Thursday, September 10, 2026
  • Login
Hello Solapur
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ
No Result
View All Result
No Result
View All Result
Hello Solapur
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ

‘साम टीव्ही’चे सोलापूर प्रतिनिधी विश्वभूषण लिमये यांना राज्यस्तरीय बसवरत्न पुरस्कार

Hello Solapur by Hello Solapur
29-Jun-2026 09:33 am
in महाराष्ट्र
0
‘साम टीव्ही’चे सोलापूर प्रतिनिधी विश्वभूषण लिमये यांना राज्यस्तरीय बसवरत्न पुरस्कार
0
SHARES
34
VIEWS

HELLO SOLAPUR | क्रांतीसूर्य, समतानायक जगद्ज्योती महात्मा बसवेश्वर यांच्या जयंती उत्सवानिमित्त बसव प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित १२ वा राज्यस्तरीय बसवरत्न पुरस्कार वितरण सोहळा रविवारी (ता. २८) रोजी रत्नमाला मंगल कार्यालयात अत्यंत थाटामाटात आणि उत्साही वातावरणात पार पडला.

समाजकार्यासह विविध क्षेत्रांत उल्लेखनीय योगदान देणाऱ्या मान्यवरांचा यावेळी यथोचित सन्मान करण्यात आला. साम टीव्ही सोलापूरचे प्रतिनिधी विश्वभूषण लिमये यांचाही गौरव करण्यात आला.

राज्यस्तरीय जीवनगौरव पुरस्कार राजेंद्र पाचंगे, प्रकाश कांबळे, विश्वभूषण लिमये तर राज्यस्तरीय पुरस्कार पंकज शहाणे, आशा कांबळे, दीपक शिंदे, डॉ. बालाजी बिराजदार, विठ्ठल चारे, रतन कटके, इरफान मुजावर, उल्हास घुरघुरे, राहुल मुळे, भारत सातपुते, मुस्तान मिर्झा, तानाजी भालेराव, कुमारी लव्या वाघमारे, विक्रम दासमे आणि तुळजाभवानी संघर्ष समितीचे सर्व सदस्य होते.

या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी जिल्हा बँकेचे अध्यक्ष बापूराव पाटील होते. यावेळी औसाचे उद्योजक श्रुनक उटगे, नळदुर्गचे नगराध्यक्ष बसवराज धरणे, ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. महेश अर्दाले, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक सुरेश मंगरुळे, माजी नगराध्यक्ष धनराज मंगरुळे, रशिद शेख, रोटरीचे माजी अध्यक्ष गोविंद पाटील, दत्ता बिराजदार, नगरसेवक राजेंद्र बेंडकाळे, रूपचंद गायकवाड, गणेश अंबर, अहमद मिनियार आणि सुनील ख्याडे आदींची प्रमुख उपस्थिती होती.

प्रारंभी महात्मा बसवेश्वर यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून आणि दीपप्रज्वलन करून करण्यात आली. या सोहळ्यात बापूराव पाटील व मान्यवरांच्या हस्ते विविध क्षेत्रांतील सत्कारमूर्तींना सन्मानचिन्ह, प्रशस्तीपत्र, शाल, फेटा आणि पुष्पहार देऊन गौरविण्यात आले.

यावेळी तीन शाळेतील ४०० गरजू विद्यार्थी-विद्यार्थिनींना शैक्षणिक साहित्याचे प्रतिनिधिक स्वरूपात वाटप करण्यात आले. सत्काराला उत्तर देताना सत्कारमूर्ती कविवर्य भारत सातपुते, डॉ. बालाजी बिराजदार, आशाताई कांबळे यांनी आपल्या मनोगतातून कृतज्ञता व्यक्त करताना पुरस्कारांमुळे मिळते सामाजिक कामाची ऊर्जा, या पुरस्कारांमुळे भविष्यात अधिक जोमाने काम करण्याची प्रेरणा मिळते. हा सन्मान केवळ वैयक्तिक नसून तो आमच्या सामाजिक बांधिलकीच्या कार्याची पावती आहे, असे त्यांनी सांगितले.

नळदुर्गचे नगराध्यक्ष बसवराज धरणे यांनी, बसव प्रतिष्ठानचा हा उपक्रम समाजाला योग्य दिशा देणारा असून, सामाजिक कार्यकर्त्यांसाठी तो प्रोत्साहनाचा असल्याचे नमूद केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक बसव प्रतिष्ठानचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. रामलिंग पुराणे यांनी या सोहळ्यामागची भूमिका स्पष्ट केली.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संतोष कांबळे तर आभार अजिंक्य मुरूमकर यांनी मानले. या सोहळ्यासाठी मुरूम शहर व परिसरातून  नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Tags: Basavratna Award Murumhello solapurMurum News
Previous Post

सोलापूर विधान परिषदेसाठी भाजपकडून व्हीप बाजवला!

Next Post

रक्तदान, शैक्षणिक साहित्य, वृक्षारोपणाने नगरसेवक अनंत जाधव यांचा वाढदिवस साजरा

Related Posts

महात्मा बसवेश्वरांचे तैलचित्र विधानसभेत लावण्यास मंजुरी; विश्‍वनाथ चाकोते यांची माहिती

महात्मा बसवेश्वरांचे तैलचित्र विधानसभेत लावण्यास मंजुरी; विश्‍वनाथ चाकोते यांची माहिती

August 22, 2026
ओबीसी नेते वाघमारेंवर सोलापुरात ऑनलाईन तक्रार दाखल!

ओबीसी नेते वाघमारेंवर सोलापुरात ऑनलाईन तक्रार दाखल!

August 19, 2026
आषाढी वारीत 7 लाखांहून अधिक वारकऱ्यांना मोफत आरोग्य सेवा; एअर ॲम्बुलन्स ठरले आकर्षण

आषाढी वारीत 7 लाखांहून अधिक वारकऱ्यांना मोफत आरोग्य सेवा; एअर ॲम्बुलन्स ठरले आकर्षण

July 26, 2026
रक्तदान, शैक्षणिक साहित्य, वृक्षारोपणाने नगरसेवक अनंत जाधव यांचा वाढदिवस साजरा

रक्तदान, शैक्षणिक साहित्य, वृक्षारोपणाने नगरसेवक अनंत जाधव यांचा वाढदिवस साजरा

July 5, 2026
विधानपरिषद निवडणुकीत भाजपकडून सोलापूरसह राज्यभरात अनेकांना धक्के

विधानपरिषद निवडणुकीत भाजपकडून सोलापूरसह राज्यभरात अनेकांना धक्के

June 1, 2026

मराठा आरक्षणाचा मुद्दा पुन्हा पेटणार?; 30 मेपासून आमरण उपोषणावर ठाम मनोज जरांगे पाटील

May 28, 2026
Next Post
रक्तदान, शैक्षणिक साहित्य, वृक्षारोपणाने नगरसेवक अनंत जाधव यांचा वाढदिवस साजरा

रक्तदान, शैक्षणिक साहित्य, वृक्षारोपणाने नगरसेवक अनंत जाधव यांचा वाढदिवस साजरा

ताज्या बातम्या

जनकल्याण मल्टीस्टेटच्या सभासदांना १३ टक्के लाभांश जाहीर; संस्थापक अध्यक्ष राजेंद्र हजारे यांची माहिती

जनकल्याण मल्टीस्टेटच्या सभासदांना १३ टक्के लाभांश जाहीर; संस्थापक अध्यक्ष राजेंद्र हजारे यांची माहिती

August 23, 2026
महात्मा बसवेश्वरांचे तैलचित्र विधानसभेत लावण्यास मंजुरी; विश्‍वनाथ चाकोते यांची माहिती

महात्मा बसवेश्वरांचे तैलचित्र विधानसभेत लावण्यास मंजुरी; विश्‍वनाथ चाकोते यांची माहिती

August 22, 2026
राष्ट्रवादीचे नेते प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला वैद्यकीय जामीन मंजूर

राष्ट्रवादीचे नेते प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला वैद्यकीय जामीन मंजूर

August 22, 2026

Top 5 news

  • अक्कलकोटच्या माजी आमदाराच्या नातवासह तिघांवर गुन्हा दाखल; आमदार कल्याणशेट्टींची बदनामी भोवली

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापुरातील पती-पत्नीच्या आत्महत्येचे कारण उघड; सुसाईड नोटमधून धक्कादायक माहिती समोर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापुरातील 102 नवनिर्वाचित नगरसेवकांची यादी; भाजपचा ऐतिहासिक विजयी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापुरात पती-पत्नीचे मृतदेह आढळले; आत्महत्या की घातपात तपास सुरु

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अनगर नगरपंचायतीत राष्ट्रवादीच्या उज्ज्वला थिटेंचा अर्ज बाद, पण तरीही निवडणूक लागणार?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • home
  • trial

© 2025

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In