज टिकून आहे. सर्वांना दिवाळी साजरी करता यावी याकरिता आई प्रतिष्ठानने केलेला हा उपक्रम कौतुकास्पद आहे.

आई प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष मोहन डांगरे यांनी प्रास्ताविक केले. प्रा. राखी गवळी यांनी सूत्रसंचालन तर प्रा. विद्या कोठारी यांनी आभार प्रदर्शन केले.

यावेळी अर्णव डांगरे, राहुल डांगरे, अविनाश शंकू, शुभम चिट्याल, लक्ष्मीकांत येलदी, अंबादास पोगुल, व्यंकटेश बंडा, उमेश चिट्याल आदी उपस्थित होते.

Tags: Aai Pratisthan SolapurBreaking newshello solapurMohan DangareSocial worksolapursolapur news
Previous Post

बार्शी तेथे सरशी; बार्शी बाजार समितीतर्फे मुख्यमंत्री सहाय्यता निधीला 1 कोटींची मदत

Next Post

सोलापुरात भाजपचा दिवाळीपूर्वीच मोठा धमाका; 2 माजी उमहापौर, 5 नगरसेवकांचा भाजपत प्रवेश

Related Posts

सोलापुरातील उद्योजकांसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे आणखी एक गिफ्ट; आमदार देवेंद्र कोठेंचा पाठपुरावा यशस्वी

March 30, 2026

आमदार देवेंद्र कोठेंनी ‘या’ महत्वाच्या विषयावर विधानसभेचे लक्ष वेधले; सर्व स्तरातून होतेय कौतुक

February 26, 2026

सोलापूर महापालिकेकडून संत गाडगेबाबा महाराजांच्या जयंतीनिमित्त अभिवादन

February 24, 2026

सोलापूरच्या स्वीकृत सदस्य निवडीत पालकमंत्र्यांचा मास्टर स्ट्रोक; एकीकडे निष्ठावंतांना संधी दुसरीकडे भविष्याचा विचार

February 23, 2026

मुख्यमंत्री फडणवीसांनी सोलापूरकरांना दिलेला शब्द पाळला; आयटी पार्कसाठी 50 एकर जमीन देण्याचे आदेश

February 23, 2026

मराठी पत्रकार संघाच्या वतीने मोफत हृदयरोग तपासणी शिबिर संपन्न

February 21, 2026
Next Post

सोलापुरात भाजपचा दिवाळीपूर्वीच मोठा धमाका; 2 माजी उमहापौर, 5 नगरसेवकांचा भाजपत प्रवेश

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

शिवसेना झेडपी सदस्यांनीच केली म्हेत्रे गटाची राजकीय कोंडी; ‘मैत्रीसाठी माघार’चे कारण देत तलवार म्यान

April 16, 2026

सोलापूर शिवसेनेची शाखाप्रमुख ते जिल्हाप्रमुख सर्वच कार्यकारिणी बरखास्त

April 15, 2026

ब्रेकिंग : पंढरपूरमधील ॲसिड हल्ला प्रकरणात धक्कादायक वळण; तरुणीने स्वतःच ॲसिड ओतले….

April 13, 2026

Top 5 news

  • अक्कलकोटच्या माजी आमदाराच्या नातवासह तिघांवर गुन्हा दाखल; आमदार कल्याणशेट्टींची बदनामी भोवली

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापुरातील पती-पत्नीच्या आत्महत्येचे कारण उघड; सुसाईड नोटमधून धक्कादायक माहिती समोर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापुरातील 102 नवनिर्वाचित नगरसेवकांची यादी; भाजपचा ऐतिहासिक विजयी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापुरात पती-पत्नीचे मृतदेह आढळले; आत्महत्या की घातपात तपास सुरु

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अनगर नगरपंचायतीत राष्ट्रवादीच्या उज्ज्वला थिटेंचा अर्ज बाद, पण तरीही निवडणूक लागणार?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • home
  • trial

© 2025

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In