Friday, April 17, 2026
  • Login
Hello Solapur
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ
No Result
View All Result
No Result
View All Result
Hello Solapur
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ

सोलापुरात 62 लाखांची ऑनलाईन फसवणूक करणारा टोळी प्रमुखाला सोलापूर पोलिसांनी ठोकल्या बेड्या

Hello Solapur by Hello Solapur
14-Feb-2026 14:42 pm
in क्राईम
0
0
SHARES
704
VIEWS

HELLO SOLAPUR | सोलापुरातील एका गुंतवणूकदाराची तब्बल 62 लाख रुपयांची आर्थिक फसवणूक करणाऱ्या आंतरराष्ट्रीय सायबर फसवणूक टोळीच्या प्रमुखाला अटक करण्यात आलीय. या टोळीचा मुख्य सूत्रधार असलेल्या ग्लेस पर्सी सिक्वेरा याला अखेर अटक करण्यात सोलापूर शहर सायबर क्राईम पोलिसांना मोठे यश मिळाले आहे.

गेल्या तीन वर्षांपासून फरार असलेला हा आरोपी अहमदाबाद विमानतळावरून पोलिसांच्या जाळ्यात अडकला.

सोलापूर शहरातील एका नागरिकाला शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीवर 300 टक्क्यांपर्यंत परतावा मिळेल, असे आमिष दाखवून आरोपी आणि त्याच्या टोळीने विश्वास संपादन केला.

त्यानंतर टप्प्याटप्प्याने विविध बँक खात्यांमध्ये रक्कम भरण्यास भाग पाडत 62 लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली होती.

या प्रकरणाचा तपास करत असताना, ही फसवणूक केवळ स्थानिक नसून आंतरराष्ट्रीय स्तरावर चालणाऱ्या सायबर रॅकेटचा भाग असल्याचे उघड झाले.

आरोपी ग्लेस पर्सी सिक्वेरा हा गेल्या तीन वर्षांपासून लाओस देशात वास्तव्य करून, तेथून चीन आणि मलेशिया येथील साथीदारांच्या मदतीने सायबर फसवणुकीचे रॅकेट चालवत होता.

तपासात आणखी धक्कादायक बाब समोर आली आहे. आरोपी भारतीय तरुणांना डाटा एन्ट्री, ऑनलाइन जॉब, चांगल्या पगाराचे आमिष दाखवून परदेशात बोलावून घेत होता.

त्यानंतर त्यांचे पासपोर्ट जप्त करून, त्यांच्याकडून जबरदस्तीने सायबर फसवणुकीची कामे करून घेतली जात असल्याचे निष्पन्न झाले आहे.

या गंभीर गुन्ह्याच्या अनुषंगाने सोलापूर शहर सायबर क्राईम पोलिसांनी आरोपीविरोधात लूकआउट नोटीस जारी केली होती. त्यानुसार भारतात येण्याचा प्रयत्न करत असताना, अहमदाबाद विमानतळावर इमिग्रेशन विभागाच्या मदतीने आरोपीला अटक करण्यात आली.

आत्तापर्यंत या प्रकरणात एकूण 8 आरोपी निष्पन्न झाले असून, आणखी आरोपींचा शोध घेण्यासाठी तपास वेगाने सुरू आहे. आरोपीला सोलापूर न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्याला 4 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

दरम्यान, आरोपीकडून आंतरराष्ट्रीय बँक व्यवहार, डिजिटल वॉलेट, क्रिप्टो व्यवहार, तसेच इतर फसवणुकीच्या प्रकरणांची माहिती मिळण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. या कारवाईमुळे सायबर फसवणुकीच्या वाढत्या घटनांवर मोठा आळा बसेल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.

सोलापूर शहर सायबर क्राईम पोलिसांकडून नागरिकांना ऑनलाइन गुंतवणूक, शेअर मार्केट परताव्याची आमिषे आणि परदेशी नोकरीच्या ऑफर्सबाबत सावध राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Tags: Crime NewsCyber CrimeCyber crime solapurhello solapurMarathi newsOnline crimesolapurSolapur city crime branchSolapur crimesolapur news
Previous Post

सोलापूर जिल्हापरिषद -पंचायत समितीतील वियजी उमेदवारांची यादी

Next Post

सोलापुरात 3 तरुणांचा अपघाती मृत्यू; 3 पैकी 1 गोसेवक असल्याने अपघात की घातपात?

Related Posts

ब्रेकिंग : पंढरपूरमधील ॲसिड हल्ला प्रकरणात धक्कादायक वळण; तरुणीने स्वतःच ॲसिड ओतले….

April 13, 2026

सोलापूर जिल्ह्यात अज्ञातांनी तरुणीवर ॲसिड फेकले

April 12, 2026

दगड खाणीत बुडालेल्या यशचा मृतदेह चौथ्या दिवशी पाण्यावर; यशच्या मृत्यूला प्रशासन जबाबदार?

March 15, 2026

घरगुती गॅसच्या अवैध विक्रीप्रकरणी सोलापूर जिल्ह्यात पहिला गुन्हा दाखल; सिलेंडर देणाऱ्या एजन्सीचाही शोध सुरु

March 12, 2026

कर्नाटकमध्ये सोशल मीडियावर बंदी; मुख्यमंत्र्यांनी घेतला मोठा निर्णय

March 6, 2026

BREAKING सोलापूर बांधकाम कामगार शिष्यवृत्ती घोटाळ्यातील 20 जणांवर गुन्हा दाखल

March 5, 2026
Next Post

सोलापुरात 3 तरुणांचा अपघाती मृत्यू; 3 पैकी 1 गोसेवक असल्याने अपघात की घातपात?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

शिवसेना झेडपी सदस्यांनीच केली म्हेत्रे गटाची राजकीय कोंडी; ‘मैत्रीसाठी माघार’चे कारण देत तलवार म्यान

April 16, 2026

सोलापूर शिवसेनेची शाखाप्रमुख ते जिल्हाप्रमुख सर्वच कार्यकारिणी बरखास्त

April 15, 2026

ब्रेकिंग : पंढरपूरमधील ॲसिड हल्ला प्रकरणात धक्कादायक वळण; तरुणीने स्वतःच ॲसिड ओतले….

April 13, 2026

Top 5 news

  • अक्कलकोटच्या माजी आमदाराच्या नातवासह तिघांवर गुन्हा दाखल; आमदार कल्याणशेट्टींची बदनामी भोवली

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापुरातील पती-पत्नीच्या आत्महत्येचे कारण उघड; सुसाईड नोटमधून धक्कादायक माहिती समोर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापुरातील 102 नवनिर्वाचित नगरसेवकांची यादी; भाजपचा ऐतिहासिक विजयी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापुरात पती-पत्नीचे मृतदेह आढळले; आत्महत्या की घातपात तपास सुरु

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अनगर नगरपंचायतीत राष्ट्रवादीच्या उज्ज्वला थिटेंचा अर्ज बाद, पण तरीही निवडणूक लागणार?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • home
  • trial

© 2025

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In