Thursday, September 10, 2026
  • Login
Hello Solapur
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ
No Result
View All Result
No Result
View All Result
Hello Solapur
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ

सोलापुरात राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या पक्ष निरीक्षकांनी दिला तडका फडकी राजीनामा; राष्ट्रवादीच्या गोटात खळबळ

Hello Solapur by Hello Solapur
10-Nov-2025 18:41 pm
in जिल्हा
0
0
SHARES
222
VIEWS

HELLO SOLAPUR | राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या सोलापूर जिल्हा पक्ष निरीक्षकांनी आपल्या पदाचा राजीनामा तडका-फडकी राजीनामा दिला आहे.

सोलापूर जिल्हा पक्ष निरीक्षक शेखर माने यांनी आपल्या राजीनाम्याचे पत्र प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांच्याकडे मुंबईतील पक्ष कार्यालयात प्रत्यक्ष भेट घेऊन सुपूर्द केले. त्यांच्या या अचानक निर्णयामुळे सोलापूरच्या राजकारणात चर्चांना उधाण आले आहे.

आपल्या राजीनाम्यात शेखर माने यांनी कारण दिलेय की, “आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये सांगली जिल्ह्यातील संघटनेची कामे करण्यासाठी अधिक वेळ द्यावा, अशी माझी इच्छा आहे. त्यामुळे सोलापूर जिल्हा पक्ष निरीक्षक पदाची जबाबदारीतून मला मुक्त करण्यात यावे.” त्यामुळे माने यांनी स्वेच्छेने सोलापूर जिल्हा निरीक्षक पदाचा राजीनामा दिला आहे.

सोलापूर जिल्ह्यातील जबाबदारी यशस्वीपणे पार पाडली :

शेखर माने यांनी सोलापूर जिल्ह्यातील विधानसभा आणि लोकसभा निवडणुकांदरम्यान निरीक्षक म्हणून जबाबदारी पार पाडली होती. त्यांनी या काळात पक्षाला दोन्ही निवडणुकांमध्ये घवघवीत यश मिळवून दिले असल्याचे त्यांनी आपल्या पत्रात नमूद केले आहे.

“सोलापूर जिल्ह्यात मला दिलेल्या जबाबदाऱ्या मी प्रामाणिकपणे पार पाडल्या. पक्षाला यश मिळालं, ही माझ्यासाठी समाधानाची बाब आहे,” असेही माने यांनी आपल्या राजीनामा पत्रात नमूद केले आहे.

राजकीय वर्तुळात चर्चा :

शेखर माने हे राष्ट्रवादी काँग्रेसचे तत्कालीन प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचे निकटवर्तीय मानले जात होते. त्यामुळे त्यांच्या राजीनाम्यानंतर पक्षातील अंतर्गत हालचालींना वेग आल्याचे बोलले जात आहे.

सोलापूरमधील राष्ट्रवादी शरद पवार गटात गेल्या काही दिवसांपासून अनेक बदल घडत आहेत. शहराध्यक्ष पदापासून जिल्हा संघटनेतील पदांपर्यंत सतत हालचाल सुरू आहे. त्यात आता निरीक्षक शेखर माने यांच्या राजीनाम्याने पक्षातील गटबाजी आणि संघटनात्मक बदलांना नव्या चर्चांना वाव मिळाला आहे.

पुढील निवडीकडे लक्ष :

माने यांच्या राजीनाम्यानंतर आता सोलापूर जिल्हा निरीक्षकपद कोणाकडे सोपवले जाणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
पक्ष प्रदेश नेतृत्व लवकरच नवीन निरीक्षकाची घोषणा करणार असल्याची चर्चा सुरु आहे.

Tags: hello solapurMarathi newsNcp Sharad pawar gatNcp Solapurpoliticssharad pawarShekhar manesolapurSolapur Ncpsolapur newssolapur political news
Previous Post

राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या शहराध्यक्षपदी महेश गादेकर; अख्खी पत्रा तालीम सत्तेत मात्र गादेकर पवारनिष्ठ

Next Post

ब्रेकिंग : दिल्लीमध्ये भीषण स्फोट; 8 जणांचा मृत्यू, मुंबई-पुण्यात हाय अलर्ट

Related Posts

जनकल्याण मल्टीस्टेटच्या सभासदांना १३ टक्के लाभांश जाहीर; संस्थापक अध्यक्ष राजेंद्र हजारे यांची माहिती

जनकल्याण मल्टीस्टेटच्या सभासदांना १३ टक्के लाभांश जाहीर; संस्थापक अध्यक्ष राजेंद्र हजारे यांची माहिती

August 23, 2026
आमदार राजेंद्र राऊत हे भाजपचे बाजीप्रभू देशपांडे; पालकमंत्री जयकुमार गोरेंकडून कौतुक

आमदार राजेंद्र राऊत हे भाजपचे बाजीप्रभू देशपांडे; पालकमंत्री जयकुमार गोरेंकडून कौतुक

August 3, 2026
डीसीसी बँकेवरून आमदार राजेंद्र राऊतांची आमदार दिलीप सोपलांवर टीका तर राजन पाटलांची मात्र जाहीर माफी

डीसीसी बँकेवरून आमदार राजेंद्र राऊतांची आमदार दिलीप सोपलांवर टीका तर राजन पाटलांची मात्र जाहीर माफी

August 3, 2026
वाडिया हॉस्पिटलमध्ये अत्याधुनिक सुविधा कार्यान्वित; 74 बेड्ससह आधुनिक यंत्रणा सज्ज

वाडिया हॉस्पिटलमध्ये अत्याधुनिक सुविधा कार्यान्वित; 74 बेड्ससह आधुनिक यंत्रणा सज्ज

August 1, 2026
निरा-भीमा नदीवरील नागरिकांना सतर्कतेच्या सूचना; भीमा नदीत 1 लाख 43 हजार क्युसेक्स विसर्ग सोडला

निरा-भीमा नदीवरील नागरिकांना सतर्कतेच्या सूचना; भीमा नदीत 1 लाख 43 हजार क्युसेक्स विसर्ग सोडला

July 31, 2026
चंद्रभागा नदीच्या पाणीपातळीत वाढ; वारकरी व नागरिकांना नदीपात्रात न जाण्याचे आवाहन

चंद्रभागा नदीच्या पाणीपातळीत वाढ; वारकरी व नागरिकांना नदीपात्रात न जाण्याचे आवाहन

July 26, 2026
Next Post

ब्रेकिंग : दिल्लीमध्ये भीषण स्फोट; 8 जणांचा मृत्यू, मुंबई-पुण्यात हाय अलर्ट

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जनकल्याण मल्टीस्टेटच्या सभासदांना १३ टक्के लाभांश जाहीर; संस्थापक अध्यक्ष राजेंद्र हजारे यांची माहिती

जनकल्याण मल्टीस्टेटच्या सभासदांना १३ टक्के लाभांश जाहीर; संस्थापक अध्यक्ष राजेंद्र हजारे यांची माहिती

August 23, 2026
महात्मा बसवेश्वरांचे तैलचित्र विधानसभेत लावण्यास मंजुरी; विश्‍वनाथ चाकोते यांची माहिती

महात्मा बसवेश्वरांचे तैलचित्र विधानसभेत लावण्यास मंजुरी; विश्‍वनाथ चाकोते यांची माहिती

August 22, 2026
राष्ट्रवादीचे नेते प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला वैद्यकीय जामीन मंजूर

राष्ट्रवादीचे नेते प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला वैद्यकीय जामीन मंजूर

August 22, 2026

Top 5 news

  • अक्कलकोटच्या माजी आमदाराच्या नातवासह तिघांवर गुन्हा दाखल; आमदार कल्याणशेट्टींची बदनामी भोवली

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापुरातील पती-पत्नीच्या आत्महत्येचे कारण उघड; सुसाईड नोटमधून धक्कादायक माहिती समोर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापुरातील 102 नवनिर्वाचित नगरसेवकांची यादी; भाजपचा ऐतिहासिक विजयी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापुरात पती-पत्नीचे मृतदेह आढळले; आत्महत्या की घातपात तपास सुरु

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अनगर नगरपंचायतीत राष्ट्रवादीच्या उज्ज्वला थिटेंचा अर्ज बाद, पण तरीही निवडणूक लागणार?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • home
  • trial

© 2025

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In