HELLO SOLAPUR | एकीकडे महाराष्ट्रात बोगस मतदारांचा बोलबाला सुरु असतानाच दुसरीकडे अक्कलकोट तालुक्यातील सांगवी बुद्रुक गावामध्ये आधार कार्ड एडिट करून बोगस मतदार नोंदणी करण्यात आली असल्याची धक्कदायक माहिती उघकीस आली आहे.
याबाबत अक्कलकोट तालुका मराठा सेवा संघाचे अध्यक्ष प्रविण घाटगे, बबन गायकवाड आणि प्रदीप सलबत्ते यांनी याबाबतचे पुरावे उपजिल्हाधिकारी संतोष देशमुख, तहसीलदार विनायक मगर यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे दिली आहे.
या बाबतची अधिक माहिती अशी कि, सांगवी बुद्रुक मध्ये गेल्या सहा महिन्यापासून गावातील काही मुलाच्या मोबाईल वरून मतदार नोंदणी चे 6 नं फॉर्म भरण्यात आले होते. त्या फॉर्म भरतेवेळी गावातील रहिवाशी नसताना देखील त्यांचे आधार कार्ड व फोटो मागवून त्यांचे फॉर्म मोबाईल वरून भरण्यात आले.
पण धक्कादायक बाब अशी कि, या सर्वांच्या आधारकार्डची समोरील बाजू एकाची आणि मागील बाजू दुसऱ्याची आणि मागील बाजूच्या आधारकार्डवर आधार नंबर देखील नसल्याचे उघड झाले असून, असे तब्बल 160 हुन अधिक बोगस मतदारांची नोंद स्थानिक तीन ते चार मुलांच्या मोबाईलच्या मध्यमातून बी एल ओ अशोककुमार सुतार यादी भाग क्र 152 यांच्या संगनमताने आर्थिक व्यवहार करून ही बोगस मतदार नोंदणी करण्यात आली आहे.
त्या बोगस मतदारांची सर्व डुप्लिकेट आधारकार्ड व काहींचे वय देखील पूर्ण नसताना त्यांचे आधारकार्ड एडिट करून वय व पत्ता बदलेले असल्याचे तसे पुरावे देखील जिल्हाधिकारी साहेब, व तहसीलदार साहेब, यांना लेखी तक्रारी अर्जसोबत जोडले आहेत.
मुंबई, भांडुप मतदार संघात देखील या बोगस मतदारांचे नावे असून त्यांची यादी देखील पुरावा म्हणून जोडले असून, मुंबई, पुणे व इतर गावा मधील मतदार यादीत नाव असताना सांगवी बुद्रुक मधील यादीत पत्ता एडिट करून सांगवी बुद्रुक यादीत बोगस नावे कशी काय घालण्यात आली याची कसून चौकशी व्हावी व गुन्हा दाखल करण्यात यावा.
या बोगस मतदार नोंदीची तात्काळ चौकशी करून संबंधित दोषी बी.एल.ओ व ज्याच्या मोबाईल वरून नोंद करण्यात आले त्यांच्यावर फसवणूकीचा फौंजदारी गुन्हा दाखल करण्यात यावा व सर्व बोगस नोंदी तात्काळ रद्द करण्याची मागणी मराठा सेवा संघांचे अध्यक्ष प्रविण घाटगे, बबन गायकवाड आणि प्रदीप सलबत्ते, यांनी लेखी निवेदना द्वारे केली आहे.
यावेळी, प्रदीप सलबत्ते, शिवाजी टोणपे, शिवाजी भोसले, समर्थ घाटगे, महालप्पा कोळेकर, सचिन भोसले, यासह अनेक ग्रामस्थ उपस्थित होते.
सांगवी बु मध्ये या बोगस नोंदीचे एडिट केलेले सर्व पुरावे सोबत जोडले आहे. सर्व दोशी वर तात्काळ फौंजदारी गुन्हा दाखल करावा अन्यथा तहसीलदार कार्यालय येथे येत्या 5 दिवसात आमरण उपोषण करणार आहे.
– प्रविण घाटगे (अध्यक्ष,मराठा सेवा संघ अक्कलकोट)











