Sunday, March 1, 2026
  • Login
Hello Solapur
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ
No Result
View All Result
No Result
View All Result
Hello Solapur
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ

सोलापूर महापालिकेतील घवघवीत यश; मुख्यमंत्र्यांकडून पालकमंत्र्यांचा सत्कार

Hello Solapur by Hello Solapur
17-Jan-2026 14:37 pm
in राजकारण
0
0
SHARES
268
VIEWS

HELLO SOLAPUR | सोलापूर महानगरपालिका निवडणुकीत भारतीय जनता पार्टीने ऐतिहासिक कामगिरी करत महापालिकेवर दणदणीत विजय मिळवला आहे. देवेंद्र फडणवीस (देवाभाऊ) यांच्या सक्षम, दूरदृष्टीपूर्ण आणि विकासाभिमुख नेतृत्वाखाली भाजपाने तब्बल ८७ जागांवर विजय मिळवत सोलापूरच्या राजकारणात नवा अध्याय लिहिला असल्याची प्रतिक्रिया पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी दिली.

हा विजय केवळ संख्याबळापुरता मर्यादित नसून, विकास, पारदर्शक प्रशासन आणि लोकहिताच्या राजकारणावर जनतेने व्यक्त केलेल्या ठाम विश्वासाचे प्रतिबिंब असल्याचेही पालकमंत्री गोरे म्हणाले.
विकासाच्या मुद्द्यांवर जनतेचा ठाम कौल :
पाणीपुरवठा, रस्ते, ड्रेनेज, स्वच्छता, आरोग्य सुविधा, स्मार्ट सिटीसह विविध पायाभूत विकासकामे, तसेच केंद्र व राज्य शासनाच्या लोकाभिमुख योजनांची प्रभावी अंमलबजावणी – या मुद्द्यांवर भाजपाने मतदारांशी थेट संवाद साधला. त्याला सोलापूरकरांनी भरभरून प्रतिसाद दिला असल्याचे निकालातून स्पष्ट झाले आहे.
महापालिकेत गेल्या काही वर्षांत भाजपाने केलेल्या विकासकामांची जनतेने पुन्हा एकदा दखल घेत, भाजपाच्या बाजूने स्पष्ट कौल दिला आहे.


संघटनशक्तीचा विजय :
या निवडणुकीत भाजपाची मजबूत संघटनरचना, बूथस्तरीय कार्यकर्त्यांची मेहनत, प्रभावी प्रचारयंत्रणा आणि नियोजनबद्ध रणनीती याचा मोठा फायदा पक्षाला झाला. प्रत्येक प्रभागात कार्यकर्त्यांनी घरोघरी पोहोचून विकासाचा संदेश दिला.


निवडून आलेल्या नगरसेवकांचे अभिनंदन :
या निवडणुकीत निवडून आलेल्या सर्व नगरसेवकांचे मनःपूर्वक अभिनंदन करण्यात येत असून, सोलापूरच्या सर्वांगीण विकासासाठी ते अधिक जोमाने काम करतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. महापालिकेत भाजपाला मिळालेल्या या बहुमतामुळे शहराच्या विकासाला आता अधिक गती मिळणार आहे.


पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे विशेष योगदान :
या ऐतिहासिक विजयामागे शहर व जिल्हा पातळीवरील सर्व पदाधिकारी, ज्येष्ठ नेते, युवा कार्यकर्ते, महिला आघाडी तसेच पक्षश्रेष्ठींचे योगदान मोलाचे ठरले आहे. निवडणूक काळात अहोरात्र परिश्रम घेणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांचे पक्षाकडून मनापासून आभार व्यक्त करण्यात येत आहेत.


सोलापूरच्या राजकारणात नवे पर्व :
सोलापूर महानगरपालिकेवर भाजपाने मिळवलेला हा विजय शहराच्या राजकारणात मैलाचा दगड ठरणार असून, आगामी काळात सोलापूरच्या विकासाला नवी दिशा मिळेल, असा विश्वास भाजपाच्या नेत्यांनी व्यक्त केला आहे.

Tags: Bjp Solapurcm devendra fadanvisDevendra Fadanvishello solapurJaykumar Goreminister jaykumar goreSolapur bjpsolapur news
Previous Post

सोलापुरातील 102 नवनिर्वाचित नगरसेवकांची यादी; भाजपचा ऐतिहासिक विजयी

Next Post

“पराभव अंतिम नाही, आत्मपरीक्षणातून नवी लढाई”, महापालिका निवडणुकीनंतर प्रणिती शिंदेंचा कार्यकर्त्यांना भावनिक संदेश

Related Posts

सोलापूर महापालिकेतील स्विकृत नगरसेवकांच्या निवडी; ‘हे’ आहेत स्विकृत शिलेदार

February 21, 2026

सोलापूर महापालिकेच्या स्वीकृत नगरसेवकपदासाठी भाजप, एमआयएमकडून ‘या’ इच्छुकांनी भरला अर्ज

February 18, 2026

महाराष्ट्रात राज्यसभा निवडणुकीची घोषणा; 7 जागांसाठी होणार निवडणूक

February 18, 2026

सोलापूर जिल्हापरिषद -पंचायत समितीतील वियजी उमेदवारांची यादी

February 10, 2026

BREAKING | उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर सुनेत्रा पवारांची पहिली प्रतिक्रिया!

January 31, 2026

सोलापुरातील 102 नवनिर्वाचित नगरसेवकांची यादी; भाजपचा ऐतिहासिक विजयी

January 16, 2026
Next Post

“पराभव अंतिम नाही, आत्मपरीक्षणातून नवी लढाई”, महापालिका निवडणुकीनंतर प्रणिती शिंदेंचा कार्यकर्त्यांना भावनिक संदेश

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सोलापुरातील पती-पत्नीच्या आत्महत्येचे कारण उघड; सुसाईड नोटमधून धक्कादायक माहिती समोर

February 28, 2026

सोलापुरात पती-पत्नीचे मृतदेह आढळले; आत्महत्या की घातपात तपास सुरु

February 27, 2026

राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) च्या राष्ट्रीय अध्यक्षपदी सुनेत्रा पवार यांची एकमताने निवड

February 26, 2026

Top 5 news

  • अक्कलकोटच्या माजी आमदाराच्या नातवासह तिघांवर गुन्हा दाखल; आमदार कल्याणशेट्टींची बदनामी भोवली

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापुरातील 102 नवनिर्वाचित नगरसेवकांची यादी; भाजपचा ऐतिहासिक विजयी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापुरात पती-पत्नीचे मृतदेह आढळले; आत्महत्या की घातपात तपास सुरु

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अनगर नगरपंचायतीत राष्ट्रवादीच्या उज्ज्वला थिटेंचा अर्ज बाद, पण तरीही निवडणूक लागणार?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापुरात 3 तरुणांचा अपघाती मृत्यू; 3 पैकी 1 गोसेवक असल्याने अपघात की घातपात?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • home

© 2025

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!

WhatsApp Share