Friday, April 17, 2026
  • Login
Hello Solapur
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ
No Result
View All Result
No Result
View All Result
Hello Solapur
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ

अनगर नगरपंचायत बिनविरोध; पालकमंत्री जयकुमार गोरेंनी राजन पाटलांचे घरी जाऊन केले अभिनंदन

Hello Solapur by Hello Solapur
21-Nov-2025 17:56 pm
in राजकारण
0
0
SHARES
327
VIEWS

HELLO SOLAPUR | अनगर नगरपंचायत बिनविरोध झाल्यानंतर पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी राजन पाटील यांचे अभिनंदन केले. अपक्ष उमेदवार सरस्वती शिंदे यांनी आज आपला उमेदवारी अर्ज मागे घेतल्यानंतर अखेर अनगर नगरपंचायत बिनविरोध झाली. त्यामुळे सोलापूर जिल्ह्यात भाजपमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

बिनविरोध निवडणूक निश्चित झाल्यानंतर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी तात्काळ माजी आमदार राजन पाटील यांच्या मातोश्री निवासस्थानी भेट देत त्यांचे विशेष अभिनंदन केले.

अनगर नगरपंचायतीत निवडणूक बिनविरोध करण्यामागे राजन पाटील यांचे नेतृत्व, सर्वपक्षीय संवाद आणि स्थानिक पातळीवरील समन्वय महत्त्वाचा ठरल्याचे पालकमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

नगराध्यक्ष प्राजक्ता पाटील यांचेही अभिनंदन :

यासोबतच पालकमंत्री गोरे यांनी नव्याने बिनविरोध निवडून आलेल्या नगराध्यक्ष प्राजक्ता पाटील तसेच सर्व नव्या नगरसेवकांचेही मनःपूर्वक अभिनंदन केले.
अनगरच्या सर्वांगिण विकासासाठी राज्य सरकारकडून पूर्ण सहकार्य दिले जाईल, अशी ग्वाहीही त्यांनी यावेळी दिली.

अपक्ष उमेदवाराने अर्ज मागे घेतला :

आज दुपारी अपक्ष उमेदवाराने आपला उमेदवारी अर्ज मागे घेतल्यानंतर अनगर नगरपंचायत बिनविरोध झाल्याची घोषणा करण्यात आली.

यामुळे येथील राजकीय प्रक्रिया शांततापूर्ण मार्गाने पूर्ण झाल्याचे स्थानिक नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.

अनगर नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष पदासाठी पात्र असलेल्या अपक्ष उमेदवार सरस्वती शिंदे यांचा उमेदवारी अर्ज अखेर मागे घेण्यात आला आहे. त्यामुळे अनगर नगरपंचायत तांत्रिकदृष्ट्या बिनविरोध झाली आहे.

मात्र असं असलं तरी राष्ट्रवादी अजितदादा गटाच्या उमेदवार उज्वला थिटे यांनी न्यायालयात धाव घेतल्याने कोर्टाच्या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागलेय. तूर्तास अनगर मधील 17 नगरसेवक आणि नगराध्यक्ष अखेर बिनविरोध झाले आहे.

नगराध्यक्षपदी प्राजक्ता अजिंक्यराणा पाटील या बिनविरोध निवडून आल्या आहे. राष्ट्रवादी अजितदादा गटाच्या उमेदवार उज्वला थिटे यांचा अर्ज बाद झाल्यानंतर आरोप प्रत्यारोप झाले होते.

त्यानंतर आज अखेर अपक्ष उमेदवार सरस्वती शिंदे यांनी आज अर्ज मागे घेतला. त्यामुळे तांत्रिकदृष्ट्या अनगर नगरपरिषद बिनविरोध झालीय. मात्र कोर्ट काय निर्णय देते हे पाहणे महत्वाचे आहे.

Tags: Ajinkyarana PatilBalraje PatilBjpBjp SolapurEx MLA Rajan Patilhello solapurJaykumar Gorencp Umesh PatilPrajakta Patilrajan patilsolapurSolapur bjpSolapur NcpUjjwala Thite
Previous Post

ज्येष्ठ पत्रकार एजाज हुसेन मुजावर यांचे निधन

Next Post

सोलापुरातील भाजपच्या युवा नेत्याचा शिंदेंच्या शिवसेनेत पक्ष प्रवेश

Related Posts

शिवसेना झेडपी सदस्यांनीच केली म्हेत्रे गटाची राजकीय कोंडी; ‘मैत्रीसाठी माघार’चे कारण देत तलवार म्यान

April 16, 2026

मुलांच्या सर्वांगण विकासासाठी समर्पित नाट्य शाळेच्या वतीने ‘गंमत बालनाट्य शिबीराचे’ आयोजन

April 11, 2026

सोलापुरातील ‘या’ पदाधिकाऱ्यासाठी थेट मुख्यमंत्र्यांकडून शिफारस; भाजप वर्तुळात मोठी चर्चा

April 7, 2026

सोलापूर झेडपीचे अध्यक्षपद बार्शीकडे? यांचे नाव जवळपास निश्चित

March 15, 2026

सोलापूर झेडपीच्या गटनेते, प्रतोद अन् प्रवक्तेपदी मराठा समाजाला संधी; अध्यक्षपद मात्र गुलदस्त्यात!

March 10, 2026

शिवसेनेकडून राज्यसभेवर गेलेल्या ज्योती वाघमारे नक्की कोण आहेत?

March 5, 2026
Next Post

सोलापुरातील भाजपच्या युवा नेत्याचा शिंदेंच्या शिवसेनेत पक्ष प्रवेश

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

शिवसेना झेडपी सदस्यांनीच केली म्हेत्रे गटाची राजकीय कोंडी; ‘मैत्रीसाठी माघार’चे कारण देत तलवार म्यान

April 16, 2026

सोलापूर शिवसेनेची शाखाप्रमुख ते जिल्हाप्रमुख सर्वच कार्यकारिणी बरखास्त

April 15, 2026

ब्रेकिंग : पंढरपूरमधील ॲसिड हल्ला प्रकरणात धक्कादायक वळण; तरुणीने स्वतःच ॲसिड ओतले….

April 13, 2026

Top 5 news

  • अक्कलकोटच्या माजी आमदाराच्या नातवासह तिघांवर गुन्हा दाखल; आमदार कल्याणशेट्टींची बदनामी भोवली

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापुरातील पती-पत्नीच्या आत्महत्येचे कारण उघड; सुसाईड नोटमधून धक्कादायक माहिती समोर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापुरातील 102 नवनिर्वाचित नगरसेवकांची यादी; भाजपचा ऐतिहासिक विजयी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापुरात पती-पत्नीचे मृतदेह आढळले; आत्महत्या की घातपात तपास सुरु

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अनगर नगरपंचायतीत राष्ट्रवादीच्या उज्ज्वला थिटेंचा अर्ज बाद, पण तरीही निवडणूक लागणार?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • home
  • trial

© 2025

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In