Monday, August 24, 2026
  • Login
Hello Solapur
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ
No Result
View All Result
No Result
View All Result
Hello Solapur
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ

राष्ट्रवादीचे नेते प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला वैद्यकीय जामीन मंजूर

Hello Solapur by Hello Solapur
22-Aug-2026 09:27 am
in क्राईम
0
राष्ट्रवादीचे नेते प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला वैद्यकीय जामीन मंजूर
0
SHARES
190
VIEWS

HELLO SOLAPUR NEWS |सोलापुरातील वैभव वाघे खून खटल्याशी संबंधित सदर बझार पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यातील आरोपी समरसेनजीत ऊर्फ टिपू प्रमोद गायकवाड यांना त्यांच्या अल्पवयीन मुलाच्या गंभीर आजारावरील उपचारांसाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचकडून तात्पुरता वैद्यकीय जामीन मंजूर करण्यात आला आहे. न्यायमूर्ती अश्विन डी. भोबे यांनी १८ ऑगस्ट २०२६ रोजी हा आदेश दिला.

आरोपीविरोधात सदर बझार पोलीस ठाण्यात क्राईम नंबर ०१/२०२५ अंतर्गत भारतीय न्याय संहिता, २०२३ मधील विविध कलमांसह क्रिमिनल लॉ अमेंडमेंट ॲक्टच्या कलम ७ नुसार गुन्हा दाखल आहे. यापूर्वी आरोपीने सत्र न्यायालय तसेच उच्च न्यायालयात जामिनासाठी केलेले अर्ज फेटाळण्यात आले होते. त्यानंतर दाखल करण्यात आलेला हा उच्च न्यायालयातील दुसरा जामीन अर्ज होता.

मात्र, या वेळी आरोपीने स्वतःच्या जामिनासाठी नव्हे, तर अल्पवयीन मुलाच्या गंभीर वैद्यकीय उपचारांसाठी वडील म्हणून उपस्थित राहण्याची आवश्यकता असल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले.

आरोपीच्या मुलाला Thalassaemia Major हा आनुवंशिक रक्तविकार आहे. या आजारामुळे मुलाला नियमित रक्त संक्रमणासह सातत्याने वैद्यकीय उपचारांची आवश्यकता आहे. मुंबईतील नारायण हेल्थच्या SRCC Children’s Hospital येथे मुलासाठी Haploidentical Bone Marrow Transplant करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

या बोन मॅरो ट्रान्सप्लांटसाठी पूर्ण १०० टक्के HLA-मॅच्ड डोनर उपलब्ध नसल्याने आरोपीचे वडील म्हणून असलेले नाते महत्त्वाचे ठरले आहे. उपलब्ध वैद्यकीय माहितीनुसार आरोपी स्वतः ५० टक्के HLA-मॅच्ड म्हणजेच haploidentical डोनर म्हणून निश्चित झाले आहेत.

त्यामुळे मुलाच्या उपचारासाठी वडिलांची प्रत्यक्ष उपस्थिती आवश्यक असल्याचे न्यायालयास सांगण्यात आले. याच वैद्यकीय पार्श्वभूमीवर आरोपीने २१ ऑगस्ट २०२६ ते ४ जानेवारी २०२७ या कालावधीसाठी तात्पुरता वैद्यकीय जामीन मागितला होता.

न्यायालयाने आरोपीची वैद्यकीय आणि कौटुंबिक परिस्थिती विचारात घेत २१ ऑगस्ट २०२६ पासून ४ जानेवारी २०२७ रोजी सायंकाळी ४ वाजेपर्यंत तात्पुरता वैद्यकीय जामीन मंजूर केला आहे.

मात्र, हा जामीन काही कठोर अटींसह देण्यात आला आहे.

आरोपीला संपूर्ण जामीन कालावधीत मुंबईच्या हद्दीतच राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. मुंबईच्या हद्दीबाहेर जाण्यास त्यांना मनाई करण्यात आली आहे. तसेच खेरवाडी पोलीस ठाणे, वांद्रे पूर्व, मुंबई येथे दर आठवड्याच्या पहिल्या सोमवारी हजेरी लावण्याचे निर्देश न्यायालयाने दिले आहेत.

जामिनासाठी आरोपीला ५० हजार रुपयांचा PR Bond तसेच त्याच रकमेचे एक किंवा दोन स्थानिक जामीनदार देण्याची अट ठेवण्यात आली आहे.

याशिवाय आरोपीने जामिनाचा वापर केवळ मुलाच्या वैद्यकीय उपचारासाठी करावा, पुराव्यात कोणतीही छेडछाड करू नये, तक्रारदार किंवा साक्षीदारांवर कोणत्याही प्रकारचा दबाव आणू नये आणि न्यायालयाने घातलेल्या कोणत्याही अटीचा भंग करू नये, असे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत.

त्यामुळे वैभव वाघे खून खटल्यातील आरोपीला कायमस्वरूपी जामीन मिळालेला नसून, मुलाच्या बोन मॅरो ट्रान्सप्लांट आणि उपचारांसाठी विशिष्ट कालावधीपुरता हा तात्पुरता वैद्यकीय जामीन असल्याचे महत्त्वाचे आहे.

ॲड. सोमनिंग पुजारी :

एकीकडे गंभीर आजाराने त्रस्त असलेल्या अल्पवयीन मुलाचा बोन मॅरो ट्रान्सप्लांट, तर दुसरीकडे खून खटल्यातील आरोपी म्हणून असलेली न्यायालयीन प्रक्रिया—या दोन्ही बाबींचा विचार करत उच्च न्यायालयाने मानवी आणि वैद्यकीय गरज लक्षात घेऊन हा अंतरिम दिलासा दिला आहे.

महत्त्वाचे : ४ जानेवारी २०२७ रोजी सायंकाळी ४ वाजता हा तात्पुरता वैद्यकीय जामीन कालावधी संपणार असून, त्यानंतर आरोपीला न्यायालयाच्या पुढील आदेशानुसार कारवाईला सामोरे जावे लागणार आहे.

Tags: Crime Newshello solapurHello Solapur NewsPramod GaikwadsolapurSolapur BreakingSolapur crime
Previous Post

खा. डॉ. ज्योती वाघमारे यांची केंद्र सरकारच्या महत्वाच्या समितीवर निवड

Next Post

महात्मा बसवेश्वरांचे तैलचित्र विधानसभेत लावण्यास मंजुरी; विश्‍वनाथ चाकोते यांची माहिती

Related Posts

सोलापुरात घरकुल परिसरातून फिल्मी स्टाईल एटीएम मशीनच चोरीला

सोलापुरात घरकुल परिसरातून फिल्मी स्टाईल एटीएम मशीनच चोरीला

May 16, 2026
NEET परीक्षा रद्द झाल्याने 3 विद्यार्थ्यांनी उचलले टोकाचे पाऊल; पेपरफुटीचे साईड इफेक्ट

NEET परीक्षा रद्द झाल्याने 3 विद्यार्थ्यांनी उचलले टोकाचे पाऊल; पेपरफुटीचे साईड इफेक्ट

May 16, 2026

ब्रेकिंग : पंढरपूरमधील ॲसिड हल्ला प्रकरणात धक्कादायक वळण; तरुणीने स्वतःच ॲसिड ओतले….

April 13, 2026

सोलापूर जिल्ह्यात अज्ञातांनी तरुणीवर ॲसिड फेकले

April 12, 2026

दगड खाणीत बुडालेल्या यशचा मृतदेह चौथ्या दिवशी पाण्यावर; यशच्या मृत्यूला प्रशासन जबाबदार?

March 15, 2026

घरगुती गॅसच्या अवैध विक्रीप्रकरणी सोलापूर जिल्ह्यात पहिला गुन्हा दाखल; सिलेंडर देणाऱ्या एजन्सीचाही शोध सुरु

March 12, 2026
Next Post
महात्मा बसवेश्वरांचे तैलचित्र विधानसभेत लावण्यास मंजुरी; विश्‍वनाथ चाकोते यांची माहिती

महात्मा बसवेश्वरांचे तैलचित्र विधानसभेत लावण्यास मंजुरी; विश्‍वनाथ चाकोते यांची माहिती

ताज्या बातम्या

जनकल्याण मल्टीस्टेटच्या सभासदांना १३ टक्के लाभांश जाहीर; संस्थापक अध्यक्ष राजेंद्र हजारे यांची माहिती

जनकल्याण मल्टीस्टेटच्या सभासदांना १३ टक्के लाभांश जाहीर; संस्थापक अध्यक्ष राजेंद्र हजारे यांची माहिती

August 23, 2026
महात्मा बसवेश्वरांचे तैलचित्र विधानसभेत लावण्यास मंजुरी; विश्‍वनाथ चाकोते यांची माहिती

महात्मा बसवेश्वरांचे तैलचित्र विधानसभेत लावण्यास मंजुरी; विश्‍वनाथ चाकोते यांची माहिती

August 22, 2026
राष्ट्रवादीचे नेते प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला वैद्यकीय जामीन मंजूर

राष्ट्रवादीचे नेते प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला वैद्यकीय जामीन मंजूर

August 22, 2026

Top 5 news

  • अक्कलकोटच्या माजी आमदाराच्या नातवासह तिघांवर गुन्हा दाखल; आमदार कल्याणशेट्टींची बदनामी भोवली

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापुरातील पती-पत्नीच्या आत्महत्येचे कारण उघड; सुसाईड नोटमधून धक्कादायक माहिती समोर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापुरातील 102 नवनिर्वाचित नगरसेवकांची यादी; भाजपचा ऐतिहासिक विजयी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापुरात पती-पत्नीचे मृतदेह आढळले; आत्महत्या की घातपात तपास सुरु

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अनगर नगरपंचायतीत राष्ट्रवादीच्या उज्ज्वला थिटेंचा अर्ज बाद, पण तरीही निवडणूक लागणार?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • home
  • trial

© 2025

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In