Thursday, September 10, 2026
  • Login
Hello Solapur
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ
No Result
View All Result
No Result
View All Result
Hello Solapur
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ

ब्रेकिंग : पंढरपूरमधील ॲसिड हल्ला प्रकरणात धक्कादायक वळण; तरुणीने स्वतःच ॲसिड ओतले….

Hello Solapur by Hello Solapur
13-Apr-2026 11:18 am
in क्राईम
0
0
SHARES
340
VIEWS

HELLO SOLAPUR | पंढरपूरमधील ॲसिड हल्ला प्रकरणाने धक्कादायक वळण घेतले असून सुरुवातीला अज्ञातांकडून हल्ला झाल्याची चर्चा असताना आता या प्रकरणामागचे वास्तव समोर आले आहे. संबंधित तरुणीने स्वतःच अंगावर ॲसिड ओतून घेतल्याची कबुली दिल्याने संपूर्ण घटनेने वेगळीच दिशा घेतली आहे.

पंढरपूर शहरातील मध्यवस्तीत राहणाऱ्या वैष्णवी सुदाम भागवत या तरुणीवर काही दिवसांपूर्वी ॲसिड हल्ला झाल्याची घटना समोर आली होती. या घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली होती. सुरुवातीला हा हल्ला अज्ञात व्यक्तींनी केल्याची शक्यता व्यक्त केली जात होती. मात्र आता स्वतः वैष्णवी भागवत हिने माध्यमांशी बोलताना या प्रकरणामागील सत्य उघड केले आहे.

वैष्णवीने दिलेल्या माहितीनुसार, घरातील सततच्या कौटुंबिक वादांमुळे ती मानसिक तणावाखाली होती. विशेषतः आजीकडून वारंवार “तुला रोग झाला आहे, त्यामुळे तू सतत आजारी पडतेस” अशा प्रकारच्या बोलण्यामुळे ती अधिकच नैराश्यात गेली होती. या मानसिक तणावातूनच जीवन संपवण्याच्या उद्देशाने तिने स्वतःवर ॲसिड ओतून घेतल्याचे तिने सांगितले.

या धक्कादायक खुलाशामुळे पोलिस तपासाची दिशा बदलण्याची शक्यता आहे. दरम्यान, वैष्णवीवर सध्या उपचार सुरू असून तिची प्रकृती स्थिर असल्याची माहिती मिळत आहे. या घटनेमुळे मानसिक आरोग्य, कौटुंबिक वातावरण आणि संवाद यांचे महत्त्व पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.

पोलिसांकडून या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असून, सर्व बाजूंनी चौकशी केली जात आहे. तसेच, अशा घटना टाळण्यासाठी समाजात जागरूकता वाढवण्याची गरज व्यक्त केली जात आहे.

Tags: Acid AttackCrime Newshello solapurPandharpurPandharpur NewsSolapur crimesolapur news
Previous Post

2 वर्षांपूर्वी नवरा गेला, आता जगण्याचा आधार असलेली 2 मुलेही शेततळ्यात बुडाली; कुटुंबावर शोककळा

Next Post

सोलापूर शिवसेनेची शाखाप्रमुख ते जिल्हाप्रमुख सर्वच कार्यकारिणी बरखास्त

Related Posts

राष्ट्रवादीचे नेते प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला वैद्यकीय जामीन मंजूर

राष्ट्रवादीचे नेते प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला वैद्यकीय जामीन मंजूर

August 22, 2026
सोलापुरात घरकुल परिसरातून फिल्मी स्टाईल एटीएम मशीनच चोरीला

सोलापुरात घरकुल परिसरातून फिल्मी स्टाईल एटीएम मशीनच चोरीला

May 16, 2026
NEET परीक्षा रद्द झाल्याने 3 विद्यार्थ्यांनी उचलले टोकाचे पाऊल; पेपरफुटीचे साईड इफेक्ट

NEET परीक्षा रद्द झाल्याने 3 विद्यार्थ्यांनी उचलले टोकाचे पाऊल; पेपरफुटीचे साईड इफेक्ट

May 16, 2026

सोलापूर जिल्ह्यात अज्ञातांनी तरुणीवर ॲसिड फेकले

April 12, 2026

दगड खाणीत बुडालेल्या यशचा मृतदेह चौथ्या दिवशी पाण्यावर; यशच्या मृत्यूला प्रशासन जबाबदार?

March 15, 2026

घरगुती गॅसच्या अवैध विक्रीप्रकरणी सोलापूर जिल्ह्यात पहिला गुन्हा दाखल; सिलेंडर देणाऱ्या एजन्सीचाही शोध सुरु

March 12, 2026
Next Post

सोलापूर शिवसेनेची शाखाप्रमुख ते जिल्हाप्रमुख सर्वच कार्यकारिणी बरखास्त

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जनकल्याण मल्टीस्टेटच्या सभासदांना १३ टक्के लाभांश जाहीर; संस्थापक अध्यक्ष राजेंद्र हजारे यांची माहिती

जनकल्याण मल्टीस्टेटच्या सभासदांना १३ टक्के लाभांश जाहीर; संस्थापक अध्यक्ष राजेंद्र हजारे यांची माहिती

August 23, 2026
महात्मा बसवेश्वरांचे तैलचित्र विधानसभेत लावण्यास मंजुरी; विश्‍वनाथ चाकोते यांची माहिती

महात्मा बसवेश्वरांचे तैलचित्र विधानसभेत लावण्यास मंजुरी; विश्‍वनाथ चाकोते यांची माहिती

August 22, 2026
राष्ट्रवादीचे नेते प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला वैद्यकीय जामीन मंजूर

राष्ट्रवादीचे नेते प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला वैद्यकीय जामीन मंजूर

August 22, 2026

Top 5 news

  • अक्कलकोटच्या माजी आमदाराच्या नातवासह तिघांवर गुन्हा दाखल; आमदार कल्याणशेट्टींची बदनामी भोवली

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापुरातील पती-पत्नीच्या आत्महत्येचे कारण उघड; सुसाईड नोटमधून धक्कादायक माहिती समोर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापुरातील 102 नवनिर्वाचित नगरसेवकांची यादी; भाजपचा ऐतिहासिक विजयी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापुरात पती-पत्नीचे मृतदेह आढळले; आत्महत्या की घातपात तपास सुरु

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अनगर नगरपंचायतीत राष्ट्रवादीच्या उज्ज्वला थिटेंचा अर्ज बाद, पण तरीही निवडणूक लागणार?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • home
  • trial

© 2025

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In