Thursday, May 21, 2026
  • Login
Hello Solapur
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ
No Result
View All Result
No Result
View All Result
Hello Solapur
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ

राष्ट्रवादीचा बालेकिल्ला, सोलापूर जिल्हा; मात्र भाजपने एका फटक्यात मारला डल्ला!

Hello Solapur by Hello Solapur
18-Oct-2025 14:52 pm
in राजकारण
0
0
SHARES
171
VIEWS

HELLO SOLAPUR | सोलापूर जिल्ह्यात मागील काही दिवसांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट तसेच शिवसेना शिंदे गटात पक्षांतर्गत धुसफूस वाढीला लागली आहे.

पक्षांतर्गत वर्चस्ववादातून शिवसेना शिंदे गटाचे संपर्कप्रमुख शिवाजी सावंत यांनी आपल्या समर्थकांसह पक्षाच्या सर्व पदांचा तसेच सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर त्यांनी भाजपमध्ये जाणार असल्याचं स्पष्ट केलं.

शिवसेना शिंदे गटातील हा धुरळा खाली बसतो न बसतो तोवर आता महायुतीतील मित्रपक्ष असलेल्या राष्ट्रवादी अजित पवार गटातून अनेक निष्ठावंत नेते भाजपच्या उंबरठ्यावर असल्याचं पाहायला मिळत आहे.

मुंबईमध्ये सोलापूर जिल्ह्यातील अजित पवार गटाचे माजी आमदार राजन पाटील, यशवंत माने, बबनदादा शिंदे यांचे पुत्र आणि काँग्रेसचे माजी आमदार दिलीप माने या बड्या नेत्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपच्या बड्या नेत्यांची भेट घेतली. त्यानंतर भाजप मोठ्या तयारीत असल्याचे संकेत मिळाले आहेत.

तर तिकडे सांगोल्यातही पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार दिपक साळूंखे यांची भेट घेतली. त्यामुळे दिपक साळूंखे देखील भाजपच्या वाटेवर असल्याचे संकेत मिळाले आहेत.

उपमुख्यमंत्री अजित पवार फेल :

सोलापूर जिल्हा हा राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला होता. मात्र गेल्या काही दिवसात राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्चस्व कमी होताना दिसत आहे. विशेषतः राष्ट्रवादी अजित पवार गट आता सोलापूर जिल्ह्यात नावालाच राहिला आहे की काय अशी स्थिती झाली आहे. यानिमित्ताने अजित पवार यांचे नेतृत्व निष्प्रभ ठरते की काय अशी चिन्हे आहेत.

वास्तविक पाहता पक्ष फुटीनंतरही शरद पवारांनी सोलापूर जिल्ह्यातील आपली नेतृत्वाची निवड आणि जिल्ह्यातील पकड मजबूत ठेवली आहे. मात्र अजित पवार काकांच्या तुलनेत सपशेल फेल ठरले आहेत.

अजित पवार गटाचा पाडाव असाच सुरु राहिला तर मात्र आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेत राष्ट्रवादी अजित पवार गट भोपळ्यावरच राहण्याची शक्यता नाकारता येत नाही.

महायुयीच्या दोस्तीत कुस्ती :

वास्तविक पाहता महायुतीच्या दोस्तीत कुस्ती नाही करायची असे ठरलेले असताना शिवसेना शिंदे गटाने या नियमाला छेद दिला. कारण अक्कलकोट तालुक्यातील काँग्रेसचे माजी आमदार आणि माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांना शिवसेनेत प्रवेश दिल्याने भाजपतील वरिष्ठ नेतृत्व नाराज झाले होते.

त्यानंतर मात्र भाजपने आता पक्ष प्रवेशाचा झपाटाच लावल्याने शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गट पुरता बेहाल झाला आहे. दोस्तीतील कुस्तीचा हा राजकीय अंक आणखी कोणते राजकीय बॉम्ब टाकणार हे पाहणे महत्वाचे आहे.






Tags: Ajit PawarBjpBreaking newsCollector officehello solapurMaharashtra PoliticsNcp Ajit pawar gatNcp Sharad pawar gatNcp Solapursharad pawarsolapursolapur newssolapur political newssolapur politics
Previous Post

राष्ट्रवादीचे राजन पाटील भाजपच्या वाटेवर; जिल्हाध्यक्ष उमेश पाटीलांचे ओपन चॅलेंज

Next Post

सोलापुरात भाजप आमदार लागले कामाला; बापू-मालक एकत्र तर देवेंद्र दादा एकटा बॉस

Related Posts

खासदार प्रणिती शिंदेंनी पालकमंत्री जयकुमार गोरेंना पाठवली अब्रुनुकसानकीची नोटीस

खासदार प्रणिती शिंदेंनी पालकमंत्री जयकुमार गोरेंना पाठवली अब्रुनुकसानकीची नोटीस

May 15, 2026

‘या’ कारणामुळे महिला आरक्षण विधेयकातील पहिले डिलिमिटेशन विधेयक नामंजूर!

April 17, 2026

शिवसेना झेडपी सदस्यांनीच केली म्हेत्रे गटाची राजकीय कोंडी; ‘मैत्रीसाठी माघार’चे कारण देत तलवार म्यान

April 16, 2026

मुलांच्या सर्वांगण विकासासाठी समर्पित नाट्य शाळेच्या वतीने ‘गंमत बालनाट्य शिबीराचे’ आयोजन

April 11, 2026

सोलापुरातील ‘या’ पदाधिकाऱ्यासाठी थेट मुख्यमंत्र्यांकडून शिफारस; भाजप वर्तुळात मोठी चर्चा

April 7, 2026

सोलापूर झेडपीचे अध्यक्षपद बार्शीकडे? यांचे नाव जवळपास निश्चित

March 15, 2026
Next Post

सोलापुरात भाजप आमदार लागले कामाला; बापू-मालक एकत्र तर देवेंद्र दादा एकटा बॉस

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

‘राष्ट्रवादी दादा गटाचे 22 आमदार पवार गटाच्या संपर्कात’ हे वृत्त खोडसाळपणाचे : दादा गट

‘राष्ट्रवादी दादा गटाचे 22 आमदार पवार गटाच्या संपर्कात’ हे वृत्त खोडसाळपणाचे : दादा गट

May 20, 2026
सोलापूरसह २० मे रोजी औषध दुकाने बंद राहणार; देशव्यापी औषध विक्रेता बंदची हाक

सोलापूरसह २० मे रोजी औषध दुकाने बंद राहणार; देशव्यापी औषध विक्रेता बंदची हाक

May 19, 2026
ब्रेकिंग : राष्ट्रवादीच्या उमेश पाटलांनी रोहित पवारांना धु धु धुतला; पक्ष विलीनीकरण ते भाजप प्रवेशापर्यंत सगळंच काढलं

ब्रेकिंग : राष्ट्रवादीच्या उमेश पाटलांनी रोहित पवारांना धु धु धुतला; पक्ष विलीनीकरण ते भाजप प्रवेशापर्यंत सगळंच काढलं

May 18, 2026

Top 5 news

  • अक्कलकोटच्या माजी आमदाराच्या नातवासह तिघांवर गुन्हा दाखल; आमदार कल्याणशेट्टींची बदनामी भोवली

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापुरातील पती-पत्नीच्या आत्महत्येचे कारण उघड; सुसाईड नोटमधून धक्कादायक माहिती समोर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापुरातील 102 नवनिर्वाचित नगरसेवकांची यादी; भाजपचा ऐतिहासिक विजयी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापुरात पती-पत्नीचे मृतदेह आढळले; आत्महत्या की घातपात तपास सुरु

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अनगर नगरपंचायतीत राष्ट्रवादीच्या उज्ज्वला थिटेंचा अर्ज बाद, पण तरीही निवडणूक लागणार?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • home
  • trial

© 2025

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In