Sunday, July 26, 2026
  • Login
Hello Solapur
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ
No Result
View All Result
No Result
View All Result
Hello Solapur
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ

जिल्हापरिषद निवडणूक जाहीर होताच भाजपला धक्का; भाजपचे झेडपी उपाध्यक्ष अन् सभापती राष्ट्रवादीच्या गळाला

Hello Solapur by Hello Solapur
14-Jan-2026 10:20 am
in राजकारण
0
0
SHARES
932
VIEWS

HELLO SOLAPUR | कालच जिल्हा परिषद निवडणूक जाहीर झाली असतानाच  भारतीय जनता पक्षाला मोठा धक्का बसलाय. भाजपचे दोन बडे नेते राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या गळाला लागले आहेत.

सोलापूर जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष शिवानंद पाटील आणि जिल्हा परिषदेच्या अर्थ विभागाचे सभापती विजयराज डोंगरे हे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटामध्ये पक्षप्रवेश करणार आहेत.

एकीकडे भाजप सोलापूर जिल्ह्यात जिल्हा परिषद निवडणुका स्वबळावर लढण्याच्या तयारीत असतानाच दुसरीकडे भाजपाला दोन जिल्हा परिषद सदस्यांनी जय श्रीराम केला आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार आज सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार होते मात्र अचानक त्यांचा दौरा रद्द झाला. आज दोन्ही नेत्यांचा पक्षप्रवेशाचा कार्यक्रम पार पडणार होता. मात्र जिल्हा परिषद निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्याने पक्षप्रवेशाच्या कार्यक्रमाचा खर्च निवडणूक खर्चात ग्राह्य धरला जाण्याची शक्यता असल्याने हा दौरा रद्द झाला असल्याचे बोलले जात आहे.

असं असलं तरी दोन्ही नेत्यांना उपमुख्यमंत्री अजित पवारांनी बारामती मध्ये बोलावणे धाडले आहे त्यामुळे बारामतीत त्यांचा पक्षप्रवेश होण्याची शक्यता आहे.

मोहोळ तालुक्यात राष्ट्रवादीचे माजी आमदार राजन पाटील यांनी भाजप प्रवेश केल्यामुळे भाजपचे जिल्हा परिषद सदस्य आणि सभापती विजयराज डोंगरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाची वाट धरली आहे. मोहोळ तालुक्यात राजन पाटील विरुद्ध मनोहर डोंगरे असा राजकीय संघर्ष गेल्या अनेक वर्षांपासून आहे.

त्यातच राजन पाटील भाजपत आल्याने डोंगरे पिता-पुत्रांनी पुन्हा घर वापसी करण्याचा निर्णय घेतला असल्याचे बोलले जात आहे.

तर तिकडे अक्कलकोटचे भाजपचे माजी आमदार सिद्रामप्पा पाटील यांचे पुत्र आणि जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष शिवानंद पाटील यांनी देखील भाजप सोडण्याचा निर्णय घेतला आहे. पक्ष सोडण्याचे कारण समोर आले नसले तरी आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्यासोबत वैचारिक खटके उडत असल्याने हा निर्णय घेतला असल्याचे बोलले जात आहे.

दरम्यान जिल्हा परिषदेची निवडणूक जाहीर होताच भाजपला दोन मोठे धक्के बसल्याने आगामी काळात सोलापूर जिल्ह्यात भाजपला जिल्हा परिषदेत सत्ता आणण्यासाठी मोठी कसरत करावी लागणार हे नक्की.

तर पुण्याप्रमाणे सोलापुरात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आणि शरद पवार गट एकत्र आल्यास भाजपाला स्वबळावर जिल्हा परिषद ताब्यात घेण्याचे स्वप्न भंगण्याची शक्यता नाकारता येत नाही.



Tags: AkkalkotAkkalkot NewsAkkalkot PoliticsBjpBjp MoholBjp SolapurBreaking newsEx MLA Rajan Patilhello solapurMla Sachin Kalyanshettymoholmohol newsMohol PoliticsNcp Ajit pawar gatNcp SolapurShivanand Patil Akkalkotsolapur newssolapur politicsVijayraj Dongare Mohol
Previous Post

जिल्हा परिषद निवडणूक जाहीर; असा आहे पहिल्या टप्प्यातील निवडणूक कार्यक्रम

Next Post

सोलापुरातील 102 नवनिर्वाचित नगरसेवकांची यादी; भाजपचा ऐतिहासिक विजयी

Related Posts

सोलापूर विधान परिषदेसाठी भाजपकडून व्हीप बाजवला!

June 16, 2026
सोलापूर विधान परिषद निवडणुकीत राष्ट्रवादी SP गटाच्या आमदाराचा भाजपला पाठिंबा

सोलापूर विधान परिषद निवडणुकीत राष्ट्रवादी SP गटाच्या आमदाराचा भाजपला पाठिंबा

June 7, 2026
सोलापूर विधान परिषदेची निवडणूक बिनविरोध होणार?

सोलापूर विधान परिषदेची निवडणूक बिनविरोध होणार?

June 4, 2026
BREAKING पालकमंत्री गोरे अन् राजेंद्र राऊतांचा एकत्रित विमान प्रवास; विधान परिषदेच्यादृष्टीने चर्चेला उधाण

BREAKING पालकमंत्री गोरे अन् राजेंद्र राऊतांचा एकत्रित विमान प्रवास; विधान परिषदेच्यादृष्टीने चर्चेला उधाण

May 22, 2026
खासदार प्रणिती शिंदेंनी पालकमंत्री जयकुमार गोरेंना पाठवली अब्रुनुकसानकीची नोटीस

खासदार प्रणिती शिंदेंनी पालकमंत्री जयकुमार गोरेंना पाठवली अब्रुनुकसानकीची नोटीस

May 15, 2026

‘या’ कारणामुळे महिला आरक्षण विधेयकातील पहिले डिलिमिटेशन विधेयक नामंजूर!

April 17, 2026
Next Post

सोलापुरातील 102 नवनिर्वाचित नगरसेवकांची यादी; भाजपचा ऐतिहासिक विजयी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सोलापूर आसावा प्रशालेच्या माजी विद्यार्थ्यांचा 16 वर्षांनंतर पुन्हा भरला शाळेचा वर्ग

सोलापूर आसावा प्रशालेच्या माजी विद्यार्थ्यांचा 16 वर्षांनंतर पुन्हा भरला शाळेचा वर्ग

July 5, 2026
रक्तदान, शैक्षणिक साहित्य, वृक्षारोपणाने नगरसेवक अनंत जाधव यांचा वाढदिवस साजरा

रक्तदान, शैक्षणिक साहित्य, वृक्षारोपणाने नगरसेवक अनंत जाधव यांचा वाढदिवस साजरा

July 5, 2026
‘साम टीव्ही’चे सोलापूर प्रतिनिधी विश्वभूषण लिमये यांना राज्यस्तरीय बसवरत्न पुरस्कार

‘साम टीव्ही’चे सोलापूर प्रतिनिधी विश्वभूषण लिमये यांना राज्यस्तरीय बसवरत्न पुरस्कार

June 29, 2026

Top 5 news

  • अक्कलकोटच्या माजी आमदाराच्या नातवासह तिघांवर गुन्हा दाखल; आमदार कल्याणशेट्टींची बदनामी भोवली

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापुरातील पती-पत्नीच्या आत्महत्येचे कारण उघड; सुसाईड नोटमधून धक्कादायक माहिती समोर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापुरातील 102 नवनिर्वाचित नगरसेवकांची यादी; भाजपचा ऐतिहासिक विजयी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापुरात पती-पत्नीचे मृतदेह आढळले; आत्महत्या की घातपात तपास सुरु

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अनगर नगरपंचायतीत राष्ट्रवादीच्या उज्ज्वला थिटेंचा अर्ज बाद, पण तरीही निवडणूक लागणार?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • home
  • trial

© 2025

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In