HELLO SOLAPUR | सोलापूर ब्रेकिंग
सोलापूर महापालिका निवडणुकीसाठी अखेर महाविकास आघाडी एकत्र आल्याचं स्पष्ट झालं आहे. भाजपच्या विरोधात आणि शहराच्या विकासासाठी सर्व विरोधी पक्ष एकत्र आल्याचं ठाकरे गटाचे नेते अजय दासरी यांनी जाहीर केलं आहे.
भाजपला हरवण्यासाठी सर्व पक्षांनी आपापला त्याग केल्याचं अजय दासरी यांनी सांगितलं. महाविकास आघाडीमध्ये एकूण चार पक्ष मिळून १०२ जागा लढवणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.
यामध्ये मनसे देखील महाविकास आघाडीसोबत असणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. तसेच सोलापूर महापालिकेसाठी जागावाटपाचा फॉर्म्युलाही जाहीर करण्यात आला आहे.
असा आहे फॉर्म्युला :
काँग्रेस ४५ जागा,
शिवसेना ठाकरे गट ३० जागा,
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट २० जागा,
तर माकप ७ जागा लढवणार आहे.
सोलापूर महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडी एकत्र आल्याने राजकीय वातावरण चांगलंच तापणार असल्याचं चित्र आहे.











