Friday, April 17, 2026
  • Login
Hello Solapur
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ
No Result
View All Result
No Result
View All Result
Hello Solapur
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ

सोलापुरात गुप्तधनाचे आमिष दाखवत 1 कोटी 87 लाखाची फसवणूक; ‘या’ आरोपीला घेतले ताब्यात

Hello Solapur by Hello Solapur
11-Oct-2025 20:27 pm
in क्राईम
0
0
SHARES
343
VIEWS

HELLO SOLAPUR | सोलापुरात जमिनीतून गुप्तधनाचा हंडा काढून देतो असे सांगत एका भोंदू बाबाकडून 1 कोटी 87 लाख 31 हजाराची फसवणूक केल्याची धक्कादायक घटना उघड झाली आहे.

कोट्यावधीची फसवणूक करणाऱ्या आरोपी भोंदू बाबाला सोलापूर पोलिसांच्या गुन्हे शाखेने जेरबंद केले आहे. मोहम्मद कादर शेख असे फसवणूक करणाऱ्या भोंदू बाबाचे नाव आहे.

फिर्यादी गोविंद मल्लिकार्जुन वंगारी यांच्या तक्रारीनंतर ही कारवाई करण्यात आली. गोविंद वंगारी यांना घरातून गुप्तधनाचा हंडा काढून देतो असे अमित दाखवले. तसेच फिर्यादीला काहीतरी द्रव्यपदार्थ पिण्यास देऊन जादूटोणा केला.

त्यासाठी आरोपी महंमद कादर शेख याने वंगारी यांच्याकडून 1 कोटी 87 लाख 31 हजार 300 रुपये वेळोवेळी घेतले अशी तक्रार पोलीस आयुक्त एम राजकुमार यांच्याकडे देण्यात आली होती.

पोलीस आयुक्तांनी तपासकामी ही तक्रार सोलापूर गुन्हे शाखेकडे पाठवली. सोलापूर गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अरविंद माने यांच्याकडे पाठवली. याचा तपास गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय काळे यांनी केला.

त्यानुसार जेलरोड पोलीस स्टेशन, सोलापूर शहर येथे गुरनं. 516/2025 भारतीय दंड संहिता कलम 406,417,420 व महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष, अनिष्ट व अघोरी प्रथा व जादुटोणा यांना प्रतिबंध घालण्याबाबत व त्यांचे समुळ उच्चाटन करण्याबाबत अधिनियम, 2013 चे कलम 3 (2) अन्वये, दिनांक 9/10/2025 रोजी गुन्हा दाखल केला आहे.

सदर गुन्ह्यातील आरोपी मोहम्मद कादरसाब शेख याचा शोध घेण्याकरीता गुन्हे शाखेकडील 4 तपास पथके रवाना केली. त्यापैकी स.पो. नि. दत्तात्रय काळे व त्यांचे तपास पथकास सदर आरोपी हा कर्नाटक राज्यातील विजापूर येथे असल्याची गोपनीय माहिती प्राप्त झाली. मात्र त्याचा निश्चित पत्ता मिळाला नाही.

त्यानंतर, मिळालेल्या माहितीनुसार दि. 9/10/2025 रोजी वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद माने, सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय काळे हे तपास पथकासह विजापूर येथे जाऊन आरोपी मोहम्मद कादरसाब शेख याला ताब्यात घेतले.

आरोपी कादर शेख हा विजयपूर येथील आदिलशाही नगर, जर्मन बेकरी जवळ राहत असल्याची माहिती प्राप्त झाली. त्यानंतर आरोपीला त्याच्या राहत्या घरातून ताब्यात घेण्यात आले आहे. तसेच यावेळी त्याच्याकडून जादुटोण्याचे साहित्य जप्त करण्यात आले.

त्यानंतर आरोपी महंमद कादर शेख याला न्यायालया समक्ष हजर केले असता, त्याला 13 /10/2025 रोजी पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

सदर गुन्ह्याचा पुढील तपास गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अरविंद माने हे करीत आहेत. सोलापूर शहरातील नागरीकांना आवाहन करण्यात आलेय की, त्यांची देखील अशाच प्रकारे फसवणुक झाली असल्यास त्यांनी संबंधीत पोलीस स्टेशन येथे तक्रार दाखल करावी.

Tags: API Dattatray KaleBlack MagicBreaking newshello solapurMarathi newsPI Arvind ManeSolapur city crime branchSolapur crimesolapur newssolapur policeमराठी न्यूजमराठी भाषासोलापूर न्यूजसोलापूर पोलीसहॅलो सोलापूरहॅल्लो सोलापूर
Previous Post

पूरग्रस्त महिला-मुलींसाठी मोफत सॅनिटरी पॅडचे वाटप

Next Post

सोलापुरातील 11 पंचायत समित्यांच्या सभापती पदाचे आरक्षण जाहीर

Related Posts

ब्रेकिंग : पंढरपूरमधील ॲसिड हल्ला प्रकरणात धक्कादायक वळण; तरुणीने स्वतःच ॲसिड ओतले….

April 13, 2026

सोलापूर जिल्ह्यात अज्ञातांनी तरुणीवर ॲसिड फेकले

April 12, 2026

दगड खाणीत बुडालेल्या यशचा मृतदेह चौथ्या दिवशी पाण्यावर; यशच्या मृत्यूला प्रशासन जबाबदार?

March 15, 2026

घरगुती गॅसच्या अवैध विक्रीप्रकरणी सोलापूर जिल्ह्यात पहिला गुन्हा दाखल; सिलेंडर देणाऱ्या एजन्सीचाही शोध सुरु

March 12, 2026

कर्नाटकमध्ये सोशल मीडियावर बंदी; मुख्यमंत्र्यांनी घेतला मोठा निर्णय

March 6, 2026

BREAKING सोलापूर बांधकाम कामगार शिष्यवृत्ती घोटाळ्यातील 20 जणांवर गुन्हा दाखल

March 5, 2026
Next Post

सोलापुरातील 11 पंचायत समित्यांच्या सभापती पदाचे आरक्षण जाहीर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

शिवसेना झेडपी सदस्यांनीच केली म्हेत्रे गटाची राजकीय कोंडी; ‘मैत्रीसाठी माघार’चे कारण देत तलवार म्यान

April 16, 2026

सोलापूर शिवसेनेची शाखाप्रमुख ते जिल्हाप्रमुख सर्वच कार्यकारिणी बरखास्त

April 15, 2026

ब्रेकिंग : पंढरपूरमधील ॲसिड हल्ला प्रकरणात धक्कादायक वळण; तरुणीने स्वतःच ॲसिड ओतले….

April 13, 2026

Top 5 news

  • अक्कलकोटच्या माजी आमदाराच्या नातवासह तिघांवर गुन्हा दाखल; आमदार कल्याणशेट्टींची बदनामी भोवली

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापुरातील पती-पत्नीच्या आत्महत्येचे कारण उघड; सुसाईड नोटमधून धक्कादायक माहिती समोर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापुरातील 102 नवनिर्वाचित नगरसेवकांची यादी; भाजपचा ऐतिहासिक विजयी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापुरात पती-पत्नीचे मृतदेह आढळले; आत्महत्या की घातपात तपास सुरु

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अनगर नगरपंचायतीत राष्ट्रवादीच्या उज्ज्वला थिटेंचा अर्ज बाद, पण तरीही निवडणूक लागणार?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • home
  • trial

© 2025

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In