HELLO SOLAPUR NEWS | सोलापूर विधान परिषद निवडणुकीमध्ये मोठा ट्विस्ट निर्माण झाला आहे. काँग्रेस उमेदवार आदित्य फत्तेपुरकर यांचा उमेदवारी अर्ज बाद झाल्यानंतर महाविकास आघाडीचा उमेदवार कोण यावरून बैठकीचे सत्र सुरू आहे.
काल महाविकास आघाडीच्या दोन बैठका पार पडल्यानंतर महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार वसंत नाना नाईक यांच्या नावावर जवळपास शिक्का मोर्तब झालाय. भाजप विरोधी सर्व उमेदवारांचा मिळून एकच उमेदवार देण्याबाबत बैठकीत चर्चा झाली. या बैठकीत कोणताही अधिकृत निर्णय घेण्यात आला नसला तरी बैठकीनंतर महाविकास आघाडीच्या वरिष्ठ नेत्यांनी वसंतनाना देशमुख यांचे नाव निश्चित झालेय.
मात्र असं असलं तरी शेवटच्या क्षणी भाजप विरोधातील सर्वच उमेदवारी अर्ज माघार घेतले जाण्याची दाट शक्यता नाकारता येत नाही. भाजपने त्या पद्धतीचे व्यूव्हरचना आखली असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
काल झालेल्या महाविकास आघाडीच्या बैठकीत सर्वच उमेदवारांना अर्ज माघारीचा फॉर्म घेऊन येण्याबाबत सूचना दिली होती. मात्र शेवटपर्यंत उमेदवार निश्चित झाला नसल्याने ही बैठक निष्फळ ठरली.
दरम्यान अर्ज माघार घेण्याच्या शेवटच्या क्षणी राज्यातील बड्या नेत्याच्या फोननंतर भाजप विरोधातील सर्वच अर्ज माघारी घेतले जाण्याची माहिती समोर येत आहे.
त्यामुळे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी निवडणूक जाहीर होताच विरोधकांना ही निवडणूक बिनविरोध करण्याचे आवाहन केले होते. मात्र जिल्ह्यातील भाजपचा प्रमुख विरोधक असलेल्या काँग्रेसने सोलापूरची जागा खेचून आणण्यात यश मिळवले मात्र उमेदवारी टिकवण्यात ते अपयशी ठरले.
त्यामुळे भाजपचा बिनविरोध होण्याचा मार्ग सुकर झाला. मद्रास असलं तरी दुपारी तीन वाजता याबाबत अधिकृत निर्णय समोर येणार आहे.










