Monday, August 24, 2026
  • Login
Hello Solapur
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ
No Result
View All Result
No Result
View All Result
Hello Solapur
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ

महात्मा बसवेश्वरांचे तैलचित्र विधानसभेत लावण्यास मंजुरी; विश्‍वनाथ चाकोते यांची माहिती

Hello Solapur by Hello Solapur
22-Aug-2026 12:33 pm
in महाराष्ट्र
0
महात्मा बसवेश्वरांचे तैलचित्र विधानसभेत लावण्यास मंजुरी; विश्‍वनाथ चाकोते यांची माहिती
0
SHARES
33
VIEWS

HELLO SOLAPUR NEWS | मुंबईत झालेल्या अखिल भारतीय वीरशैव लिंगायत महासभेच्या मेळाव्यात महत्त्वाच्या मागण्यांवर चर्चा करण्यात आली. यावेळी महाराष्ट्र विधानसभेत महात्मा बसवेश्वर महाराजांचे तैलचित्र लावण्याच्या मागणीला विधानसभा अध्यक्ष अ‍ॅड. राहुल नार्वेकर यांनी सकारात्मक प्रतिसाद देत मंजुरी दिल्याची माहिती वीरशैव लिंगायत महासभेचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आणि माजी आमदार विश्‍वनाथ चाकोते यांनी दिली आहे.

व्हीओ :
मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये जगद्गुरू श्री श्री श्री 1008 डॉ. चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामी, काशीपीठ यांच्या दिव्य सानिध्यात अखिल भारतीय वीरशैव लिंगायत महासभेचा मेळावा पार पडला.

यावेळी महासभेचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि कर्नाटक सरकारमधील मंत्री ईश्वर खंड्रे यांचा सत्कार करण्यात आला. तसेच देशभरातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या वीरशैव लिंगायत समाजातील मान्यवरांचा माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे आणि विधानसभा अध्यक्ष अ‍ॅड. राहुल नार्वेकर यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.

कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष माजी आमदार विश्‍वनाथ चाकोते यांनी समाजाच्या विविध मागण्या मांडल्या.

यामध्ये वीरशैव लिंगायत समाजाला यापुढे ‘सकल वीरशैव समाज’ म्हणून संबोधावे, महाराष्ट्र विधानसभेत महात्मा बसवेश्वर महाराजांचे तैलचित्र लावावे, नवी मुंबई परिसरात समाजासाठी एक एकर जागा उपलब्ध करून द्यावी, तसेच महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात वीरशैव समाजाला प्रतिनिधित्व द्यावे, अशा मागण्यांचा समावेश होता.

तसंच वीरशैव लिंगायत समाजाला स्वतंत्र धर्माचा आणि अल्पसंख्याक दर्जा देण्याची मागणीही यावेळी करण्यात आली.

या मागण्यांवर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सकारात्मक प्रतिसाद देत लवकरच महाराष्ट्र विधानसभेत महात्मा बसवेश्वर महाराजांचे तैलचित्र लावण्यात येईल, असे सांगितल्याची माहिती विश्‍वनाथ चाकोते यांनी दिली.

दरम्यान, २०१३ मध्ये तत्कालीन केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी वीरशैव लिंगायत समाजाला अल्पसंख्याक दर्जा मिळावा यासाठी प्रयत्न केले होते. मात्र, केंद्रातील सरकार बदलल्यानंतर ही मागणी प्रलंबित राहिल्याचे चाकोते यांनी सांगितले.

यावेळी कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री जगदीश शेट्टर यांनीही मंत्रिमंडळात वीरशैव समाजाला प्रतिनिधित्व देण्याबाबत सकारात्मक भूमिका व्यक्त केली.

मेळाव्यात विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या मान्यवरांना ‘वीरशैवरत्न’, ‘बसवरत्न’, ‘वीरशैव भूषण’, ‘पंचाचार्य रत्न’, ‘विठ्ठल सेवा पुरस्कार’, ‘अक्कमहादेवी रत्न’ आणि ‘वीरशैव आरोग्यदूत’ अशा विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले.

या कार्यक्रमाला महाराष्ट्रासह कर्नाटक, तेलंगणा, आंध्र प्रदेश, तामिळनाडू, केरळ आणि देशाच्या विविध भागांतून वीरशैव समाजाचे पदाधिकारी आणि बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

महात्मा बसवेश्वरांचे विचार आणि कार्य महाराष्ट्राच्या विधानसभेत तैलचित्राच्या माध्यमातून अधोरेखित होणार असल्याने वीरशैव समाजाच्या या मागणीला महत्त्व प्राप्त झाले आहे. विधानसभेच्या अध्यक्षांनी दिलेल्या या सकारात्मक प्रतिसादाची अंमलबजावणी कधी होते, याकडे आता समाजाचे लक्ष लागले आहे.

Tags: hello solapurHello Solapur NewsLingayat samajsolapur
Previous Post

राष्ट्रवादीचे नेते प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला वैद्यकीय जामीन मंजूर

Next Post

जनकल्याण मल्टीस्टेटच्या सभासदांना १३ टक्के लाभांश जाहीर; संस्थापक अध्यक्ष राजेंद्र हजारे यांची माहिती

Related Posts

ओबीसी नेते वाघमारेंवर सोलापुरात ऑनलाईन तक्रार दाखल!

ओबीसी नेते वाघमारेंवर सोलापुरात ऑनलाईन तक्रार दाखल!

August 19, 2026
आषाढी वारीत 7 लाखांहून अधिक वारकऱ्यांना मोफत आरोग्य सेवा; एअर ॲम्बुलन्स ठरले आकर्षण

आषाढी वारीत 7 लाखांहून अधिक वारकऱ्यांना मोफत आरोग्य सेवा; एअर ॲम्बुलन्स ठरले आकर्षण

July 26, 2026
रक्तदान, शैक्षणिक साहित्य, वृक्षारोपणाने नगरसेवक अनंत जाधव यांचा वाढदिवस साजरा

रक्तदान, शैक्षणिक साहित्य, वृक्षारोपणाने नगरसेवक अनंत जाधव यांचा वाढदिवस साजरा

July 5, 2026
‘साम टीव्ही’चे सोलापूर प्रतिनिधी विश्वभूषण लिमये यांना राज्यस्तरीय बसवरत्न पुरस्कार

‘साम टीव्ही’चे सोलापूर प्रतिनिधी विश्वभूषण लिमये यांना राज्यस्तरीय बसवरत्न पुरस्कार

June 29, 2026
विधानपरिषद निवडणुकीत भाजपकडून सोलापूरसह राज्यभरात अनेकांना धक्के

विधानपरिषद निवडणुकीत भाजपकडून सोलापूरसह राज्यभरात अनेकांना धक्के

June 1, 2026

मराठा आरक्षणाचा मुद्दा पुन्हा पेटणार?; 30 मेपासून आमरण उपोषणावर ठाम मनोज जरांगे पाटील

May 28, 2026
Next Post
जनकल्याण मल्टीस्टेटच्या सभासदांना १३ टक्के लाभांश जाहीर; संस्थापक अध्यक्ष राजेंद्र हजारे यांची माहिती

जनकल्याण मल्टीस्टेटच्या सभासदांना १३ टक्के लाभांश जाहीर; संस्थापक अध्यक्ष राजेंद्र हजारे यांची माहिती

ताज्या बातम्या

August 23, 2026
महात्मा बसवेश्वरांचे तैलचित्र विधानसभेत लावण्यास मंजुरी; विश्‍वनाथ चाकोते यांची माहिती

महात्मा बसवेश्वरांचे तैलचित्र विधानसभेत लावण्यास मंजुरी; विश्‍वनाथ चाकोते यांची माहिती

August 22, 2026
राष्ट्रवादीचे नेते प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला वैद्यकीय जामीन मंजूर

राष्ट्रवादीचे नेते प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला वैद्यकीय जामीन मंजूर

August 22, 2026

Top 5 news

  • अक्कलकोटच्या माजी आमदाराच्या नातवासह तिघांवर गुन्हा दाखल; आमदार कल्याणशेट्टींची बदनामी भोवली

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापुरातील पती-पत्नीच्या आत्महत्येचे कारण उघड; सुसाईड नोटमधून धक्कादायक माहिती समोर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापुरातील 102 नवनिर्वाचित नगरसेवकांची यादी; भाजपचा ऐतिहासिक विजयी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापुरात पती-पत्नीचे मृतदेह आढळले; आत्महत्या की घातपात तपास सुरु

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अनगर नगरपंचायतीत राष्ट्रवादीच्या उज्ज्वला थिटेंचा अर्ज बाद, पण तरीही निवडणूक लागणार?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • home
  • trial

© 2025

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In