Monday, August 24, 2026
  • Login
Hello Solapur
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ
No Result
View All Result
No Result
View All Result
Hello Solapur
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ

जनकल्याण मल्टीस्टेटच्या सभासदांना १३ टक्के लाभांश जाहीर; संस्थापक अध्यक्ष राजेंद्र हजारे यांची माहिती

Hello Solapur by Hello Solapur
23-Aug-2026 20:02 pm
in जिल्हा
0
जनकल्याण मल्टीस्टेटच्या सभासदांना १३ टक्के लाभांश जाहीर; संस्थापक अध्यक्ष राजेंद्र हजारे यांची माहिती
0
SHARES
21
VIEWS

HELLO SOLAPUR NEWS | जनकल्याण मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीने आर्थिक वर्ष २०२५-२६ मध्ये दमदार कामगिरी केल्याचा दावा करण्यात आला आहे. सभासदांना यंदा तब्बल १३ टक्के लाभांश देण्यात येणार असून, संस्थेच्या ठेवींनी पावणे तीनशे कोटींचा टप्पा पार केला आहे. आगामी काळात साडेतीनशे कोटी रुपयांच्या ठेवींचा टप्पा ओलांडण्याचे उद्दिष्ट असल्याची माहिती संस्थापक-अध्यक्ष राजेंद्र हजारे यांनी दिली आहे.

सोलापुरातील श्री टाकळीकर मंगल कार्यालयात जनकल्याण मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीची १४ वी वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात पार पडली.

सभेच्या अध्यक्षस्थानी सोलापूर महानगरपालिकेचे सभागृह नेते नरेंद्र काळे होते. संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशा हजारे, उपाध्यक्ष संजय जावळे यांच्यासह संचालक मंडळातील सदस्य आणि हजारो सभासद यावेळी उपस्थित होते.

यावेळी संस्थापक-अध्यक्ष राजेंद्र हजारे यांनी संस्थेच्या आर्थिक कामगिरीचा आढावा मांडला. मार्च २०२६ अखेर जनकल्याण मल्टीस्टेटने पावणे तीनशे कोटी रुपयांच्या ठेवींचा टप्पा पार केला असून, तब्बल १९८ कोटी ९१ लाख ७६ हजार ४७५ रुपयांचे कर्जवाटप करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली.

तसेच संस्थेने ९१ कोटी ३ लाख ९८ हजार ४४१ रुपयांची गुंतवणूक केली आहे. आर्थिक वर्षात संस्थेला १ कोटी ७१ लाख ७ हजार ६७७ रुपयांचा नफा झाला असून, संस्थेचा एनपीए केवळ एक टक्का असल्याचे राजेंद्र हजारे यांनी सांगितले.

जनकल्याण मल्टीस्टेटच्या सभासदांसाठी यंदा १३ टक्के लाभांश देण्यात येणार असल्याची घोषणा यावेळी करण्यात आली. ठेवीदार आणि सभासदांचा विश्वास कायम ठेवत संस्थेची आर्थिक वाटचाल आणखी मजबूत करण्याचा प्रयत्न असल्याचेही हजारे यांनी स्पष्ट केले.

सध्या संस्थेच्या माध्यमातून वैयक्तिक कर्ज, व्यवसाय कर्ज, वाहन कर्ज, गृहकर्ज, महिला बचत गटांसाठी कर्ज, सोने तारण कर्ज तसेच ऊस वाहतूक आणि तोडणीसाठी कर्ज अशा विविध योजना राबवल्या जात आहेत.

या योजनांच्या माध्यमातून कर्जदारांसह समाजातील बेरोजगार तरुणांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी करण्याचा संस्थेचा प्रयत्न असल्याचे हजारे यांनी सांगितले.

जनकल्याण मल्टीस्टेटच्या सध्या विविध तालुक्यांमध्ये एकूण २७ शाखा कार्यरत आहेत. आगामी काळात मंगळवेढा, सोलापुरातील जुनी विडी घरकुल, निर्मिती विहार परिसर, शेळगी, कुंभारी आणि वळसंग या ठिकाणी नवीन शाखा सुरू करण्याचा संस्थेचा मानस आहे.

केवळ आर्थिक व्यवहारापुरते मर्यादित न राहता सामाजिक बांधिलकीही जपली जात असल्याचे संस्थेकडून सांगण्यात आले. सीना नदीकाठच्या पूरग्रस्तांना मदत, वर्धापन दिनानिमित्त रक्तदान शिबिर, मोफत नेत्र तपासणी, चष्मे वाटप आणि गरजूंच्या नेत्रशस्त्रक्रिया अशा विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

महिलांसाठी हळदी-कुंकू कार्यक्रम, शालेय विद्यार्थ्यांसाठी विविध उपक्रम तसेच गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कारही दरवर्षी केला जातो. विविध क्षेत्रांत उल्लेखनीय काम करणाऱ्या व्यक्तींना ‘जनकल्याण गौरव पुरस्कार’ देऊन सन्मानित करण्यात येत असल्याचेही यावेळी सांगण्यात आले.

आर्थिक प्रगतीसोबतच सामाजिक बांधिलकी जपण्याचा प्रयत्न जनकल्याण मल्टीस्टेटकडून केला जात असल्याचे यावेळी अधोरेखित करण्यात आले. आगामी काळात ठेवीदार, सभासद, खातेदार, कर्जदार आणि हितचिंतकांचे हित जपण्याला प्राधान्य देणार असल्याचे संस्थापक-अध्यक्ष राजेंद्र हजारे यांनी स्पष्ट केले.

यावेळी नगरसेवक नरेंद्र काळे यांनी राजेंद्र हजारे आणि मुख्य कार्यकारी अधिकारी आशा हजारे यांच्या कामाचे कौतुक करत जनकल्याण मल्टीस्टेटच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महेश सुरवसे यांनी केले. वार्षिक सर्वसाधारण सभेसाठी उपस्थित हजारो सभासदांसाठी स्नेहभोजनाचे आयोजनही करण्यात आले होते.

Tags: hello solapurHello Solapur NewsJankalyanmultistatesolapurRajendra Hajare Solapursolapur
Previous Post

महात्मा बसवेश्वरांचे तैलचित्र विधानसभेत लावण्यास मंजुरी; विश्‍वनाथ चाकोते यांची माहिती

Related Posts

आमदार राजेंद्र राऊत हे भाजपचे बाजीप्रभू देशपांडे; पालकमंत्री जयकुमार गोरेंकडून कौतुक

आमदार राजेंद्र राऊत हे भाजपचे बाजीप्रभू देशपांडे; पालकमंत्री जयकुमार गोरेंकडून कौतुक

August 3, 2026
डीसीसी बँकेवरून आमदार राजेंद्र राऊतांची आमदार दिलीप सोपलांवर टीका तर राजन पाटलांची मात्र जाहीर माफी

डीसीसी बँकेवरून आमदार राजेंद्र राऊतांची आमदार दिलीप सोपलांवर टीका तर राजन पाटलांची मात्र जाहीर माफी

August 3, 2026
वाडिया हॉस्पिटलमध्ये अत्याधुनिक सुविधा कार्यान्वित; 74 बेड्ससह आधुनिक यंत्रणा सज्ज

वाडिया हॉस्पिटलमध्ये अत्याधुनिक सुविधा कार्यान्वित; 74 बेड्ससह आधुनिक यंत्रणा सज्ज

August 1, 2026
निरा-भीमा नदीवरील नागरिकांना सतर्कतेच्या सूचना; भीमा नदीत 1 लाख 43 हजार क्युसेक्स विसर्ग सोडला

निरा-भीमा नदीवरील नागरिकांना सतर्कतेच्या सूचना; भीमा नदीत 1 लाख 43 हजार क्युसेक्स विसर्ग सोडला

July 31, 2026
चंद्रभागा नदीच्या पाणीपातळीत वाढ; वारकरी व नागरिकांना नदीपात्रात न जाण्याचे आवाहन

चंद्रभागा नदीच्या पाणीपातळीत वाढ; वारकरी व नागरिकांना नदीपात्रात न जाण्याचे आवाहन

July 26, 2026
सोलापूर : हातात तलवार अन् चांदीची वाटी घेतलेल्या बाळबट्टलला पाहण्यासाठी वळसंगमध्ये हजारोंची गर्दी

सोलापूर : हातात तलवार अन् चांदीची वाटी घेतलेल्या बाळबट्टलला पाहण्यासाठी वळसंगमध्ये हजारोंची गर्दी

May 17, 2026

ताज्या बातम्या

जनकल्याण मल्टीस्टेटच्या सभासदांना १३ टक्के लाभांश जाहीर; संस्थापक अध्यक्ष राजेंद्र हजारे यांची माहिती

जनकल्याण मल्टीस्टेटच्या सभासदांना १३ टक्के लाभांश जाहीर; संस्थापक अध्यक्ष राजेंद्र हजारे यांची माहिती

August 23, 2026
महात्मा बसवेश्वरांचे तैलचित्र विधानसभेत लावण्यास मंजुरी; विश्‍वनाथ चाकोते यांची माहिती

महात्मा बसवेश्वरांचे तैलचित्र विधानसभेत लावण्यास मंजुरी; विश्‍वनाथ चाकोते यांची माहिती

August 22, 2026
राष्ट्रवादीचे नेते प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला वैद्यकीय जामीन मंजूर

राष्ट्रवादीचे नेते प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला वैद्यकीय जामीन मंजूर

August 22, 2026

Top 5 news

  • अक्कलकोटच्या माजी आमदाराच्या नातवासह तिघांवर गुन्हा दाखल; आमदार कल्याणशेट्टींची बदनामी भोवली

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापुरातील पती-पत्नीच्या आत्महत्येचे कारण उघड; सुसाईड नोटमधून धक्कादायक माहिती समोर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापुरातील 102 नवनिर्वाचित नगरसेवकांची यादी; भाजपचा ऐतिहासिक विजयी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापुरात पती-पत्नीचे मृतदेह आढळले; आत्महत्या की घातपात तपास सुरु

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अनगर नगरपंचायतीत राष्ट्रवादीच्या उज्ज्वला थिटेंचा अर्ज बाद, पण तरीही निवडणूक लागणार?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • home
  • trial

© 2025

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In