Sunday, July 26, 2026
  • Login
Hello Solapur
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ
No Result
View All Result
No Result
View All Result
Hello Solapur
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ

रक्तदान, शैक्षणिक साहित्य, वृक्षारोपणाने नगरसेवक अनंत जाधव यांचा वाढदिवस साजरा

Hello Solapur by Hello Solapur
05-Jul-2026 21:23 pm
in महाराष्ट्र
0
रक्तदान, शैक्षणिक साहित्य, वृक्षारोपणाने नगरसेवक अनंत जाधव यांचा वाढदिवस साजरा
0
SHARES
37
VIEWS

HELLO SOLAPUR | भारतीय जनता पक्षाचे नेते, प्रभाग क्रमांक ४ चे कार्यकुशल नगरसेवक तथा मराठा समाजाचे नेते अनंत जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिर, विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व एलसीडी रायटिंग टॅबलेटचे वाटप, वृक्षारोपण, अनाथ आश्रमातील बालकांना भोजन तसेच महिलांसाठी शासकीय योजनांच्या नोंदणी शिबिरासह विविध समाजोपयोगी उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. सामाजिक बांधिलकी जपत आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमांना नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांना एलसीडी रायटिंग टॅबलेटचे मोफत वाटप करण्यात आले. माजी परिवहन सभापती गणेश जाधव यांच्या हस्ते शालेय साहित्याचे वितरण करण्यात आले. पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यासाठी वृक्षारोपण करण्यात आले. तसेच आयोजित भव्य रक्तदान शिबिरात अनेक रक्तदात्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत रक्तदान केले.

अनाथ आश्रमातील बालकांसाठी भोजनाची व्यवस्था करण्यात आली, तर महिलांसाठी महिला सन्मान योजनेच्या कार्ड नोंदणी शिबिराद्वारे विविध शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्याचा प्रयत्न करण्यात आला.

या रक्तदान शिबिरास आमदार विजयकुमार देशमुख यांनी सदिच्छा भेट देत नगरसेवक अनंत जाधव यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.

यावेळी माजी आमदार दिलीप माने, भाजप शहराध्यक्षा तथा नगरसेविका रोहिणी तडवळकर, शिवसेना जिल्हाप्रमुख अमोल शिंदे, सभागृह नेते नरेंद्र काळे, उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर, सामाजिक कार्यकर्ते सुधीर खरटमल, शहर सुधारणा समितीच्या सभापती स्वाती बडगु, मंडई व उद्यान समितीचे सभापती राजशेखर पाटील, जिल्हा परिषद सदस्य नेताजी खंडागळे, नगरसेवक डॉ. किरण देशमुख, संजय कोळी, शिवानंद पाटील, राजकुमार पाटील, विनायक विटकर, दशरथ कसबे, प्रभाकर काशिद, दिलीप कोल्हे, तात्यासाहेब वाघमोडे, अजित गायकवाड, विनोद भोसले, जयकुमार माने, नागेश खरात, समाधान आवळे, दीपक जमादार, बिपीन धुम्मा, बिज्जू प्रधाने, जॉन फुलारे, श्रीकांत डांगे, राम जाधव, अॅड. योगेश पवार, प्रसाद लोंढे, पंकज काटकर, समर्थ बरडे यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी शाल, पुष्पगुच्छ देऊन अनंत जाधव यांचा सत्कार केला व त्यांच्या पुढील सामाजिक व लोकहिताच्या कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.

कार्यक्रमास प्रभाग क्रमांक ४ मधील धर्मवीर संभाजी तरुण मंडळाचे पदाधिकारी व कार्यकर्ते, संभाजी राजे तालीम परिसरातील नागरिक, मित्रपरिवार, भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. रक्तदान शिबिरासाठी श्री सिद्धेश्वर ब्लड बँकेचे मोलाचे सहकार्य लाभले.

सामाजिक जाणीव, सेवाभाव आणि लोकहिताचा संदेश देत वाढदिवस साजरा करण्याच्या या उपक्रमाचे नागरिकांकडून विशेष स्वागत करण्यात आले.

Tags: Bjp Anant Neta JadhavBjp Mla Vijaykumar Deshmukhhello solapursolapir newssolapur
Previous Post

‘साम टीव्ही’चे सोलापूर प्रतिनिधी विश्वभूषण लिमये यांना राज्यस्तरीय बसवरत्न पुरस्कार

Next Post

सोलापूर आसावा प्रशालेच्या माजी विद्यार्थ्यांचा 16 वर्षांनंतर पुन्हा भरला शाळेचा वर्ग

Related Posts

‘साम टीव्ही’चे सोलापूर प्रतिनिधी विश्वभूषण लिमये यांना राज्यस्तरीय बसवरत्न पुरस्कार

‘साम टीव्ही’चे सोलापूर प्रतिनिधी विश्वभूषण लिमये यांना राज्यस्तरीय बसवरत्न पुरस्कार

June 29, 2026
विधानपरिषद निवडणुकीत भाजपकडून सोलापूरसह राज्यभरात अनेकांना धक्के

विधानपरिषद निवडणुकीत भाजपकडून सोलापूरसह राज्यभरात अनेकांना धक्के

June 1, 2026

मराठा आरक्षणाचा मुद्दा पुन्हा पेटणार?; 30 मेपासून आमरण उपोषणावर ठाम मनोज जरांगे पाटील

May 28, 2026
पोलीस संरक्षण ते पेन्शन; प्रदेशाध्यक्ष मनिष केत यांच्याकडून मुख्यमंत्र्यांना विविध मागण्यांचे निवेदन

पोलीस संरक्षण ते पेन्शन; प्रदेशाध्यक्ष मनिष केत यांच्याकडून मुख्यमंत्र्यांना विविध मागण्यांचे निवेदन

May 27, 2026
भारतातील एलपीजी गॅस तुटवड्यावर सोलापूरच्या बालाजी अमाईन्स कंपनीने दिला पर्याय!

भारतातील एलपीजी गॅस तुटवड्यावर सोलापूरच्या बालाजी अमाईन्स कंपनीने दिला पर्याय!

May 21, 2026
‘राष्ट्रवादी दादा गटाचे 22 आमदार पवार गटाच्या संपर्कात’ हे वृत्त खोडसाळपणाचे : दादा गट

‘राष्ट्रवादी दादा गटाचे 22 आमदार पवार गटाच्या संपर्कात’ हे वृत्त खोडसाळपणाचे : दादा गट

May 20, 2026
Next Post
सोलापूर आसावा प्रशालेच्या माजी विद्यार्थ्यांचा 16 वर्षांनंतर पुन्हा भरला शाळेचा वर्ग

सोलापूर आसावा प्रशालेच्या माजी विद्यार्थ्यांचा 16 वर्षांनंतर पुन्हा भरला शाळेचा वर्ग

ताज्या बातम्या

सोलापूर आसावा प्रशालेच्या माजी विद्यार्थ्यांचा 16 वर्षांनंतर पुन्हा भरला शाळेचा वर्ग

सोलापूर आसावा प्रशालेच्या माजी विद्यार्थ्यांचा 16 वर्षांनंतर पुन्हा भरला शाळेचा वर्ग

July 5, 2026
रक्तदान, शैक्षणिक साहित्य, वृक्षारोपणाने नगरसेवक अनंत जाधव यांचा वाढदिवस साजरा

रक्तदान, शैक्षणिक साहित्य, वृक्षारोपणाने नगरसेवक अनंत जाधव यांचा वाढदिवस साजरा

July 5, 2026
‘साम टीव्ही’चे सोलापूर प्रतिनिधी विश्वभूषण लिमये यांना राज्यस्तरीय बसवरत्न पुरस्कार

‘साम टीव्ही’चे सोलापूर प्रतिनिधी विश्वभूषण लिमये यांना राज्यस्तरीय बसवरत्न पुरस्कार

June 29, 2026

Top 5 news

  • अक्कलकोटच्या माजी आमदाराच्या नातवासह तिघांवर गुन्हा दाखल; आमदार कल्याणशेट्टींची बदनामी भोवली

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापुरातील पती-पत्नीच्या आत्महत्येचे कारण उघड; सुसाईड नोटमधून धक्कादायक माहिती समोर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापुरातील 102 नवनिर्वाचित नगरसेवकांची यादी; भाजपचा ऐतिहासिक विजयी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापुरात पती-पत्नीचे मृतदेह आढळले; आत्महत्या की घातपात तपास सुरु

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अनगर नगरपंचायतीत राष्ट्रवादीच्या उज्ज्वला थिटेंचा अर्ज बाद, पण तरीही निवडणूक लागणार?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • home
  • trial

© 2025

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In