Sunday, March 1, 2026
  • Login
Hello Solapur
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ
No Result
View All Result
No Result
View All Result
Hello Solapur
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ

ज्येष्ठ पत्रकार एजाज हुसेन मुजावर यांचे निधन

Hello Solapur by Hello Solapur
20-Nov-2025 11:39 am
in शहर
0
0
SHARES
138
VIEWS

HELLO SOLAPUR | सोलापूरच्या पत्रकारितेतील ज्येष्ठ पत्रकार व लोकसत्ताचे सोलापूर जिल्हा प्रतिनिधी एजाज हुसेन मुजावर यांचे आज (गुरुवार) सकाळी ९.१५ वाजता निधन झाले. एजाजहुसेन ममुजावर मृत्यूसमयी ६० वर्षांचे होते.

पत्रकार मुजावर यांचा ३८ वर्षांचा पत्रकारितेचा प्रदीर्घ प्रवास संपला अखेर थांबला आहेत. एजाज मुजावर यांनी आपल्या पत्रकारितेची सुरुवात संचार या दैनिकातून केली. स्व. रंगाअण्णा वैद्य यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी पत्रकारितेचे प्राथमिक धडे घेतले आणि पुढे लोकसत्ताचे सोलापूर जिल्हा प्रतिनिधी म्हणून काम करताना त्यांनी असंख्य मोठ्या बातम्यांच्या माध्यमातून समाजाचे प्रश्न सोडवले.

त्यांच्या ३८ वर्षांच्या कारकिर्दीत त्यांनी सोलापूर जिल्ह्यातील राजकीय हालचाली, सामाजिक घडामोडी, शासकीय निर्णयप्रक्रिया, तात्कालिक घटना या सर्वांचा अभ्यासपूर्ण मागोवा घेतला. सोलापूर शहर आणि जिल्ह्याचा ते “चलता-बोलता संदर्भ ग्रंथ” म्हणून लौकिक मिळवले होते.

एजाज मुजावर यांची ओळख निस्पृह, निरपेक्ष आणि निर्भीड पत्रकार म्हणून होती. जिल्ह्यातील अनेक राजकीय नेते त्यांचा सल्ला घेत असत, तर नवोदित पत्रकार माहिती आणि संदर्भांसाठी त्यांच्याकडे धाव घेत. अचानक झालेल्या प्रकृती बिघाडाचा परिणाम तीन महिन्यांपूर्वी त्यांना विस्मृतीचा आजार जाणवू लागला. वैद्यकीय तपासणीत मेंदूवर गाठ असल्याचे निदान झाले. त्यानंतर त्यांच्यावर मुंबईच्या रिलायन्स हॉस्पिटलमध्ये शस्त्रक्रिया करण्यात आली.

या उपचारांमुळे काही काळ आराम मिळाला; परंतु मागील आठवड्यात त्यांचा त्रास पुन्हा वाढला. आज सकाळीच त्यांना मुंबईहून सोलापुरात आणून शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचार सुरू असतानाच सकाळी ९.१५ वाजता त्यांची प्राणज्योत मालवली.

पत्रकारिता क्षेत्रात शोककळा

एजाज मुजावर यांच्या निधनाने सोलापूर पत्रकारिता क्षेत्रावर शोककळा पसरली आहे. विषयाची परिपूर्ण तयारी, अभ्यासू लिखाण आणि परखड भूमिका यामुळे त्यांनी पत्रकारितेतील एक वेगळी छाप निर्माण केली होती. अखेर आज त्यांची प्राणज्योत मालवली. ‘हॅलो सोलापूर’तर्फे त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली.

Tags: Ejajhusain MujawarJournalistMarathi newssolapursolapur newsSolapur Reporter
Previous Post

सोलापूरच्या झोपडपट्टीतून थेट शिवसेनेच्या स्टार प्रचारक!, संघर्ष कन्येची स्फूर्तीदायक यशोगाथा

Next Post

अनगर नगरपंचायत बिनविरोध; पालकमंत्री जयकुमार गोरेंनी राजन पाटलांचे घरी जाऊन केले अभिनंदन

Related Posts

आमदार देवेंद्र कोठेंनी ‘या’ महत्वाच्या विषयावर विधानसभेचे लक्ष वेधले; सर्व स्तरातून होतेय कौतुक

February 26, 2026

सोलापूर महापालिकेकडून संत गाडगेबाबा महाराजांच्या जयंतीनिमित्त अभिवादन

February 24, 2026

सोलापूरच्या स्वीकृत सदस्य निवडीत पालकमंत्र्यांचा मास्टर स्ट्रोक; एकीकडे निष्ठावंतांना संधी दुसरीकडे भविष्याचा विचार

February 23, 2026

मुख्यमंत्री फडणवीसांनी सोलापूरकरांना दिलेला शब्द पाळला; आयटी पार्कसाठी 50 एकर जमीन देण्याचे आदेश

February 23, 2026

मराठी पत्रकार संघाच्या वतीने मोफत हृदयरोग तपासणी शिबिर संपन्न

February 21, 2026

आई प्रतिष्ठानचे कार्य लोककल्याणाचे; मंत्री चंद्रकांत पाटलांचे मोफत कौशल्य विकास केंद्राच्या उदघाटनावेळी गौरवोद्गार

February 18, 2026
Next Post

अनगर नगरपंचायत बिनविरोध; पालकमंत्री जयकुमार गोरेंनी राजन पाटलांचे घरी जाऊन केले अभिनंदन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सोलापुरातील पती-पत्नीच्या आत्महत्येचे कारण उघड; सुसाईड नोटमधून धक्कादायक माहिती समोर

February 28, 2026

सोलापुरात पती-पत्नीचे मृतदेह आढळले; आत्महत्या की घातपात तपास सुरु

February 27, 2026

राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) च्या राष्ट्रीय अध्यक्षपदी सुनेत्रा पवार यांची एकमताने निवड

February 26, 2026

Top 5 news

  • अक्कलकोटच्या माजी आमदाराच्या नातवासह तिघांवर गुन्हा दाखल; आमदार कल्याणशेट्टींची बदनामी भोवली

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापुरातील 102 नवनिर्वाचित नगरसेवकांची यादी; भाजपचा ऐतिहासिक विजयी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापुरात पती-पत्नीचे मृतदेह आढळले; आत्महत्या की घातपात तपास सुरु

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अनगर नगरपंचायतीत राष्ट्रवादीच्या उज्ज्वला थिटेंचा अर्ज बाद, पण तरीही निवडणूक लागणार?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापुरात 3 तरुणांचा अपघाती मृत्यू; 3 पैकी 1 गोसेवक असल्याने अपघात की घातपात?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • home

© 2025

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!

WhatsApp Share