Sunday, March 1, 2026
  • Login
Hello Solapur
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ
No Result
View All Result
No Result
View All Result
Hello Solapur
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ

पुरग्रस्त 82 गावात आरोग्य, स्वच्छतेची मोहिम सुरु : झेडपी सीईओ कुलदीप जंगम

Hello Solapur by Hello Solapur
06-Oct-2025 10:25 am
in जिल्हा
0
0
SHARES
1
VIEWS

HELLO SOLAPUR | सोलापूर जिल्ह्यात अतिवृष्टी व पुरामुळे जवळपास सहा तालुक्यातील 82 गावांमध्ये पाणी शिरले होते. सद्यस्थितीत या गावांमधून पाणी कमी होतेय किंवा अनेक गावांमधून पाणी पूर्णपणे ओसरले आहे. त्यामुळे या गावात साथींच्या आजाराचा प्रादुर्भाव होऊ शकतो. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या यंत्रणाकडून या सर्व गावांमध्ये स्वच्छता मोहीम हाती घेण्यात ली आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांनी याबाबत माहिती दिली.

पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या सूचनेप्रमाणे मानवी आरोग्याच्या दृष्टीने पूरग्रस्त सर्व गावे स्वच्छ होणे महत्त्वाचे आहे. पहिल्या टप्यात 53 गावात ही मोहीम राबविण्यात आली आहे.

सोलापूर जिल्ह्यात अतिवृष्टी झाल्याने नदी, ओढे, नाले भरून वाहत आहेत. पूरग्रस्त भागात स्वच्छतेची कामे व उपाययोजना करण्यासाठी व्यापक स्वरूपात मोहिम हाती घेण्यात आली असून या सर्व गावांमध्ये आरोग्य शिबिरे ही घेऊन नागरिकांच्या आरोग्याची तपासणी करण्यात आल्याची माहिती श्री. जंगम यांनी दिली.

पूरानंतर आजारांची लागण, दूषित पाणी व घाण साचून राहणे यातून गंभीर प्रश्न निर्माण होणेची शक्यता असलेने आरोग्य व स्वच्छता मोहिम घेणेत आली आहे. सर्व 82 गावातील सार्वजनिक ठिकाणी मोहिम सुरूच राहणार आहे. तरी सर्व ग्राम स्तरावरील यंत्रणांनी या आरोग्य मोहिमेत दिलेली जबाबदारी काटेकोरपणे पार पाडावी असे निर्देश श्री. जंगम यांनी दिले आहे.

पूरग्रस्त भागात स्वच्छतेची कामे प्राधान्याने घेणेत येत आहेत. यासाठी सेवाभावी संस्था कडून जेसीबी, ट्रॅक्टर घेणेत आले आहेत. जिल्हा परिषदेचे विभाग प्रमख  नोडल अधिकारी नेमून दररोज याचा आढावा घेणेत येत आहे. सार्वजनिक परिसराची स्वच्छता प्राधान्याने करणेत येत आहे. सार्वजनिक इमारती असलेल्या शाळा, अंगणवाडी, आरोग्य केंद्र, तलाठी कार्यालय, ग्रामपंचायत कार्यालय, स्मशान भुमी या ठिकाणी चिखल साफ करणेत येत आहे. या साठी जेटींग मशीन देणेत आलेली आहे. टॅंकर द्वारे पाणी फवारून पुर्ण गाळ काढून घेणेत येत आहे, असेही श्री जंगम यांनी यावेळी सांगितले.
      परिसरातील सांडपाणी आणि घाण काढणेत येत आहे. कुजलेली अन्नपदार्थाची विल्हेवाट लावणेत येत आहे. काटेरी झाडे,प्लास्टिक संकलन करणेत येत आहे. शासकीय कार्यालयातील फर्निचर  भिजलेले आहे. त्याची स्वच्छता करणेत येत आहे.
शौचालयांची व गटारांची सफाई:- सार्वजनिक शौचालयांची निर्जंतुकीकरण करून वापरासाठी योग्य बनवणेत येत आहेत.कचऱ्याची विल्हेवाट लावणेसाठी ट्रॅक्टर देणेत आलेले आहेत. तसेच सफाई कर्मचारी देऊन कचऱ्याचे योग्य पद्धतीने विल्हेवाट लावणेत येत आहे. मृत जनावरांचे शव वेळीच हटवणे व योग्य ठिकाणी जाळून किंवा जमिनीत पुरणेत येत आहे. पद्धतीने सर्व जिल्हा परिषद यंत्रणा स्वच्छता मोहिमेत सक्रिय सहभाग घेऊन गावे स्वच्छ करत असल्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी सांगितले.
      शाळा व अंगणवाडी मध्से निर्जंतुकीकरण करणेवर भर देणेत येक आहे. ब्लीचिंग पावडर, फिनाईल, क्लोरीन इ.द्वारे रस्ते, पाणी व सार्वजनिक जागा निर्जंतुक करणेत येत आहे. पाण्याच्या टाक्या व विहिरी स्वच्छ करणे. क्लोरीन टॅब्लेट/उकळलेले पाणी वापरण्याची सूचना देणेत आलेल्या आहेत. पिण्याच्या पाण्याचा बाधित स्त्रोत तात्पुरत्या स्वरुपात बंद करणेत आले आहेत. पिण्याच्या पाण्याचा पर्यायी स्त्रोत उपलब्ध करून देणेत आले आहेत. कुणीही गढूळ किंवा अस्वच्छ पाणी पिणार नाही याची काळजी घेणेत येत आहे. आरोग्य शिबीरातून तशा सुचना देणेत येत आहेत.
     डासमुक्ती मोहिमा हाती घेणेत आली आहे. ग्रामपंचायतीकडे फॉगिंग मशीन उपलब्ध आहेत. त्या ठिकाणी फॉगिंग करणेत येत आहे. साचलेले घाण पाण्यात डासांची निर्मिती होऊ नये म्हणून ऑईल फवारणी करणेत येत आहे. तात्पुरते निवारा केंद्राच्या ठिकाणी स्वच्छता व्यवस्थापन करणेत आले आहे. ग्रामस्थ या केंद्रातून घराकडे स्थलांतरीत होत आहेत.
पुरानंतर लगेच स्वच्छतेची योग्य उपाययोजना हाती घेतले मुळे गंभीर आरोग्य समस्या उद्भवू शकली नाही. त्यामुळे स्थानिक प्रशासन, नागरिक, स्वयंसेवी संस्था यांच्यात समन्वय साधून कार्यक्षमतेने काम करणेत येत आहे, असे श्री. जंगम यांनी यावेळी म्हटले.

Tags: floodHealth camphello solapurkarmala newsMadhaMarathi newsminister jaykumar goremoholNorth solapursolapur floodsolapur newssouth solapurZilla Parishad solapurzp ceo kuldip jangamमराठी न्यूजसोलापूर न्यूजहॅलो सोलापूरहॅल्लो सोलापूर
Previous Post

Video | साहेब माझ्यावर खूप अन्याय झाला; मनोहर सपाटेंची शरद पवारांकडे कैफियत

Next Post

सोलापुरातील पुरामुळे उद्ध्वस्त रस्ते पुन्हा उभारणार; केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे आश्वासन

Related Posts

मोहोळमधील छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा उभारल्याप्रकरणी गुन्हा दाखल

February 24, 2026

अक्कलकोटच्या माजी आमदाराच्या नातवासह तिघांवर गुन्हा दाखल; आमदार कल्याणशेट्टींची बदनामी भोवली

February 5, 2026

सोलापुरातील माजी आमदाराचा मुलीच्या ‘शाही विवाहाच्या थाटा’ला फाटा; खर्च टाळून विनाअनुदानित शिक्षकांच्या मुलांच्या शिक्षणासाठी मदतीचा हात !

January 23, 2026

सोलापूर जिल्हा परिषद निवडणुकीत ‘हे’ दिग्गज नेते, त्यांचे कुटुंबीय निवडणुकीच्या मैदानात!

January 21, 2026

माळशिरसमध्ये राम सातपुतेंकडून खासदार मोहिते पाटील अन् आमदार जानकारांना मोठा धक्का

December 31, 2025

मोहोळच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे सोमेश क्षीरसागरांना आश्वासन

December 17, 2025
Next Post

सोलापुरातील पुरामुळे उद्ध्वस्त रस्ते पुन्हा उभारणार; केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे आश्वासन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सोलापुरातील पती-पत्नीच्या आत्महत्येचे कारण उघड; सुसाईड नोटमधून धक्कादायक माहिती समोर

February 28, 2026

सोलापुरात पती-पत्नीचे मृतदेह आढळले; आत्महत्या की घातपात तपास सुरु

February 27, 2026

राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) च्या राष्ट्रीय अध्यक्षपदी सुनेत्रा पवार यांची एकमताने निवड

February 26, 2026

Top 5 news

  • अक्कलकोटच्या माजी आमदाराच्या नातवासह तिघांवर गुन्हा दाखल; आमदार कल्याणशेट्टींची बदनामी भोवली

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापुरातील 102 नवनिर्वाचित नगरसेवकांची यादी; भाजपचा ऐतिहासिक विजयी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापुरात पती-पत्नीचे मृतदेह आढळले; आत्महत्या की घातपात तपास सुरु

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अनगर नगरपंचायतीत राष्ट्रवादीच्या उज्ज्वला थिटेंचा अर्ज बाद, पण तरीही निवडणूक लागणार?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापुरात 3 तरुणांचा अपघाती मृत्यू; 3 पैकी 1 गोसेवक असल्याने अपघात की घातपात?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • home

© 2025

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!

WhatsApp Share