HELLO SOLAPUR | मागील अनेक वर्षापासून पंचायत समितीच्या निवडणुका राखडलेल्या होत्या. अखेर त्याला आता मुहूर्त लागला आहे.
चार दिवसांपूर्वी नगर परिषद आणि नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष पदाची आरक्षण सोडत पार पडली आहे.
यामध्ये जिल्ह्यातील पंचायत समिती सभापती आरक्षण खालीलप्रमाणे असणार आहे.
– अक्कलकोट- ना. मागास प्रवर्ग- महिला
– बार्शी – सर्वसाधारण महिला
– सांगोला – सर्वसाधारण महिला
– करमाळा – ना. मागास प्रवर्ग – महिला
– माढा – सर्वसाधारण
– पंढरपूर – अनुसूचित जाती सर्वसाधारण
– माळशिरस – सर्वसाधारण
– मंगळवेढा – सर्वसाधारण महिला
– मोहोळ – ना मागास प्रवर्ग सर्वसाधारण
– दक्षिण सोलापूर – सर्वसाधारण
– उत्तर सोलापूर – अनुसूचित जाती (महिला)
10 ऑक्टोबर रोजी पंचायत समितीच्या सभापतीपदाची आरक्षण सोडत जाहीर झाली आहे. महाराष्ट्र शासन ग्रामविकास विभागाकडील अधिसूचना दिनांक 9 सप्टेंबर 2025 अन्वये सोलापूर जिल्ह्यातील पंचायत समिती सभापती पदासाठीची प्रवर्गनिहाय संख्या निश्चित करण्यात आली आहे.
महाराष्ट्र जिल्हा परिषदा (अध्यक्ष, उपाध्यक्ष व विषय समित्यांचे सभापती) आणि पंचायत समित्या (सभापती निवडणूक) नियम 1962 मधील नियम 2 फ यातील तरतुदीनुसार सोलापूर जिल्ह्यातील 11 पंचायत समित्यांमधील अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, नागरिकांचा मागास प्रवर्ग आणि महिला यांचेकरीता पंचायत समित्या गठीत होणार आहेत.
त्यानंतर दुसऱ्या दिवसापासून सुरु होणाऱ्या अडीच वर्षाच्या कालावधीकरीता पंचायत समिती सभापती पदांचे आरक्षण कार्यक्रम पार पडला.
आज दिनांक 10 ऑक्टोबर 2025 रोजी दुपारी 1.00 वाजता जिल्हाधिकारी सोलापूर यांच्या अध्यक्षतेखाली नियोजन भवन, सात रस्ता, सोलापूर येथे हा कार्यक्रम पार पडला आहे.
आता प्रत्यक्ष निवडणुकीत कोणती आघाडी बाजी मारणार हे पाहणे महत्वाचे आहे.











