HELLO SOLAPUR | सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. राष्ट्रवादी अजित पवार गटानंतर आता शिवसेना शिंदे गटालाही भाजपकडून मोठा धक्का बसला आहे.
मोहोळ तालुक्यातील शिवसेना शिंदे गटाचे नेते नागनाथ क्षीरसागर आणि सोमेश क्षीरसागर हे उद्या औपचारिकरित्या भाजपात प्रवेश करणार आहेत. विशेष म्हणजे, नागनाथ क्षीरसागर हे माजी आमदार राजन पाटील यांचे कट्टर प्रतिस्पर्धी मानले जातात.
मात्र आता तेही राजन पाटील यांच्यासोबतच भाजपात प्रवेश करणार असल्याने मोहोळ तालुक्यातील राजकारणात मोठी उलथापालथ होणार आहे.
हा पक्षप्रवेश सोहळा मुंबईतील भाजप प्रदेश कार्यालयात होणार असून प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत क्षीरसागर पिता-पुत्रांचा भाजप प्रवेश पार पडणार आहे.
या प्रवेशामुळे भाजपने मोहोळ तालुक्यात आपल्या मित्रपक्षांना म्हणजेच शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गट दोघांनाही एकाच वेळी राजकीय धक्का दिला आहे.
भाजपने आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीतील मित्र पक्षांना आणखी एक धक्का दिला आहे.
मोहोळमधील पिता-पुत्र उद्या भाजपत डेरेदाखल होणार :
– भाजपने राष्ट्रवादी काँग्रेस मधील माजी आमदार राजन पाटील आणि त्यांचे दोन्ही पुत्र विक्रांत उर्फ बाळराजे आणि अजिंक्यराणा यांचा पक्ष प्रवेश होणार आहे. मात्र हे पक्ष प्रवेशाचे सत्र एवढ्यावरच न थांबता आता शिवसेना शिंदे गटातील नागनाथ शिरसागर आणि त्यांचे पुत्र सोमेश हे देखील भाजप प्रवेश करणार आहेत. विशेष म्हणजे नागनाथ क्षीरसागर यांचे द्वितीय पुत्र सुशील क्षीरसागर हे भाजप यापूर्वीच नगरसेवक म्हणून कार्यरत होते.










