HELLO SOLAPUR | मागील अनेक वर्षांपासून रखडलेली जिल्हापरिषद आणि पंचायत समितीची निवडणूक अखेर जाहीर झाली आहे. एकूण 12 जिल्हा परिषदेची निवडणूक जाहीर झाली आहे. 50 टक्केच्या आतील आरक्षण असलेल्या जिल्हा परिषदांच्या निवडणुका जाहीर करण्यात आल्या आहेत. ( ZP ELECTION DECLARES IN MAHARASHTRA 12 DISTRICTS )
5 फेब्रुवारी रोजी मतदान तर 7 फेब्रुवारी रोजी मतमोजणी प्रक्रिया पार पडणार आहे. यामध्ये प्रामुख्याने पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, संभाजीनगर, परभणी, धाराशिव, लातूर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आदी जिल्ह्यातील निवडणूक जाहीर करण्यात आली आहे.
या निवडणुकीसाठी 1 जुलै 2025 ची मतदार यादी जाहीर होणार आहे. यासाठी 25, 482 मतदान केंद्र असणार आहे. एकूण जिल्हा परिषद, पंचायत समितीसाठी 731 उमेदवार असणार आहेत. त्यापैकी 369 महिलांसाठी राखीव, अनुसूचित जाती 83, अनुसूचित जमाती 25, ओबीसी 191 जागा आहेत.
त्याचबरोवर 125 पंचायत समितीसाठी 1462 जागासाठी निवडणूक होणार आहे.
असा आहे कार्यक्रम :
– 16 ते 21 जानेवारी – नामनिर्देशन पत्र म्हणजे अर्ज दाखल करणे.
– 22 जानेवारी अर्जाची छानणी
27 जानेवारी 2026 – अर्ज मागे घेण्याची तारीख
27 जानेवारी 2026 – चिन्ह वाटप
5 फेब्रुवारी 2026 – मतदान
6 फेब्रुवारी 2026 – मतमोजणी











