Saturday, February 28, 2026
  • Login
Hello Solapur
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ
No Result
View All Result
No Result
View All Result
Hello Solapur
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ

ब्रेकिंग : अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून जबरदस्ती धर्मांतर व लग्न; वकिलासह पाच जणांविरोधात गुन्हा, तिघांना अटक

Hello Solapur by Hello Solapur
05-Feb-2026 12:31 pm
in क्राईम
0
0
SHARES
676
VIEWS

HELLO SOLAPUR | सोलापुरात अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून तिला ब्लॅकमेल करत जबरदस्तीने धर्मांतर करून लग्न लावल्याची अत्यंत धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.

या प्रकरणी विजापूर नाका पोलीस ठाण्यात वकिलासह पाच जणांविरोधात गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. तरी दोन आरोपी अद्याप फरार असून त्यांचा शोध सुरू आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुख्य आरोपी इजराईल शेख हा अल्पवयीन पीडित मुलीचा सतत पाठलाग करत होता. डिसेंबर 2024 मध्ये त्याने मुलीचे फोटो आणि व्हिडिओ मिळवून तिला ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली. त्यानंतर तिला मित्र उजेब शेख यांच्या घरी नेऊन तिच्यावर अत्याचार केल्याचा आरोप आहे.

यानंतर डिसेंबर 2025 मध्ये आरोपीने मुलीला लग्नाचे आमिष दाखवत शहर काझी कार्यालयात नेले. तेथे ॲड. अब्दुल्ला खतीब यांनी लग्नासाठी धर्मांतर आवश्यक असल्याचे सांगून काही कागदपत्रांवर तिची सही घेतल्याचा आरोप आहे. त्यानंतर जबरदस्तीने तिचे धर्मांतर करून विवाह लावण्यात आल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

लग्नानंतर पीडित मुलीला काही महिने कर्नाटकातील कलबुर्गी येथे ठेवण्यात आले. त्या ठिकाणी आरोपीच्या नातेवाईकांकडून तिला मारहाण, उपाशी ठेवणे तसेच मानसिक छळ केल्याचा गंभीर आरोप मुलीने केला आहे.

सदर प्रकरणी पीडितेने दिलेल्या तक्रारीनंतर विजापूर नाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी तत्काळ कारवाई करत इजराईल शेख, उजेब शेख आणि ॲड. अब्दुल्ला खतीब यांना अटक केली आहे. उर्वरित दोन आरोपी फरार असून त्यांचा शोध सुरू आहे.

या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली असून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

Tags: Crime NewsDharmantaranPocso ActSolapur crimesolapur newsVijaypur Naka Newsसोलापूर न्यूजसोलापूर पोलीसहॅलो सोलापूर
Previous Post

अक्कलकोटच्या माजी आमदाराच्या नातवासह तिघांवर गुन्हा दाखल; आमदार कल्याणशेट्टींची बदनामी भोवली

Next Post

सोलापूर जिल्हापरिषद -पंचायत समितीतील वियजी उमेदवारांची यादी

Related Posts

सोलापुरातील पती-पत्नीच्या आत्महत्येचे कारण उघड; सुसाईड नोटमधून धक्कादायक माहिती समोर

February 28, 2026

सोलापुरात पती-पत्नीचे मृतदेह आढळले; आत्महत्या की घातपात तपास सुरु

February 27, 2026

सोलापुरात 3 तरुणांचा अपघाती मृत्यू; 3 पैकी 1 गोसेवक असल्याने अपघात की घातपात?

February 16, 2026

सोलापुरात 62 लाखांची ऑनलाईन फसवणूक करणारा टोळी प्रमुखाला सोलापूर पोलिसांनी ठोकल्या बेड्या

February 14, 2026

पंढरपूर–मंगळवेढा रस्त्यावर भीषण अपघात; 4 भाविकांचा मृत्यू, ६ गंभीर जखमी

January 26, 2026

बाळासाहेब सरवदे हत्येप्रकरणी भाजप उमेदवार शालन शिंदेंसह 15 जणांवर गुन्हा दाखल

January 3, 2026
Next Post

सोलापूर जिल्हापरिषद -पंचायत समितीतील वियजी उमेदवारांची यादी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सोलापुरातील पती-पत्नीच्या आत्महत्येचे कारण उघड; सुसाईड नोटमधून धक्कादायक माहिती समोर

February 28, 2026

सोलापुरात पती-पत्नीचे मृतदेह आढळले; आत्महत्या की घातपात तपास सुरु

February 27, 2026

राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) च्या राष्ट्रीय अध्यक्षपदी सुनेत्रा पवार यांची एकमताने निवड

February 26, 2026

Top 5 news

  • अक्कलकोटच्या माजी आमदाराच्या नातवासह तिघांवर गुन्हा दाखल; आमदार कल्याणशेट्टींची बदनामी भोवली

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापुरातील 102 नवनिर्वाचित नगरसेवकांची यादी; भाजपचा ऐतिहासिक विजयी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अनगर नगरपंचायतीत राष्ट्रवादीच्या उज्ज्वला थिटेंचा अर्ज बाद, पण तरीही निवडणूक लागणार?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापुरात 3 तरुणांचा अपघाती मृत्यू; 3 पैकी 1 गोसेवक असल्याने अपघात की घातपात?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापुरात पती-पत्नीचे मृतदेह आढळले; आत्महत्या की घातपात तपास सुरु

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • home

© 2025

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!

WhatsApp Share