Sunday, March 1, 2026
  • Login
Hello Solapur
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ
No Result
View All Result
No Result
View All Result
Hello Solapur
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ

सोलापुरात या प्रभागात 7 कोटींच्या विकासकामांचा आमदार देवेंद्र कोठेंच्या हस्ते शुभारंभ

Hello Solapur by Hello Solapur
23-Nov-2025 16:32 pm
in शहर
0
0
SHARES
89
VIEWS

HELLO SOLAPUR | सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघातील प्रभाग क्रमांक १३ साठी पहिल्या टप्प्यातील १ कोटी ८० लाख रुपये तसेच २५ -२६ च्या हेडमधून ४ कोटी ८८ लाख रुपये असा एकूण ६ कोटी ६८ लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. यातील अनेक कामे पूर्ण झाली आहेत तर उर्वरित विकासकामे लवकरच पूर्णत्वास येतील, असा विश्वास शहर मध्य मतदारसंघाचे आमदार देवेंद्र कोठे यांनी व्यक्त केला.

प्रभाग १३ मधील ७० फूट रस्त्यानजीक रस्ता डांबरीकरणाचा शुभारंभ शुक्रवारी आमदार देवेंद्र कोठे यांच्या हस्ते झाला. यावेळी भाजपच्या शहराध्यक्षा रोहिणी तडवळकर यांची प्रमुख उपस्थिती होती.

आमदार देवेंद्र कोठे म्हणाले, प्रभाग क्रमांक १३ हा भाजपचा बालेकिल्ला आहे. येथील नागरिकांनी प्रत्येक निवडणुकीत भारतीय जनता पार्टीला भरभरून मतदान केले आहे. त्याची परतफेड म्हणून प्रभाग क्रमांक १३ साठी सुमारे ७ कोटी रुपयांचा विकासनिधी देण्यात आला आहे.

आमदार देवेंद्र कोठे म्हणाले, पूर्वीचे आमदार एकदा निवडून आले की अनेक महिन्यांनी जणू सुट्टीलाच सोलापूरला येत असत. परंतु माझ्याकडे शहर मध्य विधानसभा मतदारसंघाचा आमदार म्हणून जबाबदारी आल्यानंतर १४ वेळा झालेल्या ‘देव यज्ञ’ या जनता दरबाराच्या माध्यमातून नागरिकांचे प्रश्न सोडविले जात असल्याचा अनुभव शहर मध्य मधील नागरिकांना येत आहे.

तसेच ‘आमदार आपल्या भेटीला’ या उपक्रमातूनही नागरिक माझ्याशी संवाद साधून आपल्या समस्यांचे निराकरण करून घेत आहेत. कार्यकर्त्यांना वाऱ्यावर सोडून देण्याचे पाप काही लोकप्रतिनिधी करतात. परंतु भारतीय जनता पार्टीमध्ये कार्यकर्त्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहण्याची परंपरा आहे, असेही आमदार देवेंद्र कोठे यांनी सांगितले.

प्रभाग क्रमांक १३ च्या विकासासाठी आणखी निधी लागला तर तो कमी पडू देणार नाही, असेही आमदार देवेंद्र कोठे यांनी आश्वासित केले.

याप्रसंगी आमदार देवेंद्र कोठे यांनी ‘आमदार आपल्या भेटीला’ उपक्रमांतर्गत लक्ष्मी नरसिंह मंदिर परिसर, पोशम्मा मंदिर परिसर, बोल्ली मंगल कार्यालय परिसर, चिप्पा भाजी मंडई, भावनाऋषी हॉस्पिटल परिसरात फिरून नागरिकांशी संवाद साधत निवेदने स्वीकारून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या व त्या अडचणींचे निराकरण करण्याचे आश्वासन दिले.

याप्रसंगी भारतीय जनता पार्टीच्या शहर अध्यक्षा रोहिणी तडवळकर, स्थायी समितीचे माजी सभापती राजमहिंद्र कमटम, माजी नगरसेविका विजया वड्डेपल्ली, प्रतिभा मुदगल, सुनिता कामाठी, भीमाशंकर बोळकोटे, अनिल पल्ली, भूपती कमटम, सत्यनारायण गुर्रम, यादगिरी बोम्मा, विजय चिप्पा, मंडल अध्यक्ष अक्षय अंजीखाने, विश्वनाथ प्याटी, सिध्दाराम ख्याडे, सतीश तमशेट्टी, अंजली वलसा, राजकुमार गुजर, प्रशांत पल्ली, एजाज सय्यद, जकप्पा कांबळे, ओंकार होमकर, ओम धुत्तरगावकर, गणेश पवार, अभिषेक चिंता, अंबादास सकिनाल, उदयराज गुल्लापल्ली, श्रीनिवास म्याडम पंतलु, प्रसाद पल्ली, शेखर तमशेट्टी, यशवंत पाथरूट, गंगाधर गुल्लापल्ली आदी उपस्थित होते.

देवस्थानांना निधी कमी पडू देणार नाही : आमदार देवेंद्र कोठे

शहर मध्य विधानसभा मतदारसंघात असलेल्या विविध देवस्थानांवर सोलापूरकर नागरिकांची स्वाभाविकपणे प्रचंड श्रद्धा आहे. या परिसरातील नागरिकांनी देवस्थान आणि परिसराची सुयोग्य निगा राखली आहे. या देवस्थान आणि परिसराच्या विकासासाठी कितीही निधी लागला तर तो कमी पडू दिला जाणार नाही, असे आमदार देवेंद्र कोठे यांनी सांगताच परिसरातील नागरिकांनी टाळ्यांचा कडकडाट करत आनंद व्यक्त केला.

Tags: Bjp Solapurcm devendra fadanvisDevendra KotheMahayuti Sarkarmla devendra kothesolapurSolapur bjpSolapur CitySolapur City Centralsolapur mahapalikaSolapur Mahapalika Ward No 13solapur news
Previous Post

सोलापुरातील भाजपच्या युवा नेत्याचा शिंदेंच्या शिवसेनेत पक्ष प्रवेश

Next Post

सोलापुरात मित्राच्या आत्महत्येचे दुःख सहन न झाल्याने दुसऱ्या मित्राने संपवले जीवन

Related Posts

आमदार देवेंद्र कोठेंनी ‘या’ महत्वाच्या विषयावर विधानसभेचे लक्ष वेधले; सर्व स्तरातून होतेय कौतुक

February 26, 2026

सोलापूर महापालिकेकडून संत गाडगेबाबा महाराजांच्या जयंतीनिमित्त अभिवादन

February 24, 2026

सोलापूरच्या स्वीकृत सदस्य निवडीत पालकमंत्र्यांचा मास्टर स्ट्रोक; एकीकडे निष्ठावंतांना संधी दुसरीकडे भविष्याचा विचार

February 23, 2026

मुख्यमंत्री फडणवीसांनी सोलापूरकरांना दिलेला शब्द पाळला; आयटी पार्कसाठी 50 एकर जमीन देण्याचे आदेश

February 23, 2026

मराठी पत्रकार संघाच्या वतीने मोफत हृदयरोग तपासणी शिबिर संपन्न

February 21, 2026

आई प्रतिष्ठानचे कार्य लोककल्याणाचे; मंत्री चंद्रकांत पाटलांचे मोफत कौशल्य विकास केंद्राच्या उदघाटनावेळी गौरवोद्गार

February 18, 2026
Next Post

सोलापुरात मित्राच्या आत्महत्येचे दुःख सहन न झाल्याने दुसऱ्या मित्राने संपवले जीवन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सोलापुरातील पती-पत्नीच्या आत्महत्येचे कारण उघड; सुसाईड नोटमधून धक्कादायक माहिती समोर

February 28, 2026

सोलापुरात पती-पत्नीचे मृतदेह आढळले; आत्महत्या की घातपात तपास सुरु

February 27, 2026

राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) च्या राष्ट्रीय अध्यक्षपदी सुनेत्रा पवार यांची एकमताने निवड

February 26, 2026

Top 5 news

  • अक्कलकोटच्या माजी आमदाराच्या नातवासह तिघांवर गुन्हा दाखल; आमदार कल्याणशेट्टींची बदनामी भोवली

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापुरातील 102 नवनिर्वाचित नगरसेवकांची यादी; भाजपचा ऐतिहासिक विजयी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापुरात पती-पत्नीचे मृतदेह आढळले; आत्महत्या की घातपात तपास सुरु

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अनगर नगरपंचायतीत राष्ट्रवादीच्या उज्ज्वला थिटेंचा अर्ज बाद, पण तरीही निवडणूक लागणार?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापुरात 3 तरुणांचा अपघाती मृत्यू; 3 पैकी 1 गोसेवक असल्याने अपघात की घातपात?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • home

© 2025

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!

WhatsApp Share