Saturday, February 28, 2026
  • Login
Hello Solapur
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ
No Result
View All Result
No Result
View All Result
Hello Solapur
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ

सोलापूर जिल्हा परिषद निवडणुकीत ‘हे’ दिग्गज नेते, त्यांचे कुटुंबीय निवडणुकीच्या मैदानात!

Hello Solapur by Hello Solapur
21-Jan-2026 10:00 am
in जिल्हा
0
0
SHARES
795
VIEWS

HELLO SOLAPUR | सोलापूर जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आज शेवटचा दिवस आहे. त्यामुळे जिल्ह्यातील राजकारण चांगलेच तापले असून अनेक दिग्गज नेते आणि त्यांच्या कुटुंबीयांनी निवडणूक रिंगणात उडी घेतली आहे.

मोहोळ तालुक्यातून राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष उमेश पाटील आणि त्यांचे मोठे बंधू संतोष पाटील हे दोन वेगवेगळ्या पक्षांच्या चिन्हावर निवडणूक लढवत आहेत.
संतोष पाटील हे नरखेड गटातून शिवसेना शिंदे गटाकडून ‘धनुष्यबाण’ या चिन्हावर निवडणूक लढवणार आहेत.

तर उमेश पाटील हे कुरुल गटातून राष्ट्रवादी काँग्रेसच्या ‘घड्याळ’ या चिन्हावर निवडणुकीच्या रिंगणात आहेत.

याशिवाय भाजपचे अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या पत्नीही चपळगाव गटातून भाजपकडून निवडणूक लढवणार आहेत.

सोलापूर जिल्ह्यातील अनेक प्रभावशाली नेते, राजकीय घराणी आणि कुटुंबीय यंदा थेट निवडणूक रिंगणात उतरल्याने ही लढत अधिकच रंगतदार होणार आहे.

त्यामुळे आगामी जिल्हा परिषदेत नक्की कोणता पक्ष आपला झेंडा फडकवणार, याकडे संपूर्ण सोलापूर जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

सोलापूर जिल्हा परिषदेसाठी प्रत्येक तालुक्यात सर्वच राजकीय पक्षांनी वेगवेगळ्या पद्धतीची रणनीती आखली आहे. यामध्ये करमाळा तालुक्यात राष्ट्रवादी अजित पवार गट आणि भाजप युतीमध्ये निवडणूक लढत आहे तर शिवसेना शिंदे गट स्वतंत्र निवडणुकीला सामोरे जाणार आहे.

तर सांगोल्यातही भाजप आणि शिवसेना शिंदे गट युतीमध्ये लढण्याची शक्यता आहे. याबाबत माजी आमदार शहाजी बापू पाटील आणि पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी याला दुजोरा दिला आहे.

तर मोहोळ, अक्कलकोट, पंढरपूर, माळशिरस, बार्शी मध्ये भाजप स्वबळावर लढणार आहे. एकंदरीत जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये नक्की चित्र कशा पद्धतीचं असणार हे आज दुपारी 3 नंतर स्पष्ट होणार आहे.

Tags: Bjp Solapurhello solapurMla Sachin KalyanshettyMla Shahaji bapu PatilNcp Solapurncp Umesh PatilSantosh PatilSolapur CongressSolapur ShivsenaZilla Parishad Election 2026Zilla Parishad solapurzp ceo kuldip jangamZP ElectionZP News
Previous Post

“पराभव अंतिम नाही, आत्मपरीक्षणातून नवी लढाई”, महापालिका निवडणुकीनंतर प्रणिती शिंदेंचा कार्यकर्त्यांना भावनिक संदेश

Next Post

सोलापुरातील माजी आमदाराचा मुलीच्या ‘शाही विवाहाच्या थाटा’ला फाटा; खर्च टाळून विनाअनुदानित शिक्षकांच्या मुलांच्या शिक्षणासाठी मदतीचा हात !

Related Posts

मोहोळमधील छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा उभारल्याप्रकरणी गुन्हा दाखल

February 24, 2026

अक्कलकोटच्या माजी आमदाराच्या नातवासह तिघांवर गुन्हा दाखल; आमदार कल्याणशेट्टींची बदनामी भोवली

February 5, 2026

सोलापुरातील माजी आमदाराचा मुलीच्या ‘शाही विवाहाच्या थाटा’ला फाटा; खर्च टाळून विनाअनुदानित शिक्षकांच्या मुलांच्या शिक्षणासाठी मदतीचा हात !

January 23, 2026

माळशिरसमध्ये राम सातपुतेंकडून खासदार मोहिते पाटील अन् आमदार जानकारांना मोठा धक्का

December 31, 2025

मोहोळच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे सोमेश क्षीरसागरांना आश्वासन

December 17, 2025

अक्कलकोटच्या सांगवी बुद्रुक गावात 6 महिन्यात 200 बोगस मतदारांची नोंद? चौकशीची मागणी

December 11, 2025
Next Post

सोलापुरातील माजी आमदाराचा मुलीच्या 'शाही विवाहाच्या थाटा'ला फाटा; खर्च टाळून विनाअनुदानित शिक्षकांच्या मुलांच्या शिक्षणासाठी मदतीचा हात !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सोलापुरातील पती-पत्नीच्या आत्महत्येचे कारण उघड; सुसाईड नोटमधून धक्कादायक माहिती समोर

February 28, 2026

सोलापुरात पती-पत्नीचे मृतदेह आढळले; आत्महत्या की घातपात तपास सुरु

February 27, 2026

राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) च्या राष्ट्रीय अध्यक्षपदी सुनेत्रा पवार यांची एकमताने निवड

February 26, 2026

Top 5 news

  • अक्कलकोटच्या माजी आमदाराच्या नातवासह तिघांवर गुन्हा दाखल; आमदार कल्याणशेट्टींची बदनामी भोवली

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापुरातील 102 नवनिर्वाचित नगरसेवकांची यादी; भाजपचा ऐतिहासिक विजयी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापुरात पती-पत्नीचे मृतदेह आढळले; आत्महत्या की घातपात तपास सुरु

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अनगर नगरपंचायतीत राष्ट्रवादीच्या उज्ज्वला थिटेंचा अर्ज बाद, पण तरीही निवडणूक लागणार?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापुरात 3 तरुणांचा अपघाती मृत्यू; 3 पैकी 1 गोसेवक असल्याने अपघात की घातपात?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • home

© 2025

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!

WhatsApp Share